स्मशान वैराग्य
Submitted by श्रीमत् on 8 March, 2012 - 02:15
बोरिवलीची ट्रेन पकडल्यामुळे आज सात नं. फलाटाऐवजी पाच नं.फलाटावर उतरावे लागले. उशीर तर झालाच होता. धावत पळत खांदे वाकडे, तिरपे करत कसाबसा (नेहमीच्याच) गर्दीतुन पार्ले पश्चिमेच्या आकाशमार्गावर आलो (Sky walk). थोडे अंतर चालतो न चालतोय तोच खिशातला मोबाईल चुळबुळ करु लागला. सुरवातीला वाटले नको उचलुया. ऑफिसमधुन असेल. नाहीतरी मी लेट झालो होतोच. पण नंतर सवयीप्रमाणे न रहावुन फोन बाहेर काढला. स्क्रीन वर अण्णांचा नंबर. तिथेच मनात शंकेची पाल चुक-चुकली. जराही उसंत न लावता मी फोन काणाला लावला.समोरुन अण्णांचा अपरिचित असा गहिवरलेला आवाज्."अरे...... दादा आई....गेली........!...तुझी आज्जी गेली.....!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा