चाफा बोलेना!
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
10
icture_001.jpg" />
अरे वा
अरे वा झक्की तुमचापण झब्बु का? चांगलाय.
छान आहे
छान आहे चाफा .
छान आहे.
छान आहे. चार वर्षांनी उगवला कि, फुले लागली ?

चार वर्षात तुमची आशा मावळली नाही म्हणजे..ग्रेटच आहे!
आभिनंदन
<<चार
<<चार वर्षांनी उगवला कि, फुले लागली ?>>
फूल चार वर्षांनी आले. झाड बिचारे कधी कधी फक्त एका पानावर तग धरून उभे असे. मग या वर्षी जरा जास्त पाने, फुले आली.
<<चार वर्षात तुमची आशा मावळली नाही >>
माझ्या एव्हढ्या मोठ्या आयुष्यात चार वर्षे म्हणजे फार नाहीत.

आई गं चार
आई गं चार वर्षे ? मी ह्या वर्षीच दोन रोपे लावली आहेत. अजून चार वर्षे वाट बघायची म्हणजे फुलं येण्याची.
झक्की, तुम्ही हिवाळ्यात घरात ठेवता का झाड ?
झाड
झाड नेहेमीच घरात असते. न जाणो, हरणांना आवडले तर? तुम्हाला लवकर फूल दिसो अशी शुभेच्छा! त्याला जास्त पाणी घालू नये नि उन्हात ठेवावे म्हणे. सौ. ला जास्त माहिती.
बर्बर,
बर्बर, बारागटगच्या वेळी विचारेन त्यांना(च).
मस्त फूल
मस्त फूल आहे झक्की...
मागे
मागे पिवळ्या लिलि ला पण अशीच फुले आली होती, खूप कळ्या पण होत्या. वाटले, आणखी खूप फुले येतील, पण हा हंत हंत, लिलींना हरिण उज्जहार!!* चक्क खाऊन टाकली हरिणांनी ती फुले, कळ्या, पाने!
*एक श्लोक आठवला:
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
भास्वानुदेष्यति हसिष्यति .......
इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे,
हा हंत हंत नलिनीं गज उज्जहार!
म्हणजे रात्र झाली तरी मधाच्या आशेने एक भुंगा कमळात रहातो, नि त्या कमळाच्या पाकळ्या मिटतात, आता तो भुंगा बाहेर कसा जाणार? तो विचार करत बसतो, रात्र जाइल, पहाट होईल, सूर्य उगवेल, असे विचार करीत असता, अरे, अरे हत्तीने ते कमळ उपटून टाकले!
हटकेश्वर, हटकेश्वर.

रात्रिर्ग
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
भास्वानुदेष्यति हसिष्यति पन्कजश्री
सूर्य उगवल्यावर कमळाचे सौन्दर्य हसेल.. म्हणजे कमळ उमलेल....