व्हाळ

कोकण - व्हाळ [ ओहोळ, नाला]

Submitted by भाऊ नमसकर on 29 April, 2011 - 12:20

'व्हाळ' शब्द बहुधा 'ओहोळ' वरून आला असावा. कोकणात बहुतेक गांवांत फिरताना व्हाळाची खळखळ कुठून तरी तुम्हाला साद घालत रहातेच. तुमचे कान तयार असतील तर व्हाळाच्या कोणत्या टप्प्यानजीक तुम्ही आहात, हेंही तुम्ही नेमकं हेराल; डोगराच्या उतारावरून कोसळणारा व्हाळ धबधब्यासारखा अविश्रांत कानावर धडकाच देत असतो, तिथून बागायतीत शिरला कीं जरा विसावून , सुखावून त्याचं लयबद्ध, हंळुवार खळखळणं तो सुरूं करतो ; तिथंही नधेच कुठं गर्द झाडीतून जाताना धसकावून, श्वास कोंडून ठेवल्यासारखा चोरपावलानी तो ती जागा पार करतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - व्हाळ