Submitted by मितान on 2 February, 2011 - 05:52
आत्ताच मीमराठी या साईटचा अॅडमिन असणार्या राजेने सांगितले की माझे लेख चोरले गेलेत.
http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:335404
ही लिंक पण दिली. या पल्लवी शेलार कोण बाई आहेत ते मला माहीत नाही.
इथे जाऊन बघितले तर माझ्या दोन बालकथा माझ्या परवानगीशिवाय स्वतःच्या नावावर टाकल्या आहेत. ब्लॉगवर कॉपीराईट्स चे चिन्ह असतानाही !
मित्र सांगत होता या साईटवरचे जवळजवळ सगळे लेखन चोरलेले आहे !
कोणती कारवाई करावी ? कशी ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला!! एकतर तिथे प्रथम आयडी
हायला!!
एकतर तिथे प्रथम आयडी घेऊन प्रतिक्रिया नोंदव की हे माझे लिखाण असून त्यांनी चोरले आहे. तुझ्या लिखाणाचे दुवे दे. तारखांमधल्या फरकावरुन कळेलच कोणाचे आहे ते. दुसरे म्हणजे, त्या साईटच्या अॅडमिनना लिही आणि चोरलेले लिखाण उडवायची विनंती कर वा तुझ्या नावाने करायला सांग.
give legal notice under
give legal notice under copyright law.
मितान, शैलजाला
मितान, शैलजाला अनुमोदन.
मुग्धानन्द, इन्टरनेटच्या आभासी जगतातल्या चेहरामोहरा ठाऊक नसलेल्या आयडींना
legal notice देण्याची सोय अजून उपलब्ध झाली नाहीये
शैलजाला अनुमोदन. किती मनस्ताप
शैलजाला अनुमोदन. किती मनस्ताप होत असेल तुला मितान!
शैलजाला अनुमोदन. मीही तिकडे
शैलजाला अनुमोदन. मीही तिकडे निषेध नोंदवायचा प्रयत्न करत आहे.
मितान ह्या
मितान ह्या http://www.mogaraafulalaa.com/search/label/Content%20Theft?max-results=100 लिंक वर लेख चोरांसंदर्भात कशी कारवाई करायची त्याची माहिती दिलेली आहे..
अवघड आहे! वर तिथे शेअर ऑन
अवघड आहे! वर तिथे शेअर ऑन ट्विटर, फेबु अशा लिंका बघून हसूच आले! काय लोक असतात. खरंच फेबु /ट्विटर वर प्रसिद्धी केली पाहिजे या चोर लोकांची !!
शैलजाला अनुमोदन.
शैलजाला अनुमोदन.
मागे माझ्या काही कविता चोरले
मागे माझ्या काही कविता चोरले गेले होते. तेव्हा मी गुगल च्या एका लिंक वर तक्रार नोंदवली होती. नंतर गुगल ने मी ज्या ज्या ब्लॉग बद्दल तक्रार केले होते ते ब्लॉगच उडवले होते. मला शंका आहे की ती गुगल स्वतःच्या ब्लोग्स्पॉट पुरता मर्यादीत काम करतं. ती लिंक सापडली की कळवेन तुम्हाला. तेव्हा पासुन इंटर्नेटवर कुठेही कवीता टाकणे बंद केले.
प्राची करत आहे तसे, तुझ्या
प्राची करत आहे तसे, तुझ्या मित्रमैत्रिणींना तिथे आयडी घेऊन ह्या चोरीबद्दल निषेध नोंदवायला सांग.
http://www.marathiadda.com/pr
http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:335404
या लिंकवर एक कोणी तरी "पूनम" आहे; तिने चक्क 'मी माझा' हे चारोळ्यांचं (चोरलेलं) पुस्तकच टाकलयं.
काहीतरी अशी कारवाई कर की
काहीतरी अशी कारवाई कर की ज्याच्याने अशा लेख चोरांना कायमचा आळा बसेल.
मंजुडी, त्या साइट विरुद्ध,
मंजुडी, त्या साइट विरुद्ध, (admin) cyber law खाली पण गुन्हा दाखल होउ शकतो.
मी बघितली ति साइट. funny आहे.
मी बघितली ति साइट. funny आहे.
सगळा आनंदच आहे ! साईटच्या
सगळा आनंदच आहे ! साईटच्या अॅडमिननेच लेख चोरलेत. आणि माझे एकटीचे नाही तर अनेकांचे.
lahu@marathiadda.com
त्याला मेल करतेय. तुम्हीही कृपया या वरील मेल आयडीवर मेल करुन आपला निषेध नोंदवा.
मंजुडी, त्या साइट विरुद्ध,
मंजुडी, त्या साइट विरुद्ध, (admin) cyber law खाली पण गुन्हा दाखल होउ शकतो.
>>>
पण मग तसे सविस्तर लिहा...उगीच अर्धवट माहिती नको.
तिथे आयडी घेण्यासाठी
तिथे आयडी घेण्यासाठी अॅडमिनची परवानगी लागतेय.
>साईटच्या अॅडमिननेच लेख
>साईटच्या अॅडमिननेच लेख चोरलेत. >> हे म हा न आहे.
माय गॉड!! काय गेंड्याच्या
माय गॉड!! काय गेंड्याच्या कातडीचे लोक असतात!
या लिंकवर एक कोणी तरी "पूनम" आहे (वैनी तुमच्या नावाचा आय.डी. दिसतोय. ;)) >> शरद तुमचा प्रॉब्लेम काय आहे नक्की??? इथे हा उल्लेख अतिशय अप्रस्तुत आहे. मुद्दाम का कुरापत काढायला जाताय? निषेध!
मेल केला आहे. त्या कथेच्या
मेल केला आहे.
त्या कथेच्या खाली प्रतिसाद छापायलाही अॅडमिनची परवानगी लागतेय.
इथे हा उल्लेख अतिशय अप्रस्तुत
इथे हा उल्लेख अतिशय अप्रस्तुत आहे.>>>
मान्य आणि सविनय माघार!!
तो उल्लेख काढून टाकलेला आहे.
पण मग तसे सविस्तर लिहा...उगीच
पण मग तसे सविस्तर लिहा...उगीच अर्धवट माहिती नको.>> हो देते ना. पण तुमचा स्वर मला झापल्यासारखा का वाटतो आहे?
त्या कथेच्या खाली प्रतिसाद
त्या कथेच्या खाली प्रतिसाद छापायलाही अॅडमिनची परवानगी लागतेय.>>>> हो ना
मुग्धानंद, मंजुडी जाऊदेत.
मुग्धानंद, मंजुडी जाऊदेत. मुद्द्याचं लिहा गं
आणि मुग्धानंद, तुम्ही सायबर लॉ केलेय का? मला माहिती हवी आहे.
हो शैलजा, सायबर नाही पण लॉ
हो शैलजा, सायबर नाही पण लॉ केले आहे. मी त्याबद्द्ल जास्त माहिति सविस्तर देइनच. आता ऑफिस बंद करण्यासाठी शिपायाचा बुलावा आला आहे. मंजुडि आपण एकाच उद्दीष्टासाठी झटत आहोत. राग मानु नये.
पण तुमचा स्वर मला
पण तुमचा स्वर मला झापल्यासारखा का वाटतो आहे?
>>>
तुम्हाला तसं वाटत असेल तर मला माफ करा... मितानने काय कारवाई करू? आणि कशी? असे दोन प्रश्न विचारले आहेत त्यासंदर्भात आपल्याकडे असणारी माहिती सविस्तरपणे लिहिलंत तर बरं होईल. त्याचा उपयोग इतर मायबोलीकरांनाही होऊ शकेल. धन्यवाद.
धन्स मंजु. लेख लिहितेच. आता
धन्स मंजु. लेख लिहितेच. आता निघते. बाय
काय हे!
काय हे!
मितान मागे बहुतेक धुंद रवी
मितान
मागे बहुतेक धुंद रवी यांनी या संदर्भात काहितरी लिहीले होते असे वाटतय.
मोगरा फुलला ब्लॉग वाली कांचन
मोगरा फुलला ब्लॉग वाली कांचन कराई आहे तिने मधे यासंदर्भात बरीच माहिती दिली होती. तुला उपयोग होईल मितान.
Pages