धरोहरः ४ जुलै कार्यक्रमावरच्या प्रतिक्रिया

Submitted by समीर on 10 July, 2009 - 18:33

४ जुलैला झालेल्या धरोहर या कार्यक्रमावरच्या प्रतिक्रिया. रघुनंदन पणशीकर, शौनक अभिषेकी आणि राहुल देशपांडे.
IMG_0531.jpgIMG_0535.jpgIMG_0542.jpgIMG_0547.jpgIMG_0549.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या कार्यक्रमाचं निवेदन ( इप्रसारण च्या व महाराष्ट्र फाउंडेशन च्या कार्यक्रमात निवेदन केलं होतं त्या ) मधुरा गोखले यांनी केलं. फारसं पाल्हाळ न लावता, माना न वेळावता पण तरिही अभ्यासपूर्ण निवेदन होतं.

गाणी अशी
पणशीकर - सहेला रे - अप्रतिम एकदम. मी पहिल्यांदा पणशीकरांचं गाणं ऐकलं. या गाण्याकरता त्यांचा 'comb over माफ Happy
अभिषेकी लागी करेजवा कटार
देशपांडे - शून्य घर शहर
पणशीकर - देवाघरचे ज्ञात कुणाला
अभिषेकी - काटा रुते कुणाला - हे अगदी मस्त झालं गाणं.
देशपांडे - सुरत पियाकी - हे त्यांचं स्वतःचं आवडतं गाणं असणार बहुतेक Happy
पणशीकर - जाईन विचारत रानफुला - शेवटचं कडवं ' जाईल बुडून हा प्राण खुळा' अगदी लखलखत्या विजेसारखं ! अजून आठवून शहारा येतोय...
अभिषेकी - माझे जीवन गाणे - याचं संगीत टच्याआलेंचं आहे हे मला पहिल्यांदाच कळलं. त्यामुळे हे गाणं नेहेमीपेक्षा साडेतीनशे पट जास्त आवडलं.

देशपांडे बगळ्यांची माळ उडे अजून अंबरात

मग अभिषेकींनी त्यांच्या बाबांची वात्रटिका म्हणून दाखवली. त्याबद्दल त्यांना आजन्म पांशा फुकट.
माझ्या लक्षात राहिलेल्या ओळी अशा
तुका म्हणे आता
नागविलो जनी
सीडीचा धनी
वेगळाची ||

मग नऊ अभंगांची "मेडली"

प्रथम तुला वंदितो
आम्हा नकळे ज्ञान
अहो नारायणा सांभाळावे आम्हा देवा
तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
ध्यान करु जाता मन हरपले
येगं येगं विठाबाई
कानडा राजा पंढरीचा
श्री अनंता मधूसुदना
अबीर गुलाल उधळीत रंग

साथीला निखिल फाटक अन आदित्य ओक ( हेच मागच्या वर्षी राहुल देशपांडेंच्या बरोबर होते) .
ओकांची पेटी एंचँटेड अन (म्हणूनच ) एंचँटिंग आहे. जादूशिवाय अशक्य आहे अशी पेटी वाजवणं!

मला पण हा कार्यक्रम अतिशय आवडला. मला वाटते दिवसा तू... हे नाटक सोडून बरीच मंडळी इथे आली होती.
मला राहूल देशपांडेचे गाणे सर्वात जास्त आवडले. अभिषेकींची वात्रटिका अगदी खरी!! एकंदरीत सर्व 'माहोल' इतका छान होता की अगदी तनमनधन लावून ऐकावे.
Happy

एक यु ट्युब एक 'बीएमएम २००९ - राजा परांजपे' नावाचे शिर्षक असलेली लिंक मिळाली. ती धरोहर ह्या कार्यक्रमाची आहे की नाही माहित नाही. (फक्त मधुरा गोखले ह्यांचे निवेदन इतकेच साम्य आढळले)
http://www.youtube.com/watch?v=F8PgGe_Y9Kc

हा कार्यक्रम कुणी यु ट्युब वर टाकला असल्यास लिन्क द्याल का?

महागुरू...
ती लिंक धरोहरची नाहीये. मधुराने दोन्ही कार्यक्रमांत निवेदन केले होते.

नमस्कार, माझे नाव पुर्णिमा बर्वे आहे. मि किन्ग ओफ प्रुशिया येथे रहाते. टोरोन्टोच्या लोकान्च्या कार्यक्रमाला (आत्ता नाव आठवत नाहि) बसले होते त्यामुळे धरोहर कार्यक्रम पाहु शकले नाहि. धरोहर पाहण्याचि मनापासुन इच्छा आहे. यु ट्युबवर किन्वा दुसरिकडे कुठेच सापडला नाहि. कुणाला लिन्क माहिति असल्यास क्रुपया मला कळवावि. मि पहिल्यान्दाच ह्या वेबसाइटवर लिहित असल्यामुळे मराठित टाइप होणारा फोन्ट वापरताना खुप चुका (कि खिळे?) झाल्या आहेत त्याबद्दल क्शमस्व!

पुर्णिमा.. (आणि इतरही) मुख्य सभागृह सोडले तर इतर ठिकाणी Video Recording हौशी लोकांनी केलेले होते. त्यामुळे ते कुणाकडे असेल (म्हणजे त्यानी केले असेल) आणि त्यांना लिंक टाकावी वाटली तरच ते मिळेल....

लिहीताना काही गोष्टी Logical विचार केल्यास चांगले लिहीता येईल. उदा. Prussia हा शब्द मराठीत लिहीताना prashiyaa असा टंकावा लागेल... क्षमा (xamaa)...