Submitted by आशुतोष०७११ on 11 August, 2009 - 03:12
सांची हे मध्य प्रदेशातल्या रायसेन जिल्ह्यातील एक गाव्.भोपाळपासुन ४६ कि.मी. आणि विदिशापासुन १० कि.मी. अंतरावर आहे.
सांची इथेच मुख्य स्तूप आहे. हा स्तूप प्रेम्,शांति,विश्वास आणि साहस यांचे प्रतीक आहे. ह्या स्तूपाची निर्मिती सम्राट अशोकाने केली.इथल्या स्तूपाचा थोडक्यात इतिहास असा.दुसरया शतकात शुंग सम्राट पुश्यमित्र ने ह्याचा बराचसा विध्वंस केला पण त्याचा मुलगा अग्निमित्र ने परत ह्या स्तूपाची डागडुजी केली.
ह्या स्तूपाचे प्रवेशद्वार तसेच प्रदक्षिणेचा मार्ग यांची बांधणी सातवाहन वंशीय राजा सातकर्णी याच्या कालखंडात झाली.
मुख्य स्तूप
स्तूपाच्या द्वारावरील सिंह
मुख्य स्तूप
स्तूपाचे प्रवेशद्वार
मुख्य स्तूपाच्या शेजारील स्तूप
प्रवेशद्वारावरील कोरीवकाम
प्रवेशद्वारावरील कोरीवकाम
प्रवेशद्वारावरील कोरीवकाम
गुलमोहर:
शेअर करा
नेहमीप्रमाणे फोटो मस्त!
नेहमीप्रमाणे फोटो मस्त!
छान फोटोज , पण अगदीच थोडक्यात
छान फोटोज , पण अगदीच थोडक्यात आटपलसं का ?
अरे! कधी गेलेलास? मी ३१
अरे! कधी गेलेलास? मी ३१ डिसेंबरला सांची ला होते.
मस्त फोटो. उद्या झब्बू देईन.
२००९ च्या धाग्यावर आत्ता
२००९ च्या धाग्यावर आत्ता प्रतिसाद यायला सुरूवात झाली?
पण फोटो बेस्ट आहेत
मस्त फोटो!! आज बघीतले.
मस्त फोटो!! आज बघीतले.
२००९ च्या धागा आत्ता वर आल्या
२००९ च्या धागा आत्ता वर आल्या मुळे छान फोटोज बघायला मिळाले.
मस्त फोटो ! पण त्या पुश्य
मस्त फोटो ! पण त्या पुश्य मित्राचे डोके का फिरले अशी छान कलाकृती उध्वस्त करायला?:अओ:
अरेच्चा धाग्याची तारीख
अरेच्चा धाग्याची तारीख पाहिलीच नाही. latest आहे असं धरुन चालले.
सुंदरच स्तुप आहे, फोटोज पण
सुंदरच स्तुप आहे, फोटोज पण सुरेख!
मस्त आहेत फोटो. पण माहिती
मस्त आहेत फोटो. पण माहिती अगदीच त्रोटक दिली.
ब-याच सुस्थितीत आहे हा स्तुप. इतिहासाच्या पुस्तकात याच्या प्रवेशद्वाराचे चित्र पाहिलेले. प्रत्यक्ष त्याच स्थितीत असेल का ही शंका होती. तसेच आहे हे पाहुन खुप आनंद झाला. पुढेमागे कधी जमले तर प्रत्यक्षही पाहिन.
आशुतोष, मस्त फोटो. २००९ चा हा
आशुतोष, मस्त फोटो. २००९ चा हा धागा मीही बघितला नव्हता
पुष्यमित्राने सांची स्तूपाचा विध्वंस केला असं प्रतिपादन सर जॉन मार्शल यांनी केले होते खरे, पण त्याला खूप ठोस आधार नाही. त्यामुळे विवादित मत आहे. मूळ अशोकाच्या कारकीर्दीत बांधला गेलेला विटांचा स्तूप शुंगकाळात जीर्णोद्धार करून भव्य केला गेला.
स्तूपाविषयी अधिक माहिती http://asi.nic.in/asi_monu_whs_sanchi.asp
http://asi.nic.in/asi_monu_whs_sanchi_detail.asp
आम्ही गेलो त्या दिवशी नेमका
आम्ही गेलो त्या दिवशी नेमका पाऊस. त्यामुळे थंडीही होती. त्यामुळे वरच्या लख्ख उन्हाच्या फोटोंना हा माझा पावसाळी झब्बु :
मुख्य स्तुप

मुख्य स्तुपाचे प्रवेशद्वार



अजून एक छोटा स्तुप
भिख्खुंची राहण्याची जागा आणि पाणी साठवण्याची जागा