गणेशोत्सव २००९ पूर्वतयारी

Submitted by संयोजक on 22 July, 2009 - 22:31

मायबोलीकरानो
२००९ सालचा गणेशोत्सव जवळ आला आहे. तेव्हा यंदा कोण कोण संयोजन समितीत भाग घ्यायला तयार आहेत ते इथे लिहा अथवा sanyojak या ID ला संपर्क करून कळवा.

तसेच यंदा कुठल्या प्रकारच्या स्पर्धा किंवा कार्यक्रम करावेत या संबंधीच्या सुचनाही इथे लिहा.

आतापर्यंत खालील मायबोलीकरांनी संयोजक मंडळात काम करायची तयारी दाखवली आहे. आपले संयोजक मंडळात स्वागत आहे.

मुख्य संयोजक - panna
संयोजक मंडळ - champak, alpana, cinderella, bsk, RJ, adm
सल्लागार - runi

अजुन कोण कोण यंदा काम करायला तयार आहे ते ईथे कळवा.

विषय: 

मला MG आणि अजय च्या ideas आवडल्या. Happy
मेंदी स्पर्धा घ्यायच्या असतील तर(अर्थात पुरेसे स्पर्धक येणार असतील तर) मी ideas देउ शकते/ conduct करु शकते.

स्पर्धेचा विजेता मतदानाने निडायचा असेल तर स्पर्धकाचे नाव्/आयडी गुप्त ठेवता आला तर पाहा. >>
ही मंजूची सुचना अतिशय आवडली. यामुळे खर्‍या कलेस न्याय मिळेल. Happy

बाकी संयोजकांना शुभेच्छा. Happy गणपती बाप्पा मोरया!!!

वॉव , मेंदी स्पर्धेची कल्पना मस्तच आहे . मला भाग घ्यायला नक्कीच आवडेल . Happy

मी सुध्दा काम करायला तयार आहे... Happy
वरच्या सगळ्या आयडिया चांगल्या आहेत... शोनूची कल्पना मला आवडली.

@cinderella
>अजय, मस्त आहे विषय. मायबोलीकरांना आवडेल असा आहे. हा विषय चित्रकला अथवा व्यंगचित्रकलेसाठी कसा वाटेल ? तिथे न भेटलेल्या मायबोलीकरांच्या सुद्धा प्रतिमा चितारायला अधिक वाव आहे. अर्थात हे माझे मत

व्यक्तिचित्रण चांगलं येण्या इतपत (म्हणजे ज्या व्यक्तीचं काढलंय त्याला प्रसिद्ध केलेलं चालेल Happy ) काढणारे चित्रकार किंवा व्यंगचित्रकार मायबोलीवर किती आहेत आणि गणेशोत्सवात कितपत भाग घेतील यात शंका आहे. गणेशोत्सवात त्यावरून फटाके फोडून दिवाळी किंवा शिमगा होण्याची शक्यता आहे. Biggrin त्यातल्या त्यात सोपे म्हणून मी छायाचित्र सुचवले इतकेच.

गणेशोत्सव संयोजकांना अनेकानेक शुभेच्छा. Happy
काहीही मदत लागली तर नक्की सांगा.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

न भेटलेल्या मायबोलीकरांच्या सुद्धा प्रतिमा चितारायला अधिक वाव आहे>> Happy
संयोजक मंडळाला अनेक शुभेच्छा.
विकीतत्वावर ओपन ठेवणच्याची कल्पना आवडली.

मी पण काम करायला तयार आहे.
सगळ्यांच्या कल्पनाही आवडल्या...

------------------------------------------------------------------------
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

संयोजक मंडळाला शुभेच्छा ! मायबोलीवरच्या लोकांच्या छायाचित्राची आयडीया मला इतकी आवडली नाही. ती तशी सगळ्यांसाठी शक्यही नाहीये. मला वाटतं श्रावण अथवा पाऊस या थीमवर प्रकाशचित्रे मागवली तर त्यात सगळ्यांना भाग घेता येईल.
________________________________________
प्रकाश

संयोजक मंडळात adm यांनीही सहभाग घेतला आहे तसेच runi यंदा सल्लागार म्हणून काम पहात आहेत.

दोघानांही शुभेच्छा.

मला या अंकात एका महत्वाच्या संस्कृत प्रार्थनेचा मराठी अर्थ लिहायचा आहे. हा अर्थ मला एका साईटवर इंग्रजीत लिहीलेला सापडला. तर त्याचे मराठी भाषांतर करून मी या अंकात लिहीले, तर त्यात काही कायदेशीर अडचणी येतील का?

कृपया लवकर कळवावे.

Pages