व्हिडिओ क्लिप स्प्लीटींग

Submitted by चंपक on 11 August, 2009 - 08:27

माझ्याकडे एक व्हिडीओ आहे १३ मिनीटांचा. यु ट्युब वर फक्त १० मिनीटांचा व्हिडेओ अप्लोड करता येतो असे वाटते. कारण माझा व्हिडीओ दोन वेळेस रिजेक्ट झाला.

त्या १३ मिनीटाच्या व्हिडीओ चे दोन छोटे भाग केले तर ते चालेल असे वाटते.

ते कसे करतात?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंपकशेठ, कुठल्या format मध्ये आहे. गुगल पिकासा मध्ये सहज करता येईल. आणी तिथुन direct युट्युबमध्ये अपलोड करता येईल.

पिकासामध्ये व्हिडिओ फाईल उघडा, त्यावर राईट क्लिक करुन View and Edit क्लिक करा.
तिथे तुम्हाला Video Progress Bar च्या उजवीकडे Select a new starting point/Select a new ending point असे दोन options दिसतील. ते वापरुन तुम्ही सहज असे तुकडे करु शकता आणि नाट्याने सांगितल्याप्रमाणे थेट युट्युबमध्ये upload करु शकता.

पिकासा मध्ये असे भाग करता येतात ? ट्युटोरिअल द्या >> पिकासाच्या नविन आवृत्तीत ही सुविधा आहे. पिकासा ३.

धन्यवाद! नाट्याशेठ, चिनुक्स, क्ष.

फाईल टाइपः मुव्ही क्लिप. ७०० एम बी
(सोनी व्हिडीओ कॅमेरा ची रेकोर्डींग आहे.)

...करुन बघतो अन मायबोलीवर लिंक देतो!

पिकासा व्हिडीओ स्प्लीटींग चे सॉफ्ट वेअर कुठे मिळेल?

अन ते मॅच सिस्टीम साठी हवे आहे. कुणी सांगु शकेल का?

लॅब च्या पीसी वर विंडोज आहे अन घरी मॅक! घरी मेडिया प्लेयर नाही अन लॅब ला सोफ्ट्वेअर डाउन्लोड करु शकत नाही!!!!

काय बी जमले नाही.
एका पीसी त मॅक हे, तर तिथ माझ्या कॅमेरा ची फाईल उघडत नाही. अन जिथे विंडोस हे तिथे काहि डाउनलोड करता येत नाही!

असो. मी युसेन्डिट ने पाठवुन दिली फाईल. पण मला ऑर्कुट वर टाकायची होती ते राहिलेच भो!

नगरी भो! Happy

मी पिकासा ३ डाऊनलोड केले आहे. त्यात व्हिडिओ स्प्लिट कुठे दिसेना? ते सगळे फोटो बद्द्लच बोलत आहे.

आता माझेकडे विंडोस७ ला लॅपटॉप आहे. त्यावर हे वापरुन व्हिडीओ स्प्लिट करता येईल का?

विंडोज ७ मधे मुव्हि मेकर मधे जाउन सहज स्प्लिट करता येईल. तुम्हाला महिती 'हेल्प सेंटर' मधे मिळेल.
ही साईट बघा:
http://www.windowsmoviemakers.net/Tutorials/HowToEditVideo.aspx
तित्ये मुव्हिमेकर बद्दल अजुन सगळी माहिती मिळेल.
आणि जरी तुमच्या लॅबमधे सॉफ्टवेयर डाउनलॉड होत नसेल तरी ते तुम्ही घरी डाउनलॉद करुन पेन ड्राइव्ह किंवा सि.डी ने विंडॉज पिसी मधे नेउ शकता ना?

मुव्हिमेकर विंडोज ७ मधे आधिपासुनच असते.

चंपक, पिकासा ३ वर व्हिडिओ स्प्लिट करता येतात की...
तो व्हिडिओ अ‍ॅड करा पिकासा वर, आणि एडिट मोड मधे ओपन करा.. तिथे आहेत ओप्शन्स
विंडोज मूव्ही मेकर पण बेस्ट आहे.

लिंबुटिंबु, हो आवाज जोडता येतो
मुव्हिमेकरच उदाहरण घेतल तर तिथे आधी आवाजाची फाइल ईपोर्ट करा आणि मग माउसने ती फाईल ड्रग करुन एडिओ समोरच्या पट्टित आणा.

गाण्याच्या ( Audio Files ) कोणत्या फॉर्म मधे असल्या तर त्यातला फक्त गायकांचा आवाज काढुन टाकुन फक्त संगीत ठेवता येईल जेणे करुन तेच गाणे आपल्याला सादर करण्याचे असल्यास तालवाद्ये अथवा सुरवाद्यांच्या साथीशिवाय सादर करता येईल.

माझ्या मते आजकाल ( Audio Files ) मध्ये वेगवेगळ्या ट्रॅकवर हे रेकॉर्डिंग असते.

हो चंपक येते करता.
फायरफॉक्स आणि क्रोम साठी Addon आहे.. easy youtube downloader
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/10137/
http://www.chromeextensions.org/other/easy-youtube-video-downloader/
यात flv format मध्ये video मिळेल.
आणि video split करायला हे http://www.exp-flv.com/flv-editor/ हे उपयोगी पडेल.

धन्यवाद!

स्प्लिट चा अजुन एक प्रयोग करतो मग...अजुन काही जमलेले नाही. आज पाहतो.

व्हिडीओ डाउन्लोड महत्वाचे आहे. गावाकडे नेट ला फार स्पीड नसते. मग शहरात येऊन व्हिडिओ डाउनलोड करायचे अन मग गावाकडे दाखवायचे !

धन्यवाद.

video split करायला हे http://www.exp-flv.com/flv-editor/ हे उपयोगी पडेल.>>>>>> यात माझ्याकडील व्हिडीओ कि जो सोनी कॅमकॅडोर ने रेकॉर्ड केलेला आहे, तो कंपॅटीबल नाही!

पण हा प्रोग्राम जास्त युजर फ्रेन्डली वाटतोय, डेमो वरुन तरी Happy

विंडोज मुव्ही मेकरवर एडीट करुन तयार केलेली नव्ही क्लिप सेव्ह करुन व्हीसीडी बनवण्यास अडचणी येत आहेत. हे करताना पी.सी हँग होतो. यावर पर्याय काय ? रॅमची कपॅसिटी वाढवल्याने ही अडचण दुर होईल का ?