माझे लेख चोरले गेलेत !

Submitted by मितान on 2 February, 2011 - 05:52

आत्ताच मीमराठी या साईटचा अ‍ॅडमिन असणार्‍या राजेने सांगितले की माझे लेख चोरले गेलेत.

http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:335404

ही लिंक पण दिली. या पल्लवी शेलार कोण बाई आहेत ते मला माहीत नाही.

इथे जाऊन बघितले तर माझ्या दोन बालकथा माझ्या परवानगीशिवाय स्वतःच्या नावावर टाकल्या आहेत. ब्लॉगवर कॉपीराईट्स चे चिन्ह असतानाही !

मित्र सांगत होता या साईटवरचे जवळजवळ सगळे लेखन चोरलेले आहे !

कोणती कारवाई करावी ? कशी ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे मितान, तुला काय वाटत असेल हे समजू शकते Sad
दुसर्‍याचे श्रेय लाटायच्या ह्या नीच मनोवॄत्तीचा तीव्र निषेध Angry

माझ्या नवर्‍याचे लेख / कविता पण मराठी अड्डा वाल्यांनी चोरले होते.. मी डीलीट करायला सांगितल्यावर मला काहीही न विचारता डीलीट केले. बहुदा त्यांना सवय असावी Happy

अत्यंत चीड आणणारी बाब. 'मोगराफुलला' ब्लॉगवर खरंच यासंदर्भात उपयुक्त माहिती आहे.

मी डीलीट करायला सांगितल्यावर मला काहीही न विचारता डीलीट केले. बहुदा त्यांना सवय असावी >>> Lol

अरे हा प्रकार पुन्हा एकदा झाला...... मधे असेच कोणाच्यातरी बाबतीत झाले होते........
आणि चोरी पकडली गेल्यावर मग हे करणारा "अनभिज्ञ" असल्याचा आव आणतो....... Angry

यावर खरेच ठोस उपाय काय तो सुचवा....... मुग्धानंद, आपल्याकडची माहिती शेअर करा, कारण हे प्रसंग इतरांवरही येऊ शकतात..... कारण मुळात आपला लेख किंवा कविता चोरलिये हे कळायलाच काळ लोटतो.. Sad

अकु Sad

मी काल त्या साईटवर सदस्यत्व घेऊन त्या बाईना मेसेज केला. अ‍ॅडमिनला मेल करून सरळ पोलिसात जाण्याची धमकी दिली. थोड्या वेळाने लेख उडालेले दिसले.

आता कोणतीच कारवाई करता येणार नाही का ? तशी त्या साईटची सभासदसंख्या मोठी दिसतेय. तिथे ही गोष्ट जाहीर करण्याची मात्र कोणतीच सोय नाही.

या बालकथा त्यांच्या 'मोस्ट पॉप्युलर पोस्ट्स ' मध्ये किती दिवस होत्या काय माहीत ! हे सर्व त्या बाईनी संदर्भ देऊन केले असते तरी चालले असते मला. पण ही शिरजोरी जास्त संतापदायी आहे.

लेख उडाले पण बाईचा किंवा अ‍ॅडमिनचा साधा दिलगिरीचा मेसेजही नाही !

अकु, पाठपुरावा कर नक्की.

ग्लोबल मराठीवर मी अजूनही ब-याच जणांच्या कविता लेख बघीतले आहेत...या साईटच्या अ‍ॅडमीनना हे लेख आणि कविता चोरिच्या आहेत हे ठाऊक नसाव का?

श्यामली, मला नाही वाटत की हे असं माहित असावं.... आपल्या मायबोलीचंच उदाहरण घे. इथे आधी दुसर्‍या कविंच्या कविता स्वतःच्या नावावर लिहिण्याचे उद्योग केलेले आहेत. वाचकांपैकीच कोणाच्या ते लक्षात आल्यावर, तसं जाहिर केल्यावर, आक्षेप नोंदवल्यावर त्यावर कारवाई केलेली आहे.

इतक्या असंख्य वेबसाईटस्, ब्लॉग्ज सध्या आहेत, कुठे कुठे पुरे पडणार? माझ्या एका मैत्रिणीची १९९९ च्या एका दिवाळी अंकात छापून आलेली कविता एका मराठी वेबसाईटवर कोणीतरी स्वतःची म्हणून लिहिली होती आणि त्यावर वाचकांचे भरपूर प्रतिसादही मिळवले होते.

Sad

माझ्या ब्लॉगवरचं माझं काही लिखाणही मला दुसर्‍या ब्लॉगवर मिळालेलं आहे एकदा. तिथे तक्रार केल्यावर मग ते उडवलं आणि काही दिवसांनी ब्लॉगच बंद झालेला पाहिला.

मितान, त्या माणसाच्या अजूनही काही साईट्स मिळाल्यात मला. सगळीकडे त्याने माझा वरचा चोरलेला लेख लावलाय. मराठी ब्लॉग अड्डा, ग्लोबल मराठी, माय विश्व ह्या साईट्स मिळाल्या आहेत...जिथे सगळीकडे हा माझा लेख दिसतोय, वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने!!!!

तक्रार दिली आहे मी दोन साईटवर.... तिसरी आता मलाच सापडत नाहीए!! इथे आपल्या माबोवरच्या काहीजणांनी त्या साईट्सवर लगेच प्रतिसाद दिलेत, लेख चोरलेला किंवा उचललेला असल्याचे. धन्स सगळ्यांचे! Happy

एक कल्पना -

आपल्या ब्लॉग वरचे लेख सहज कॉपी पेस्ट करता येणार नाहीत असे करा. हे करण्यासाठी या लिंक बघा
http://www.google.com/support/forum/p/blogger/thread?tid=4fe888d35779d34...
http://www.hypergurl.com/norightclick.html

आणि मायबोलीच्या अ‍ॅडमीन ना आपण विनंती करुयात की मायबोलीवरूनही कॉपी करता येणार नाही असे काहितरी करा.

मायबोलीवरिल लिखान text ऐवजी image स्वरुपात संपादीत करता आले तर.?
image मधे मायबोली चा लोगो व लेखकाचे नाव समाविष्ट करता आलं तर उत्तम.

लेख उडाले पण बाईचा किंवा अ‍ॅडमिनचा साधा दिलगिरीचा मेसेजही नाही ! >> Angry

दुसर्‍याचे लेख टाकायची हौसच आहे तर लेखकाच्या नावाखाली टाका ना स्वतःच्या नावावर काय टाकतात???
स्वतः लिहावं नाहीतर, दुसर्‍याचं श्रेय परस्पर लाटायची घाणेरडी सवयच असते बर्‍याचजणांना!!! त्रिवार निषेध! Angry Angry Angry

टिल्लू आणि सावली दोघांच्याही कल्पना उत्तम!!! मुग्धानंद, त्या लॉ चं जरूर लिहा बरं! कधीतरी उपयोगी पडेलच!

मी माझ्या ब्लॉगात सुरूवातीचे वाक्यच टाकते... मायबोलीवर पूर्वप्रकाशित आणि लिंक पण देते...सहजच टाकायचे, पण माहीत नव्हतं की असाही उपयोग होईल त्याचा!!! मितान, सर्व माबोकर ज्यांचे फेबू अकाऊंट आहेत, किंवा त्या साईट्सवर सदस्यत्व आहेत, ते सर्व तुझ्या वतीने या प्रकाराचा निषेध नोंदवतीलच! मोठ्ठा लेखच टाकते ब्लॉगवर नाहीतर मटात!! थांब!! Angry Angry Angry

मितान, तू दिलेल्या लिंकवर तुझ्या कथा दिसल्या नाहीत. मी पल्लवी शेलारच्या नावाने शोधलं तर नो रिझल्टस आले आणि मेंबर्समध्येही तिचं नाव नाहीये.. पळाल्या बहुतेक!!! Happy

जर आपले लेख कथा कविता कोणी असंच चोरून स्वतःच्या नावावर खपवत असेल तर समजेल कसं??? कारण आता कचर्‍यासारखे ब्लॉग्ज निघाले आहेत. प्रत्येकाचच सदस्यत्व घेणं शक्य होत नाही... Sad

मग मला वाटतेय, आपल्या लेखांचं, ब्लॉगचं आपणच बर्‍याच ठिकाणी मार्केटिंग करावं... जसं सोशल नेटवर्कींग साईट्स, मराठी ब्लॉगविश्व इ.

माझाही असाच काहीसा अनुभव.
अर्थात कुणाच्या का नावाने असो, दोन-चार लोक वाचतात हे माझ्यासाठी मोठं, पण तेही अर्धवट छापायचं ह्याला काय अर्थ?
http://www.yuvaadda.com/mimarathi/node/3926

हा त्रास पुन्हा पुन्हा कोणाला ना कोणाला होतोय..... निदान मायबोलीपुरता विचार करता एक विचार डोक्यात आला, तो ह्या धाग्यावर मांडलाय...... या त्रासातून गेलेल्या आणि त्याबद्दल चीड असलेल्या सगळ्यांनीच कृपया यावर मत मांडा.....

http://www.maayboli.com/node/23295

किवा त्यात अधिक काही मॉडिफिकेशन करता येणे शक्य असेल तर सुचवा... पण कुठेतरी इथल्या लेख्/कविता चोरण्यावर अप्रत्यक्षपणे लगाम घालूया... !!!

मी तिथे निषेध नोंदवलाय. पन अजून दिसत नाहीये.... हे फार वाईट आहे.... >>>
काल मी कमेंट दिली होती, तेव्हा कमेंटस् दिसत होत्या. आता दिसत नाहीयेत. मज्जा बघा, तक्रारीनंतर तो लेख उडवायचा सोडून तक्रारीच गायब केल्या आहेत. Sad

हे बर्‍याच वेळा होतं, माझ्या काही कविता तर कुठल्या कुठल्या ब्लॉगवर, मेल मध्ये , कोणा कोणाच्या नावावर छापलेल्या आढळतात, त्याला बंध घालण अशक्य आहे.

Pages