मेरीलँड

Submitted by admin on 26 July, 2009 - 21:31

मेरीलँडमधले मायबोलीकर

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेरीलँड मध्ये असतात तर लगेच हजेरी लावा.. बाग राज्याच्या ए. वे. ए. ठि.ला आमंत्रण मिळेल लगेच. Happy

ghoshana.jpg

नमस्कार मंडळी!!

वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं. आपल्या मायबोलीवरदेखील गणेशोत्सव दणक्यात साजरा होतो आहे. आणि बघता बघता बाप्पांना निरोप द्यायची वेळ येणार. निव्वळ विचारानंदेखील मन थोडं खट्टु होतं खरं! पण बाप्पांना 'पुढच्या वर्षी लवकर या' सांगून बोळवलं की निवांत बसायला वेळ आहेच कुठे? कारण दिवाळी अंकासाठी लिखाण करायचंय!

एव्हाना सगळ्या मायबोलीकरांनी दिवाळी अंकाची घोषणा वाचली असेलच. पण कामाच्या गडबडीत दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचा विसर पडू देऊ नका! महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अंकात एक खास, वेगळा विभाग असणार आहे. तेव्हा त्या अनुषंगानं साहित्य पाठवण्याचं लक्षात असू द्या. तुमच्या कथा, ललित लेख, विनोदी लेख, कविता, गझलांशिवाय अंकाला शोभा नाही! तेव्हा लवकरात लवकर लिहिण्याचं मनावर घ्या.

साहित्य पाठवण्यासाठी इथे जावं लागेल. एकाच बैठकीत लेखन पूर्ण झालं नाही तरी हरकत नाही. फक्त लेखन स्थिती 'अपूर्ण' ठेवून save वर टिचकी मारा. तुमचं अपूर्ण लेखन इतरांना दिसणार नाही. वेळ मिळाला की, त्या दुव्यावरच्या स्वतःच्या 'सदस्यत्वा'तून 'पाऊलखुणां'त जाऊन अपूर्ण लिखाण पूर्ण करता येईल. लिहून, तपासून झाल्यावर 'सुपूर्त करण्यायोग्य'वर टिचकी दिलीत की फक्त संपादक मंडळाला ती साहित्यकृती दिसू लागेल.

तुमचं साहित्य ५ सप्टेंबर, २००९च्या आत संपादक मंडळाकडे सुपूर्त व्हायला हवं. लागणार ना लिखाणाला?

दिवाळी अंकात साहित्य पाठवण्यासाठी काही मदत लागली तर नि:संकोच sampadak@maayboli.com या पत्त्यावर ईमेल पाठवून किंवा 'विचारपुशी'त जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg