सलीम... अन अनेक मित्रांसाठी...!!!

Submitted by Girish Kulkarni on 27 July, 2009 - 21:54

********************************

चुकलेल्या इतिहासाची बहकलेली साक्ष घेवून
तू वर्तमानाची जी वाताहत लावलियस
........ती जरा समजून घे मित्रा
अशान माणूसपण मिळवण्याच्या तुझ्या झुंडींच्या वल्गना
किती अक्राळ-विक्राळ आहेत
........ते जरा समजून घे मित्रा
झंझावाताचे इशारे देवून तूला पेटवणार्‍या ....
त्या तूझ्या म्होरक्या मशालींना जरा विचार......
तुरूंग बदलल्याने क्रांती होत असते का म्हणून ....!!!!!!!

*********************************

गुलमोहर: 

क्रांती ही शांतीची मोठी बहीण.
धाक्ट्या बहीणीने तोंड ऊघडू नये म्हणून सगळ्या क्षेत्रांतून तोंड खूपसणे हाच तीचा उद्योग.
पाइप व सीगार धारकांची ही आवडती नार. त्यांचे जीवन हीच्यावर अवलंबून.
जरूर बघा - http://www.zeitgeistmovie.com/dloads.htm
ह्या साइट्वर - zeitgeist movie - बघा नंतर ठरवा क्रांती वापरणारे खरे सूत्रधार कोण ?
सूत्रधारांच्या लेखी शहीद होतात ते माथेफीरू.

प्रिय मित्रांनो :
आपणां सगळ्यांचेच मनःपुर्वक आभार !!!
आपणांपैकी बर्‍याच जणांच मला मार्गदर्शन लाभलय... त्याचा कायमच ऋणी राहीन!!!
बाळू सोनवणेंचा खास उल्लेख : ही माझी मायबोलीवरची पहीली ओळख - !!!
अज्ञात्,निनाद्,श्रीकांत्,अश्वीनी,कवीता नवरे,प्रकाश्,क्रांती,कौतुक्,उमेश,विलास अन गणेश कुळकर्णी या सगळ्यांचे अगदी सुरुवातीपासुनचे सततचे प्रोत्साहन ,
धनु,सुमेधा,माणीक्,मनोज्,दाद्,सानीका,राधा कुळकर्णी यांच सततच लक्ष अन वेळोवेळी दिलेले सल्ले,
चेतना,रैना,किरु,सुमती,अल्काकाटदरे,माशा,सुपमॉम्,शरद,कल्प्,कमोल्,अजय्,शालु, सुर्यकांत्,हर्शा,अ‍ॅशबेबी अन विनविन-आपले सगळ्यांच मार्गदर्शन अन सपोर्ट :
या सगळ्या गोष्टी आता सततच्या स्मरणांत राहातील.

लोभ असावाच हा आग्रह...

सविनय ,
गिरीश कुळकर्णी

घाटदार आणि समर्पक! विशेषतः
तुरूंग बदलल्याने क्रांती होत असते का
अगदी चपखल!
अभिनन्दन!!
बापू

दत्तराज,बापू,श्री.जोशी,ज्योती आणि "झाड"

आपल्या प्रोत्साहनाबद्दल हार्दीक आभार ...!!!

लोभ असावाच हा आग्रह !!!

सस्नेह : गिरीश

गिरिश,
तुझ्या कवितेचे मायबोलीने केलेले कौतुक रास्तच आहे.
खूप सहज, सुन्दर व वर्मावर हात ठेवणारी ..... साधीच पण नेमकी शब्दयोजना.
खूपच छान!!

चुकलेल्या इतिहासाची बहकलेली साक्ष घेवून
तू वर्तमानाची जी वाताहत लावलियस
........ती जरा समजून घे मित्रा
>>
क्या बात है, अप्रतिम......

sumati_wankhede ,
शब्दांशिवाय सुंदर गोष्ट दुसरी जगात कुठली आहे !
>>
आहे ना!
विचार, जे शब्दाना अमर बनवितात ते विचार असतात.
गिरीशजी, तुमचे शब्द आणि विचार दोन्ही आवडलेत.

त्या तूझ्या म्होरक्या मशालींना जरा विचार......
तुरूंग बदलल्याने क्रांती होत असते का >> व्वा!!!!

Pages