ववि२००९:- सांस्कृतिक कार्यक्रम पोस्ट क्र.३

Submitted by ववि_संयोजक on 9 July, 2009 - 13:38

सांगा पाहु,
अन्नं वै प्राणा: या लेखाचे आजपर्यंत किती भाग प्रसिद्ध झालेत?
नुकत्याच एका प्रसिद्ध रंगकर्मीच्या आठवणी मायबोलीवर प्रसिद्ध झाल्यात.. तीचं नाव कोण बरं सांगू शकेल?
माबोवर हातपाय धुण्याचा मोलाचा संदेश देणारी नुकतीच प्रसिद्ध झालेली कविता कुणाची?

या आणि अशा आपल्या मायबोलीशी निगडीत (ती निगडी नव्हे... Happy ) असलेल्या किती तरी प्रश्नांना उत्तर द्यायला सज्ज व्हा बरं..

वर्षाविहारमधे असणार आहे "मायबोली जलद प्रश्नोत्तर मालिका" ..!

अचूक उत्तरे देणार्‍यांना बक्षिस आणि सर्वात जास्त अचूक उत्तरे देणार्‍याला `मायबोली तज्ञ' हा किताब बहाल करण्यात येईल हो!!!!! Happy

तर आजपासूनच नुसत्या टवाळक्या न करता नीट लक्ष देऊन सर्वच्या सर्व नविन लेखन,कविता वाचून काढा.. त्यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतलात तर तुमचं बक्षिस नक्की Proud

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्फ्या ,याला काय अर्थ आहे का?मैदानात उतरण्याआधीच कसली माघार घेतोस?:)

आर्फ्या सा. स इतक्या उत्साहाने योजना आखतं आणि तुझ्यासारखे नतद्रष्ट लोक असं त्यांच्या उत्साहावर पाणी टाकतात... (कृपया या वाक्याचा विनोद बीबीवरच्या चित्राशी संबंध जोडू नये.) Proud

आणि सर्वात जास्त चूक उत्तरे देणार्‍याला `मायबोली अज्ञ' हा किताब बहाल करावा हो.....

अमीत, मला तो किताब आताच बहाल करा...

(खाकरत) गेल्याच्या गेल्या वर्षी मला मिळाला होता हा 'किताब'
तेव्हा या वर्षी नवीन लोकांना संधी देईन म्हणते Proud
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

सर्वच्या सर्व नविन लेखन,कविता वाचून काढा.. >> उद्यापासुन सुट्टी टाकावी म्हणतो.. Proud

तर आजपासूनच नुसत्या टवाळक्या न करता नीट लक्ष देऊन सर्वच्या सर्व नविन लेखन,कविता वाचून काढा.. <<
सां.स.,
अहो किती अन्याय करणार गरीब बिचार्‍या माबोकरांवर?
हे असं सगळं वाचत बसले तर १९ तारखेपर्यंत टाळकी शाबूत राहतील का लोकांची? Wink

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

तर आजपासूनच नुसत्या टवाळक्या न करता नीट लक्ष देऊन सर्वच्या सर्व नविन लेखन,कविता वाचून काढा.. <<<<<<<

सां. स.
अहो ४ दिवस जगु द्या ना गरिबाला Happy

************
To get something you never had, you have to do something you never did.

गेल्याच्या गेल्या वर्षी मला मिळाला होता हा 'किताब' >>>> "मायबोली अज्ञ" हा किताब का ??????? Happy

~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

तर आजपासूनच नुसत्या टवाळक्या न करता नीट लक्ष देऊन सर्वच्या सर्व नविन लेखन,कविता वाचून काढा.. त्यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतलात तर तुमचं बक्षिस नक्की >>>>>

खरे म्हणजे असे समग्र मायबोली वाङ्गमय वाचून काढणार्‍याला उत्तरे येवो अथवा न येवो बक्षीस द्यायलाच हवे! एवढे चतुरस्त्र लिखाण नुसते वाचने म्हणजे काय साधे काम नाही!
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

हो! सहभागी होण्याचं डेअरिंग दाखवणार्‍यांना तरी काही बक्षीस द्यायालाच हवे!

मुळात सगळं वाचून ज्याचं डोकं शाबूत असेल राह्यलेलं आणि तो वविलाही आला असेल त्याचा वाजंत्री, हार तुरे आणि अजून काय काय करून सत्कार केला तरी कमी पडेल...

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

याच बीबीवर आता चार प्रश्न तरी काढता येतील Wink
सगळ्यांनाचा Lol

गुलमोहर ट्यूटोरियल कोण सुरू करतंय?
किंवा २१ अपेक्षित?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

अजून काय काय करून सत्कार केला तरी कमी पडेल... >>> आधी ती प्रश्णावली बनविणार्‍याचा सत्कार करा.... Proud

अगदी अगदी!

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!