ताकापूनामधली फूले

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

न्यू झीलंड ला गेलो होतो त्यावेळी टिपीकल प्रोग्रॅम असा काहि नव्हता. नुसताच भटकत होतो. त्यावेळी टिपलेली हि अनोखी फुले. आधी लिहिल्याप्रमाणे जून म्हणजे तिथे हिवाळा. बहर नव्हता ( पण शिशिर असा तर बहर कसा असेल असे वाटल्यावाचून कसे राहील ? )

हा ऑर्किडचा प्रकार वाटला, तरी ऑर्किड नाहि.

nz1.jpg

हा त्यांचा कुर्डू म्हणावा का ? रस्त्याच्या कडेला उगवला होता.

nz2.jpg

हे पण असेच रस्त्याच्या कडेचे फूल. काय मस्त रंग होता !!

nz3.jpg

हा फोटो मी खूप लांबून घेतला आहे. जरा अस्पष्ट आहे, पण अगदी आपल्या तिरंग्याचे रंग आहेत या फूलात.

nz4.jpg

हि अश्या तर्‍हेची फुले लाल रंगाच्या अनेक छटात होती. तपमान खूपच कमी असल्याने, बरेच दिवस झाडावर असत ( पण त्याचमूळे कळ्या लवकर उमलत नसत )

nz5.jpg

रस्त्याच्या दूभाजकावर सगळीकडे हि झाडे होटि. फुलोरा सहज आठदहा इंच व्यासाचा. सगळे फुलोरे सुकले होते. हा एकच तेवढा टिकून होता.

nz6.jpg

सहा सात इंच असे उभे फूल होते हे. आधी वाटले पानेच असतील आणि वर सुरवंट आसतील, पण तसे नव्हते.

nz7.jpg

आणखी आहेत बरं का !!!

विषय: 
प्रकार: 

दिनेश फुल सुंदर आहेत आणि फोटोज पण मस्त आलेत ...

मस्त आहेत सगळीच फुले..पण शेवट्ची दोन जास्त आवडली.

छानच. शेवटचा फोटो सही. मऊमऊ पिसांचा गुच्छ वाटतोय. Happy