निद्रिस्त ठिपका

Submitted by -शाम on 9 November, 2012 - 01:36

प्रश्न
निर्मात्याच्या डोक्यात नसलेले
त्यांच्या भोवती फिरणारं जग
आणि मी इवलासा निद्रिस्त ठिपका

उठल्यावर आळस देतानाच काय तेवढी
फुगते छाती
सूर्याच्या आणि हवेच्या पेक्षाही महत्वाचा वाटतो
दूध आणि पेपरचा रतीब
मी सोफ्यावर
दूध गॅसवर
पेपर मांडीवर
सगळे व्यवस्थित आपापल्या ठिकाणी
जगाची उलथापालथ चाळतो

कधीच वाटत नाही
या दंगली, अपघात, चोर्‍यादरोडे
आपल्यालाही भिडतील
कशानेच पेटत नाही मग
स्टे-ऑनच्या ज्वलनशीलतेची चर्चा करतो

कुठल्याशा महागड्या साबणाच्या फेसात
धुवून घेतो मेंदू
भरलेल्या पाकिटातले वाटेकरी आपापला हिस्सा ओरबाडतात
आठवत रहातं खुर्चीत घाम गळताना

थकलेल्या डरकाळ्या
चिखलातली कमळं
मोबाईल पुढे हतबल झालेलं घड्याळ
आणि हातात घट्ट बसलेला रिमोट
काहीच आपलं म्हणवत नाही

पिचल्या हाडांनी परतताना दिसतो
वड्यावाल्याशी भिक मागणारा चिमुरडा
"कसलं हे नशीब?" नुस्ताच निश्वास बोलतो

ढेकर देत गॅलरीतल्या येरझरा बघतात
पदपथावरचे आभाळ पांघरून निजलेले जंतू

आणि मऊशार उबदार बिछाण्यात ती विचारते
"थोडं सोनं घेऊन ठेवायला हवं
महागाई खूपचं वाढतं चाललीये ना?"
तोवर मी पुन्हा ठिपका झालेला असतो.
..............................................................................शाम

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षदा | 9 November, 2012 - 12:27 नवीन
हे काय आहे???<<<

समजले नाही की आवडले नाही? Happy

मुक्तछंदात विनोदी लिहिण्यापेक्षा असे काहीतरी अस्सल वाचावेसे वाटत नाही? माझ्यावरचा राग काढण्यासाठी इतरत्र जमा होणारे नवनवे ड्यु आय येथे यायचे नाहीत कारण जे अस्सल ते अस्सलच. आणि आले तरी अस्सल कलाकृतीला दादच द्यावी लागेल.

==================================

शाम,

अश्या विषयांना आणि आकृतीबंधांना तुम्हीच हात घालावात. उत्तम शब्दांकन, प्रभावी ओळी आणि पटण्यासारखेच विचार!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

शाम, फारच मस्त रे. किती साध्या शब्दात केवढा तरी आशय आहे. तुफान आवडली ही मुक्तछंदातली कविता.

जबरीच रे..... सॉलिड जमलीये.....

शेवटच्या ओळींनी तर रचना अशी उंचावर नेलीये की बस्स...

खूप खूप आभार दोस्तांनो!!!!!

बेफि, विदिपा, आपल्या कौतुक,सूचना आदींनी खूप हुरूप होतो... खूप खूप धन्यवाद!