Submitted by मुग्धमानसी on 24 June, 2013 - 05:57
मन पुसून कोरडं कर
पाऊस पडून गेल्यावर
पुन्हा छातीत वारं भर
श्वास सुटून गेल्यावर...
उनाड स्वप्नं घडी घालून
ठेऊन दे उशापाशी
उलगडून पुन्हा डोळ्यांत भर
निखार जळून गेल्यावर...
तुझं असणं, तुझे श्वास
तुझं नसणं, तुझे भास..
पुन्हा तुला गोळा कर
’तो’ पसरून गेल्यावर...
जमेल तेंव्हा जमेल तसं
जमेल तिथे भेटत जा
वसंत पुन्हा दिसणार नाही
एकदा बहरून गेल्यावर...
डोह फारच झालाय खोल
सांभाळ चुकून जाईल तोल
बुडशील, मरशील, येशील पुन्हा
सगळं आटून गेल्यावर...
पावसात सुद्धा वहात नाहीत
स्वप्नं डोळ्यांत तुंबून रहातात
जगणं पुन्हा वाहतं कर
एवढा ऋतू गेल्यावर...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख....
सुरेख....
कविता छानच पण हा फॉर्मेट
कविता छानच पण हा फॉर्मेट जास्त आवडला
किती साधं सोप्प आणि तरीही
किती साधं सोप्प आणि तरीही सुंदर असतं ग तुझं लिखाण
मनापासुन वाचलं जावं इतकं गोड!
मस्तच!
निव्वळ अ प्र ति म ! तुझं
निव्वळ अ प्र ति म !
तुझं असणं, तुझे श्वास
तुझं नसणं, तुझे भास..
पुन्हा तुला गोळा कर
’तो’ पसरून गेल्यावर...
हे कडवे जरा जास्तच आवडले.
मस्त!!
मस्त!!
मुमाने लिहिलय म्हणजे छान
मुमाने लिहिलय म्हणजे छान असणारच !!!..... कुण्नीतरी म्हटलेलं आठवलं
पण बघा तुमच्या कवितेत गझलियत चा किती खोलवर विचार अतीशय नैसर्गीकपणेच झालेला असतो तश्या तुम्हाला गझला का लिहिता येत नाहीयेत अजून हा मला प्रश्न पुन्हा एकदा पडला
असो
कविता खूप खूप आवडेश
छान!
छान!
अतिशय छान. आवडली.
अतिशय छान.
आवडली.
छान!
छान!
सर्वांना धन्यवाद! रिया, तुझं
सर्वांना धन्यवाद! रिया, तुझं साधं बोलणंच एवढं गोड असतं की माझ्या कवितांची काय बात?
वैभव... अगदी हाच प्रश्न मलाही पडलाय. पण असो, सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी मझी धाव कवितांपर्यंतच.
आवडली !
आवडली !
अप्रतिम कविता. उनाड स्वप्नं
अप्रतिम कविता.
उनाड स्वप्नं घडी घालून
ठेऊन दे उशापाशी
उलगडून पुन्हा डोळ्यांत भर
निखार जळून गेल्यावर... >>>> क्या बात है...
सुंदर
सुंदर
मुमा! .. अगदी सुरेख!..
मुमा! .. अगदी सुरेख!..
धन्यवाद!
धन्यवाद!
अप्रतिम !
अप्रतिम !
वा ! सुरेख!
वा ! सुरेख!
अत्यंत सुंदर ! ले.शु.
अत्यंत सुंदर ! ले.शु.
वा! कविता फार आवडली. उनाड
वा! कविता फार आवडली. उनाड स्वप्नं, हे कडवं तर खूपच! (का कुणास ठाऊक, या कडव्यातली स्वप्नं कॉन्टॅक्ट लेन्सेस सारखी वाटली)
पुन्हा तुला गोळा कर ’तो’
पुन्हा तुला गोळा कर
’तो’ पसरून गेल्यावर...
>> व्वाह!
उनाड स्वप्नं लई भारी..
खुप्प आवड्ली
खुप्प आवड्ली
धन्यवाद!
धन्यवाद!
खुप मस्त कविता, आवडली.
खुप मस्त कविता, आवडली.
नितांत सुंदर.... खूप खूप
नितांत सुंदर.... खूप खूप आवडेश
व्वा! खल्लास करुन टाकल ... या
व्वा! खल्लास करुन टाकल ... या कवितेने
व्वा! छानच
व्वा! छानच
छान. -दिलीप बिरुटे
छान.
-दिलीप बिरुटे
शब्दातीत भाव शब्दांत कसे ओतता
शब्दातीत भाव शब्दांत कसे ओतता हो तुम्ही??
ह फारच झालाय खोल
सांभाळ चुकून जाईल तोल
बुडशील, मरशील, येशील पुन्हा
सगळं आटून गेल्यावर...
व्वा!!
अंतर्मुख करणारी कविता .
अंतर्मुख करणारी कविता .
क्या बात है
क्या बात है
Pages