मायबोलीचं नूतनीकरण पूर्ण

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचं नूतनीकरण पूर्ण झालं आहे. हे फक्त अंतर्गत प्रणालीचं नूतनीकरण असल्याने सभासदांच्या नेहेमीच्या वापरावर (User experience) काही फरक होऊ नये.
नूतनीकरणाचा एक अगोदर लक्षात न आलेला परिणाम (side effect) म्हणजे तुमची विचारपूस आता सदस्यखात्यात गेली आहे. ती पूर्वीसारखी कशी दाखवता येईल यावर प्रयत्न चालू आहेत.

जर तुम्हाला काही बदल/अडचणी जाणवल्या तर त्या आम्हाला कळवा.

विषय: 
प्रकार: 

एका पानापेक्षा जास्त प्रतिसाद असलेल्या पानांवर प्रतिसाद दिल्यावर त्याच पानावर न राहता पहिल्या पानावर जात असू ती अडचण दूर केली आहे

विपु मध्ये नको असलेल्या खरडी उडवण्याची काहीतरी व्यवस्था करा. त्या पण एकदम उडवता याव्यात. सध्या एकेक उडवावी लागते.

हां यार, विपु पहिल्या पानावर दिसत रहायला हवी
तशा मला फारश्या विपु येत नाहीत, पण आल्यातर लगेच कळते ना!
बाकी चाललय ते चालू द्या साबुस्तीने
जमल्यास रन्गित अक्षरे/रन्ग पुरवा हो, हे फारच ब्ल्याक अन व्हाईट वाटतय!

>>>आणि कुणी मायबोलीला कधी भेट दिली होती ते ही दिसत नाहिये.<<<
हे तर खुपच महत्वाचं आहे ना? :p
यावरून गम्मत म्हणुन एक कल्पणा डोक्यात आली... ऑर्कुटप्रमाणे माबोवरही जर कुणी कुणाची प्रोफाईल कधी पाहिली हे ही कळलं तर? Happy

>>>>. कुणी कुणाची प्रोफाईल कधी पाहिली हे ही कळलं तर?
नुस्ती प्रोफाईल की विपु देखिल सुचवायची आहे तुम्हाला? Wink
कोण कुणाच्या विपुत डोकावले........ हा हा हा.. Lol

मला ऑर्कुटसारखी "फ्रेण्ड्स्ची" सोय हवी हे Happy
(इग्नोर नाय देता येत तर किमान हे तरी मिळाल तर बर होईल, जेवढे मित्र तेवढ्यान्नाच फॉलो करण सोप जाईल
ते अन्नुलेख सम्राट काय कामाचे उपयोगाचे नाहीत, नुस्तेच अनुल्लेख करत बसतात, इग्नोरची सुविधा मागतोय तर त्याचा देखिल "अनुल्लेख" करतात! Lol
आता इग्नोर सुविधा मिळाली तर "अनुल्लेख" करणे सोप्पे जाणार नाही का त्यान्नाच? पण नाही ना! ताकाला जायच अन भाण्ड लपवायच अशातली गत यान्ची! Proud Light 1 )

psg यांनी म्हटल्याप्रमाणे 'अजून वाचायचय' वर पूर्वी फक्त नवीन नोंदी झालेले समुहच दिसायचे. आता मी सभासद असलेले सगळे समुह आणि त्यांच्या अंतर्गत असलेले सगळे बाफ दिसतात - काही नवीन नोंदि नसतानाही.

इमेज अपलोड होतच नाहीये Sad दरवेळेस साईझ मोठाहेची पाटी दाखवत्ये सिस्टीम! Happy अगदी थम्बनेल चित्र दिल अपलोडला तरी घेत नाहीये

कुणी कुणाच्या प्रोफाईलला कधी भेट दिली ते नाही कळलं तरी चालेले.
निदान इथे लोकांची डोकी शाबूत तरी राहतील त्याने. Light 1
लिम्ब्या आधी बेसिक गोष्टींचं पाहू.. नको ते डिमांड करत बसलो तर आहे ते सुद्धा जाईल.

१. प्रत्येक संदेशासोबत 'प्रतिसाद' असा दुवा येतोय.
२. याच पानावर 'Save' आणि 'प्रतिसाद तपासा' असे एक इंग्रजी आणि एक मराठीत दिसतेय.

मला वाटले होते,आधी दिलेल्या प्रतिसादाला आपण प्रतिसाद देऊ शकतो. पण तसे न होता माझा प्रतिसाद खालीच दिसतोय !

Your virtual face or picture साठी मी एक animated GIF file upload केली आहे. पुर्वी ती व्यवस्थित हलताना दिसायची, आता एक स्थिर प्रतिमा दिसते. असे का ?

ही पोस्ट इग्नोर करा, बहुतेक माझ्या ब्रोऊझर मधे लोचा असेल! Happy

************************
मी पीपी बीबी वेगळ्या खिडकीत उघडला, तिथे मात्र
limbutimbu
अजून वाचायचंय
माझे सदस्यत्व
नवीन लेखन करा
जाण्याची नोंद
या लिन्का दिसत नव्हत्या! बहुधा माझ्या गावात वा अन्य विभागातील बीबी उघडताना असे होत असेल काय?
या बीबी वर मात्र या लिन्का दिसताहेत Happy
>>>>> नन्तर भर घातली....>>>>>
अरेच्च्या? आता पुन्हा बघितल्यावर दिसल्या! श्रीवर्धनवर पीपीवर, यस्जीरोडवर सगळीकडे दिसल्या, मग मगाशि का दिसल्या नव्हत्या?
एक हे, पीपीवर त्या मधे कुठेतरी उजवीकडे दिसतात Sad कायतरी लोचा आहे खास
************************

आपल्या विपू मधे एखाद्याने लिहिलेल्या पोस्ट्ला त्याच पोस्ट्खालील प्रतिसाद लिंक वापरून उत्तर दिले तर ते त्या व्यक्तीच्या विपू मधे दिसत नाही, आपल्याच विपु मधे tree सारखे दिसत राहते.

हो ते आपल्याच विपुत दिसत राहते. खरेतर तसे इथे(म्हणजे इथल्या प्रतिसादावर) करायचे अ‍ॅडमीन यांचे प्रयोजन असावे.असो ! खूप डोके खाल्ले तुमचे.....लवकरच सगळे सुकर करायला तुम्हाला शुभेच्छा ! Happy

अ‍ॅडमिन,

नविन लेखन वर क्लिक केल्यानंतरच्या पानावर, ग्रुपमधे नवीन व माझ्यासाठी नवीन ह्या टॅब ची जागा बदलली आहे. ती जरा पहाल का?. फक्त शब्द बदलले आहेत. त्यांच्या लिन्क जुन्याच आहेत.

- अनिलभाई

प्रतिसाद ही लिन्क प्रत्येक पोस्टला दिसते आहे ती काढून टाकतील नंतर बहुतेक. पहिल्यांदा नवीन मायबोलीत असे झाले तेव्हा 'नवीन आलेला प्रतिसाद शेवटीच दिसावा, मध्येच कुठेतरी नको' (ट्री मध्ये नको) अशी लोकांची मागणी होती. त्याप्रमाणे ती लिन्क काढून टाकली. हा विपुचाही असा प्रॉब्लेम तेव्हा झाला होता. होईल सगळे व्यवस्थित हळूहळू. Happy

मला काही अडचण नाहीये.. पण आज मला नवीन पोस्टी अशा दिसल्या..
टोटल १७ पोस्ट्स व त्यात १८ नवीन.. असं नकोय ना!
mb_shanka.jpg
वाह.. इमेज अपलोडींग मधे केलेले बदल आवडले.. !

अ‍ॅडमिन-टीम,

नविन माबो वर, प्रतिसादामधे स्वतःची सही साठवुन ठेवता येत नाही. सही (signature), ची सुविधा बंद केली आहे काय ?

१. माझ्यासाठी नवीन पान - हा नवीन प्रणालीत माहित असलेला bug आहे. त्यावर उपाय शोधण्याचं काम चालू आहे.
२. विचारपूस - विपू मधे एखाद्याने लिहिलेल्या पोस्ट्ला त्याच पोस्ट्खालील प्रतिसाद लिंक>> हे ही लवकरच ठिक करणार आहोत.

३. सध्या सहीची सुविधा बंद केली आहे.

विपु मधे नवीन नोंद आहे की नाही ते लॉग इन झाल्यावर कधीही दिसत रहावं ती नोंद बघेपर्यंत. पूर्वी विपु ची वेगळी लिंक होती त्यामुळे कळायचं आता दर थोड्या वेळाने माझे सदस्यत्व मधे जावं लागतं बघायला. ती वेगळी लिंक परत पूर्वीसारखी द्या किंवा मग नवीन (नंबर) विपु अशी पाटी विपु आल्याल्या त्या त्या व्यक्तीला दिसू लागेल पानाच्या वरती असे तरी काही करा.

हे बहुदा आधीही कोणीतरी सांगितलेले असावे. पण पुर्वीचे 'प्रतिसाद द्या' हे बटन 'Save' ह्या नावाने दिसते. कॄपया लेबल चेंज करा.

अ‍ॅडमीन,
वर उजव्या बाजुला येणार्‍या अ‍ॅड मधुन ती घाणेरड्या दातांची अ‍ॅड बंद करता आली तर खुप बर होईल. दुर्लक्ष करायच म्ह्टलं तरी होत नाही . खुपच किळसवाणं वाटत हो.:( Sad Sad

Pages