मायबोलीवर येताना

मायबोलीवर येताना....

Submitted by प्रज्ञा९ on 25 January, 2011 - 17:53

साधारण २००७ च्या शेवटी मी घरी इंटरनेटची सुविधा घेतली. प्रोजेक्ट पूर्ण करताना सतत लागेल म्हणून. आणि मग बाकीचा अभ्यास करताना सहज एकदा पुलंबद्दल काही माहिती मिळते का ते बघायला म्हणून गूगल केलं आणि पुलंच्या साइटबरोबरच मायबोलीचा शोध लागला. व्यक्ती आणि वल्ली मधून अनेक व्यक्तींच्या छान साइट्स मिळाल्या, पण खुद्द मायबोलीवरचं लेखन सुद्धा सापडलं. आणि "प्रथमग्रासे नवनीतप्राप्ती" व्हावी तशी दाद यांचं "नावात काय्ये!" हे विनोदी लेखन मिळालं. मग रोज एक(च) काहीतरी वाचायचं असं ठरवून शोध चालू झाला. त्या वेळी मराठी महिन्यांचे अर्काइव्ह्ज होते. त्यामुळे मूळ लेखन मिळायला थोडा वेळ लागे.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मायबोलीवर येताना