सिंगापूरमधली खरेदी

Submitted by admin on 31 July, 2009 - 08:06

सिंगापूरमधल्या खरेदीबद्दलचं हितगुज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो सींगापुरकर तुमच्या तिथे खरेदि करण्या साठि जागा कोणती आहे? माझे आइ, बाबा आणि सासु बाइ जाणार आहेत फिरायला. क्रुपया सुचवा.

केतकी,
सिंगापुर मधे बुगीस स्ट्रीट कपड्यांसाठी, fashion accessories साठी चांगली जागा आहे.
त्याशीवाय ऑर्चड रोड वर बरयाच brands ची दूकानं आहेत.ऑर्चड रोड वरच Takashimaya आणी सींगापूरा प्लाझा हे दोन्ही मॉल्स पण चांगले आहेत.

चायनाटाउन मधे पण बर्याच लहान- सहान गोष्टी मिळतात.
Electronic वस्तूंसाठी Sim-Lim Square हे ऊत्तम ठीकाण आहे.Sim-Lim Square बूगीस स्ट्रीट पासुन अगदी जवळ आहे.
भारतीय पर्यट़क Mustafa Centre ला भेट दिल्याशीवाय सींगापूर ट्रिप झाली असं म्हणत नाहीत.
ही खुपच मोघम माहिती आहे.अजून तपशीलवार माहिती इथले जुने-जाणते सींगापूरकर् देतीलच.

स्वरा माहितीसाठी आभारी आहे. सांगेन आइ बाबांना वरच्या जागांबद्दल.

Sim-Lim Square बद्द्ल एकल आहे.

तशी मी जेव्हा १ वर्षापुर्वी आले होते तेव्हा Mustafa Centre ला गेलेले. पण काहि खास नाहि वाटल तीथे. मग आम्हि फुनान मॉल मध्ये शॉपिंग केलि.

माझा प्रश्न सुद्धा रीमा सारखाच आहे , माझे आईबाबा बँकॉक , सिंगापूर , मलेशिया बघायला येत आहेत , तर कसली खरेदी करावी आणि कसली करू नये ? काय स्वस्त आणि खात्रीशीर मिळेल ? ट्रीप ऑर्गनायझर हे सर्व सांगेलच , पण तरी तुमचे खरेदीचे अनुभव कसे आहेत ?

मला तिथे कपडे (टिशर्टस) चांगले मिळाले होते. बँकॉकला सरकारी खाणीमधून मी पाचू, माणिक, इंद्रनील वगैरे खरेदी केले होते. तिथूनच फ्राईड दुरियान, कँडीड फळे वगैरे आणले होते.

ऑर्किड्स ची आवड असेल तर तिथे, टिश्यू कल्चर केलेली ऑर्किड्स मिळतात. (पण कदाचित त्याच्या आयातीवर आता बंदी असेल) पण तिथेच वेगळी लॉकेट्स, किचेन्स मिळतात. सगळ्यांना भेट द्यायला या वस्तू छान असतात. एरवी उत्तम कॅमेरा घेऊन भरपूर फोटो काढणे उत्तम.

इलेक्ट्रॉनिक्स मधे आता काहि अनोखे उरलेले नाही. (२० वर्षांपूर्वी माझी बहिण सिंगापूरहून वॉशींग मशीन घेऊन आली होती... ) सोन्याच्या भावातही आता फार फरक नाही.