प्रश्न
निर्मात्याच्या डोक्यात नसलेले
त्यांच्या भोवती फिरणारं जग
आणि मी इवलासा निद्रिस्त ठिपका
उठल्यावर आळस देतानाच काय तेवढी
फुगते छाती
सूर्याच्या आणि हवेच्या पेक्षाही महत्वाचा वाटतो
दूध आणि पेपरचा रतीब
मी सोफ्यावर
दूध गॅसवर
पेपर मांडीवर
सगळे व्यवस्थित आपापल्या ठिकाणी
जगाची उलथापालथ चाळतो
कधीच वाटत नाही
या दंगली, अपघात, चोर्यादरोडे
आपल्यालाही भिडतील
कशानेच पेटत नाही मग
स्टे-ऑनच्या ज्वलनशीलतेची चर्चा करतो
कुठल्याशा महागड्या साबणाच्या फेसात
धुवून घेतो मेंदू
भरलेल्या पाकिटातले वाटेकरी आपापला हिस्सा ओरबाडतात
आठवत रहातं खुर्चीत घाम गळताना
थकलेल्या डरकाळ्या
चिखलातली कमळं
मोबाईल पुढे हतबल झालेलं घड्याळ
आणि हातात घट्ट बसलेला रिमोट
काहीच आपलं म्हणवत नाही
पिचल्या हाडांनी परतताना दिसतो
वड्यावाल्याशी भिक मागणारा चिमुरडा
"कसलं हे नशीब?" नुस्ताच निश्वास बोलतो
ढेकर देत गॅलरीतल्या येरझरा बघतात
पदपथावरचे आभाळ पांघरून निजलेले जंतू
आणि मऊशार उबदार बिछाण्यात ती विचारते
"थोडं सोनं घेऊन ठेवायला हवं
महागाई खूपचं वाढतं चाललीये ना?"
तोवर मी पुन्हा ठिपका झालेला असतो.
..............................................................................शाम
हे काय आहे???
हे काय आहे???
अक्षदा | 9 November, 2012 -
अक्षदा | 9 November, 2012 - 12:27 नवीन
हे काय आहे???<<<
समजले नाही की आवडले नाही?
मुक्तछंदात विनोदी लिहिण्यापेक्षा असे काहीतरी अस्सल वाचावेसे वाटत नाही? माझ्यावरचा राग काढण्यासाठी इतरत्र जमा होणारे नवनवे ड्यु आय येथे यायचे नाहीत कारण जे अस्सल ते अस्सलच. आणि आले तरी अस्सल कलाकृतीला दादच द्यावी लागेल.
==================================
शाम,
अश्या विषयांना आणि आकृतीबंधांना तुम्हीच हात घालावात. उत्तम शब्दांकन, प्रभावी ओळी आणि पटण्यासारखेच विचार!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
शाम, फारच मस्त रे. किती
शाम, फारच मस्त रे. किती साध्या शब्दात केवढा तरी आशय आहे. तुफान आवडली ही मुक्तछंदातली कविता.
अतिशय सुंदर, गहन आणि सर्वात
अतिशय सुंदर, गहन आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुलभ.
परिणामकारक. आवडली कविता ! (
परिणामकारक. आवडली कविता ! ( स्माईली द्यावासा वाटत नाही. )
शाम, ब्राव्हो! जमलीच आहे,
शाम, ब्राव्हो!
जमलीच आहे, आतून आलीये... कॅन सेन्स इट!
कविता आवडली.
कविता आवडली.
जबरीच रे..... सॉलिड
जबरीच रे..... सॉलिड जमलीये.....
शेवटच्या ओळींनी तर रचना अशी उंचावर नेलीये की बस्स...
शाम जबरीच रे. अक्षदा,
शाम
जबरीच रे.
अक्षदा, तब्येतीस जपा
आवडली!
आवडली!
आवडली.
आवडली.
सही!
सही!
जगाची उलथापालथ चाळतो <<
जगाची उलथापालथ चाळतो << क्या बात !!
शिर्षकपण भन्नाट !
वा! खुप छान आहे. फ्रॉम बॉटम
वा! खुप छान आहे. फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट.
जब्बरदस्त!
जब्बरदस्त!
कविता आवडली
कविता आवडली
सही उतरलीये शाम
सही उतरलीये शाम
खरंच छान....
खरंच छान....
आवडली कविता.
आवडली कविता.
जब्बरदस्तच!
जब्बरदस्तच!
आवडली.
आवडली.
वाह!
वाह!
सही उतरलीये शाम >. ++१
सही उतरलीये शाम >. ++१
खूप खूप आभार
खूप खूप आभार दोस्तांनो!!!!!
बेफि, विदिपा, आपल्या कौतुक,सूचना आदींनी खूप हुरूप होतो... खूप खूप धन्यवाद!
आवडली
आवडली
छान... डरकाळी, कमळ, इंजिन
छान... डरकाळी, कमळ, इंजिन काहीच नको, तर हातावर हात धरून गप्प बसा.
थोडक्यात फ़ार मोठा आशय
थोडक्यात फ़ार मोठा आशय सांगितलात!
खुप छान!
व्वा. मस्त कविता आहे शाम.
व्वा. मस्त कविता आहे शाम.