निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सध्या नुसत्या तुमच्या गप्पांवरुन नजर फिरवतेय. १३ मार्च पर्यंत एकदम बिझी आहे. जमल्यास मधुन मधुन काही फोटो टाकते नविन काढलेले.

माधव हा मी कांदा लावला होता. आता ह्या शेतात भराव टाकत असल्यामुळे तो कालच काढून आता दुसर्‍या जागेवर लावण चालु आहे. पण ह्या जागेवर मी लाल माती टाकायला सांगितली आहे म्हणजे परत लागवड करता येईल.
kanda.JPG

माधव, गाजर, मुळा, बीट यांच्या पण वरच्या चकत्या लावता येतील. गाजराला छान फूले येतात. बियाही धरतात (पण त्या बिया खायच्या मात्र नाहित). मूळ्याला पण शेंगा लागतील.

दिनेशदा, आमच्याकडे लागल्यात मुळ्याला शेंगा. मी आणि किरु दचकलोच होतो तो मुळा आहे हे कळल्यावर Happy

Mulaa.jpg

असुदे, ती फुले पण मस्त दिसतात. या शेंगा कच्च्या खाता येतात. भाजी करता येते. मीठ लावून सुकवून ठेवता येतात आणि हव्या तेव्हा तळून खाता येतात.
याच शेंगात बिया तयार होतील, त्या पेरल्या तर मूळे तयार होतात.

माझ्याकडे पण मुळ्याला आता फुल धरली आहेत. मी मागच्या वर्षी भाजी बनवली होती शेंगांची रेसिपी द्यायचि अजुन बाकी आहे. पुढच्या आठवड्यात देतेच.

जागु आज सकाळी गाडीत सखी ऐकत होते त्यात पालेभाज्यांबद्दल कार्यक्रम होता. लोक मोजक्याच दोन्-तिन पालेभाज्या खातात, एकाच कृतीने सगळ्या पालेभाज्या करतात त्यामुळे पाभा म्हणजे नक्को हाच सुर निघतो. वेगवेगळ्या पाभा, तसेच बीट, फ्लॉवर इ. फळभाज्यांची पानेही वापरावीत अशी काय काय चर्चा चाललेली.

साधना त्या चर्चा करणार्‍यांना म्हणो आम्हाला एक दिवस द्या चर्चा करायला मग सांगतो कशा खायच्या ते पाभा.

पण पालेभाज्यांची गंमत हीच की एकाच प्रकारे केल्या तरी त्यांची चव वेगवेगळी लागते. आमच्याकडे आठवड्यातून ३-४ वेळा रात्री पालेभाजी आणि भाकरी असते. आपण खातो तेवढ्या विविध पालेभाज्या इतर लोकं खात नाहीत.

अगं तु फोन करायचा त्यांना. त्यांना आवडेल खुप. परवा सकाळी ७ च्या कार्यक्रमात कोणीकोणी फोन केले ते सांगत होते त्यात एक नाव प्राजक्ता म्हात्रे होते Happy

मेथी, पालक, आंबट चूका, माठ, लाल माठ, साधा बटवा, चंदन बटवा, साधी घोळ, राजघोळ, आंबाडी, अळू, मूळ्याचा पाला, करडई, शेवगा, केनी, फोणशी, आंबट चूका, भारंगी, कांदापात, अलकोलचा पाला,
समुद्री मेथी, राजगिर्‍याचा पाला, मसाल्याची पाने, हरभर्‍याचा पाला, डांब, चवळी, शेपू ..

एवढ्या भाज्या आई करते (एखाददुसरी राहिलीच असेल) यात जागू/मामी/ साधना अ‍ॅड करतिल, मग ती यादी सखीला पाठवूया !!

वावा छान लिस्ट. यात मायाळू राहिला.

मी कधी साधा बटवा, राजघोळ, फोणशी, केनी, राजगिर्‍याचा पाल, मसाल्याची पाने, डांब पाहिले नाहियेत.

मामी मी पण आठवड्यातुन तिनदा करतेच पालेभाजी. मग रोज पालेभाजी चा कंटाळा आला की मग कधी पालेभाजीच्या वड्या, पराठे, भजी, बेसनच्या पोळ्यात पालेभाज्या, आमटीत पालेभाज्या असा प्रकार करते. माझी वहीनी पावभाजीत पण पालेभाज्या घालते मुलांनी खाव्या म्हणून.

दिनेशदा त्यात बिटचा पाला, टाकळा, कवळा, भोपळ्याचा पाला, कोरलं, कोलेट, डायला अ‍ॅड करा. आठवल्यावर अजुन टाकते.

तांदुळजाचा फोटो आहे इथे.
राजघोळ. घोळीसारखीच पण पाने मोठी असतात.
फोणशी ला जागूने कहैतरी वेगळे नाव दिले होते, पहिल्या पावसानंतर मुंबईत येते. गवतासारखी असते पांढरी मूळे असतात. केनी कांद्याच्या पातीसारखीच असते, मसाल्याची पाने बदामाच्या आकाराची, तळव्याएवढी असतात. त्याच्या अळूवड्यासारख्या वड्या करतात. ऋषिपंचमीला लाल रंगाचे डांब बाजारात येतात. राजगिर्‍याची पाने भाल्यासारखी आणि मोठी असतात. देठ जाड असतात.
या बहुतेकांचे फोटो जागूने दिले होतेच.

शिवाय कोरलं राहिलं. (तरी मी आफ्रिकन पालेभाज्या लिहिल्या नाहीत.)

साधना, खरंच एस एम एस करुन टाक, सखीला.
या प्रत्येक भाजीची चव वेगळी, आणि एकमेव !!

लाखी डाळ हे नाव ऐकलय का? त्या डाळिवर बंदी आहे. ती घातक असते म्हणून तिच्या वापरावर बंदी आहे. पण विदर्भात मी त्या झाडाचा कोवळा पाला बाजारात विकायला ठेवलेला पाहिलाय. माझ्या नणंदेने सांगितले की तो कच्चा खाल्ला तरी छान लागतो.
एक चिवई नावाची भाजी असते ना?

लाखी डाळीने अंधत्व येते असा सरकारचा अहवाल असल्याने तिच्यावर बंदी आहे. पण स्वस्त आणि चवदार असल्याने ती बाजारात येतेच.
चिवईच्या भाजीबद्दल बी ने फोटोसकट लिहिले होते.

सध्या अगदी मनावर घेऊन बागकाम करतेय. आता घरी दोन कारल्याचे वेल आलेत. आजच हिरवा वाटाणा, पांढरा वाटाणा, वाल आणि चवळी पेरलेय. वेल वाढायला दोर्‍या बांधून आधार तयार ठेवलेत. खूपशी टोमॅटोची झाडं आलेत. लेक पण हौशीने मदतीला येतेय. Happy

दिनेशदा आणि मंडळी,
नवीन प्रोजेक्ट्ची कल्पना मस्त आहे.
या निमित्ताने मी देखील थोडाफार प्रयत्न सुरु करायचा अस म्हणतोय..
तुर्त मी हे सगळं मनापासुन वाचायला वेळ द्यायचा (मामीसारखं) असं आश्वासन देतो Happy

बाकी ते पोपटासारखे दिसणारे पोपटी फुले मस्तच !
पण मला या निमित्ताने वाल,श्रावणी घेवडा किंवा पावट्याची काहीशी विशेष आकार आणि रंग असलेली अगदी लहान फुले, कळ्या यांच्यावर लक्ष गेलं

दिनेशदा, मला वाटतं ती भडक पोपटी फुले हादग्याचीचं आहेत का. उक्षी म्हणजे काय.. छानचं नाव आहे.

बी, नाही रे हादग्याची नाहीत. ती पांढरी आणि क्वचित गुलाबी असतात. हि त्यामानाने छोटी असतात, आणि खाण्याजोगी पण नसतात.
तूझी चिवईच्या भाजीवरुन आठवण काढली होती.

===

आताच दगडफूलावर एक लेख लिहिला आहे. त्याबाबत आणखी माहिती असेल तर अवश्य कळवा.

आपण पुर्वी गोखरु बद्दल बोललो होतो. त्याचा फोटो. यावर पाय पडला, तर मस्तकात कळ गेलीच समजा.
याचा किडनी स्टोनवर उपयोग होतो. गोक्षुरादी गुग्गुळ हे औषध यापासून करतात.

हा आहे घायपाताचा तूरा :-

या तूर्‍यातच त्याची रोपे, म्हणजेच पिल्ले तयार होतात :-

दिनेशदा मस्तच.
घायपातचा हा तुरा माझ्या ऑफिसच्या समोर पण आला आहे. तसेच देवचाफ्याच्या शेंगाही इथे लागल्या आहेत च्या साप खाण्यासाठी ह्या झाडावर चढतो. पण अजुन सापाला चाहुल लागलेली दिसत नाही. इथे फोटो काढायचे जरा कढीणच काम आहे. मी मोबाईलमधुन काढण्याचा प्रयत्न करते.

जागू देवचाफ्याच्या शेंगांचा फोटो नक्की काढा आणि इथे टाका, कारण त्या बघायलाच मिळत नाहीत. सापांच्या विषावर त्यांचा उतारा म्हणून उपयोग होतो, पण साप रात्री येऊन त्या नष्ट करतात असा समज आहे. तुमच्या फोटोंच्या प्रतिक्षेत......................

काल मी जेलिफिश आणि प्रवाळांवर लेख लिहिला आहे (गरीब बिचारं शैवाल), कुणाकडे जायंट क्लॅमचा फोटो असेल तर तो त्या ठिकाणी हवा आहे.

शांकली दोन तिन दिवसांनी काढते. कारण सध्या ऑफिसबाहेर खुप गोंधळ असतो. आमचे कार्पोटरायझेशन होत आहे त्या विरुद्धात मोर्चे, निदर्शनांची गडबड आहे. वेळ मिळताच काढते फोटो.

माझ्या टोम्याटोला ४ टोम्याटो आले..

कुणाचं काय तर कुणाचं काय्..पण देवाशप्पथ काय आनंद आहे.. ४ म्हणजे खुपचं कमी..पण १च्या ४ पट..
किती छान वाटतं न आपल्या झाडाल फुलताना फळताना पाहुन. आपलं बाळ वाढत असल्या सारखं

Pages