तुम्हीच शोधा
Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
18 वर्ष ago
2
जेंव्हा भळभळत असतात
जखमा आणि कवी भेटतो
काय बघतो? काय दिसते?
काय घेउन जातो?
तुमच्यावर इलाज करण्यासाठी
एखादा डॉक्टर येइल कदाचीत नाही
कवी साथ देइल? दिली तर कोणाची देइल?
कवीसाठी सगळ्याच जखमा साथीच्या असतात
माणुस असाल तर जिभेने जखम चाटणार नाही तुम्ही
त्म्ही विव्हळाल, तुम्ही हसाल कदाचीत हात जोडाल
कवी काय करेल? कवी त्या जखमेच काय करेल?
त्या जखमेमागच्या पिवळ्या क्शणात हात घालेल?
कवी काय करू शकतो? कवीला व्यवहार आहे
कवीला त्याची स्वतःची जखम आहे
ती नावासाठी भळभळते आहे, माफ करा
तुमच्या जखमेच एखाद मुक्तछंदी,
काव्य, वा वा गझल, तिरळे आणि चारोळे
जे काही बनवता येइल ते बनवण भाग आहे...
तुमचे तिर्स्कार नंगे करण्याआधी एक सांगा
जेंव्हा भळभळत असतात
जखमा आणि तुम्ही भेटता
काय बघता? काय दिसते?
तुम्ही काय घेउन जाता?
विषय:
प्रकार:
शेअर करा
काहीच
काहीच बरोबर घेऊन जाता येत नाही.
एक जखम तेवढी आपली असते
तीही शेवटपर्यंत सोबत रहात नाही
उरतो एक निर्विकारपणा
तो मात्र आता कायमसाठी सोबत.
शोधून न सापडले नाही....
खूप दिवसांनी पेशवेबाज कविता वाचायला मिळाली.