पाऊसकैदी

Submitted by जयन्ता५२ on 13 July, 2009 - 14:05

हा पाऊस असा कसा झालाय हल्ली?
कधीकधी हा जातो महिना-महिना नजरेआड
कारावासाची सजा झालेल्या कैद्यासारखा अदृश्य
कुठेतरी गजाआड?
..
तर कधी
येतो फक्त सायंकाळी
दबकत दबकत, ओशाळवाणा
पॅरोलवर सुटलेला पण रोज
पोलीसठाण्यावर हजेरी द्यायला जावे लागावे तसा
नाईलाजाने नियमित?
..
अन कधी
त्याचा वावर असतो
तुरुंगातून पळालेल्या कैद्यासारखा,
फक्त रात्री अंधारात..
जाणवतात त्या चोरपावली हालचाली
कुणाला तरी अंधारात एकटं गाठून
लुटण्यासाठी असाव्या तशा?
..
त्या जुन्या खट्याळ, सदवर्तनी, दिवसा उजेडी, उघड उघड येणार्‍या पावसाचे
आता काय झाले?

------------------------------------------------------------
(जयन्ता५२)
*आधी इतरत्र प्रकाशित.

गुलमोहर: 

वा !!! पावसाचा वेगळा अंदाज भावला. छान.

छानच...

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

अरे व्वा ! पावसावरची वेगळीच कविता, आवडली Happy
धनु.

"सदवर्तनी पाऊस!"
किती छान लिहिलंयस मित्रा!

छान कल्पना...असाही पाऊस Happy

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

नेहमीपेक्षा वेगळीच आहे ! आवडली.
________________________________________
प्रकाश

बिचार्‍या पावसाची आपणच काय अवस्था करुन ठेवलीय, नाही का?
वा! आणि काय अचूक रेखलीय!
छान!

हटके, मस्तच जयंतराव.
..............................................................................
आई माझा देव, सुख माझे घे गा
रूंदावल्या किती, पायीच्या गं भेगा!