देत जा येऊन थोडी कल्पना

देत जा येऊन थोडी कल्पना !

Submitted by ज्ञानेश on 17 June, 2012 - 03:23

====================

रात्रभर फिरतोस कोठे सांग ना?
देत जा, येऊन थोडी कल्पना...

बोलला 'कैलास' हलवाई पुन्हा,
ओळ घे- तरही जिलेब्या पाड ना ! Wink

शब्द गाण्याचे विसरलो सर्व मी,
राहिली लक्षात पण नृत्यांगना !

गंध ऑफिसात हा कसला बरे?
कोण रात्री खाऊनी आले चना??

'मायबोली' च्या किती फर्माईशी
शेवटी वैतागले राधा-घना *

Subscribe to RSS - देत जा येऊन थोडी कल्पना