सुकट मेथी घालुन (सुकी करंदी/बारीक कोलंबी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2009 - 04:17
लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाटे सुकट (डोक्याचा शेवटचा भाग व शेपुट, मधले पाय काढून, धुवुन)
२-३ जुड्या समुद्री मेथी (चिरुन धुवुन)
२ कांदे
१ बटाटा
आल, लसुण पेस्ट
हिंग, हळद, पाव चमचा
२ चमचे मसाला
३-४ कोकम
चविपुरते मिठ
२-३ चमचे तेल
थोडी कोथिंबीर चिरुन

क्रमवार पाककृती: 

प्रथम तेल गरम करुन त्यात कांदा गुलाबी रंगावर तळून घ्यावा. मग कांदा शिजला की त्यात आल लसूण पेस्ट घालावी परतून हिंग, हळद, मसाला घालावा. आता त्यात सुकट, बटाटा व मेथी घालावी परतुन झाकणावर पाणी ठेउन ४-५ मिनीटे शिजवावे व गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्यात कोकम ऐवजी टोमॅटो किंवा चिंचेचा कोळही घालता येतो. सुकटीचे कालवणही छान होते. तिखट आवडत असल्यास शिजत आल्यावर एखादी हिरवी मिरची मोडून टाकावी. त्याने वेगळा स्वाद येतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुकट
SDC10364.jpg

तयार रेसिपीचा फोटो उद्या टाकते.

अस्सा मस्त वास आला ना....

धन्स ग असल्या मस्त रेसिपीजसाठी..

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

ह्याच्यात वांगे,अठळा किंवा गवार टाकून काय मस्त लागते. त्यात ज्वारीची नाहीतर तांदूळाची रोटी शुद्ध तूप ओतून अगदी. Happy अहा!
आमच्याकडे गावी एक जेवण करणारी आजी कोळीण होती मूळची, माश्याचा धंदा रोडावला म्हणून जेवणाची काम घ्यायची. ती सकाळी सुकटं वगैरे विकून दुपारी जेवण करायला यायची. ती मस्त तांदूळाची रोटी बनवायची. खूप सराईतपणे पाण्यावर तिची ही रोटी फिरायची थापताना नी खास किचनच्या मागे बाहेरच्या अंगणातल्या चुलीवरच्या तव्यावर भाजायची व वरच्या सुकटाची वांग घालून केलेली झणझणीत भाजी , हापूस आंब्याचे फोडी. आमची उन्हाळ्यातली सुट्टी एकदम मस्त जायची गावी. Happy

>>तयार रेसिपीचा फोटो उद्या टाकते.
बर झालं वार्निंग दिलीस आता उद्या हा धागा उघडून बघणार नाही.

हे सोडे आहेत काय? नसावेत बहुधा. सुकटेची मोठी व्हरायटी दिसते. दुसरी खुपच बारीक असते. जळते तळताना. वरच्या सुकटीची डोकी काढावी लागतात का?

हे सोडे नाहीत. ह्याला साल असतात. ह्याची डोकी काढायला लागतात. त्या बद्दल मी जिन्नस मध्ये टाकलही आहे. जे बारीक असतात त्याला जवळा म्हणतात. मी इथे जवळ्याची रेसिपिही दिली आहे आधी.

आता कुठं इतकी बारीक बारीक डोकी काढीत बसायचं हो?

ह्याला आम्ही आंबाडिची सुकट म्हणतो.

आर्च आम्हीही म्हणतो आंबाड.
रॉबिन तुम्ही दुसर्‍यांची डोकी खात असालना, त्यापेक्षा कमी वेळ लागतो ही डोकी काढायला.

जागू Lol पळ !!!!
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

अश्विनी अग मी पळू की तू पळालीस मच्छी बघुन ? की रॉबीन आता माझे डोक खाईल ?

जागू, सगळेच लागू Lol
***************
ॐ नमश्चण्डिकायै |