प्रकाशचित्रे मायबोली गणेशोत्सव २०१०

शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:27

काळ बदलला तशी वाहने बदलली. जुना मुंबईकर ट्रामच्या आठवणी काढून हळहळतो पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला लोकलशिवाय पर्याय नाही. तर या झुकझुकगाडी पासून ते २ तासात मुंबईहुन दिल्लीला नेणार्‍या विमानापर्यंत असंख्य वाहतुकीच्या साधनांचा वेळोवेळी आपण उपयोग करतो. या वाहतुकीच्या साधनांची काही छायाचित्रे तुमच्याकडे असतील तर चला तयार व्हा झब्बूसाठी!!!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.

विषय: 

शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:23

पांढरेशुभ्र आईसक्रीम आणि त्यावरची लालचुटुक चेरी, पारिजातकाच्या फुलाच्या केशरी देठावरच्या पांढर्‍या पाकळ्या, पिवळसर घरावरची विटकरी रंगाची कौले. यात डोळ्याला ठळकपणे जाणवतात ते दोन मुख्य रंग. तर असे हे दोन रंग अधोरेखित करणारी प्रकाशचित्रे या झब्बूसाठी अपेक्षित आहेत.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.

विषय: 

शेरास सव्वाशेर अर्थातच प्रकाशचित्रांचा झब्बू

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:14

2010_MB_Jhabbu_Poster.jpg

अरेच्या हे काय दिसतेय, हा तर पुण्याच्या दगडुशेठ हलवाई गणपतीचा फोटो, आणि हा, लालबागचा राजा..आणि हो हा कोणता आहे बरं, कमळावर विराजमान झालेला?? ...हा नक्कीच कसबा गणपती..नाही कळलं, अहो हे तर आपल्या मायबोलीकर दोस्तांनी टाकलेले फोटो आहेत. हो हो सगळ्यांनी स्वत: काढलेले, एखादा गणपती मंदिरातला तर एखादा गल्लीतल्या मंडळाचा सुबक देखाव्याबरोबरचा.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रे मायबोली गणेशोत्सव २०१०