Submitted by छाया देसाई on 29 July, 2009 - 19:07
पडदा पडला प्रेक्षक उठले
मुखवटे फेकुया
आता खरे-खुरे असुया
आता खरे-खुरे असुया
हावभाव नि वेशभुषा
प्रसंगासवे वठले
हवे तिथे अन तिथेच केवळ
प्रकाश झोतही सजले
दिवस निशेचे रंग मुलायम
कवेत घेउया
आता खरे-खुरे असुया
आता खरे-खुरे असुया
नेणिवेची अक्षरे
जाणिवेत यावी
सैरभैर पाखरे
एकसुरे गावी
धडधडणार्या सळसळणार्या
जाणिवा जाणुया
आता खरे-खुरे असुया
आता खरे-खुरे असुया
छाया देसाई
गुलमोहर:
शेअर करा
थिम छान
थिम छान आहे !
-हरीश
अतीशय
अतीशय छान.... नेहमीच असे असुया
गिरीश
आवडली
आवडली कविता. कधीतरी मुखवटे बाजूला सारून चेहरा दाखवायलाच हवा!
क्रान्ति
वो पराये दर्द अपनाता चला है | हम भटकते हैं खुदी के दायरे में ||
http://www.agnisakha.blogspot.com/
http://ruhkishayari.blogspot.com/
आवडली
आवडली कविता
--------------------------------------------
संवादाचा तुटता धागा, वाद घेतसे त्याची जागा
दुखावलेले हळवे मन, सांधत बसते वेडे क्षण
गेला क्षण हा काल असे, उद्या न वेड्या येत असे
आज आजची करुया बात, टाकुन देऊन अपुली कात
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
________________________________________
प्रकाश
वार्याची
वार्याची बात !
वार्यावरची नाही !! ---
" छान! "
आवडली, छान
आवडली, छान आहे
मस्त. ...............
मस्त.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे
कविता
कविता आवडली
मित्र
मित्र मैत्रिणिना प्रतिसादाबद्दल धन्यवाद .
इथूनच booking केलेले बरे पडेल
...