मायबोली टी शर्ट २००९ - एक सुवर्णसंधी( आधी टी शर्ट ऑर्डर न केलेल्यांसाठी)

Submitted by टीशर्ट_समिती on 9 July, 2009 - 06:22

ज्या मायबोलीकरांना टी शर्ट हवे आहेत पण २५ तारखेपर्यंत टी शर्टची ऑर्डर करणे काही कारणांनी शक्य झाले नव्हते अश्या मायबोलीकरांसाठी टी शर्टचा एक लॉट अजुन काढावा असा एक प्लॅन आहे. अश्या मायबोलीकरांनी शनिवार दि.११-०७-०९ पर्यंत www.maayboli.com/node/8467 या टी शर्टच्या बाफवर विचारलेली सर्व माहिती भरून tshirt@maayboli.com या मेल आयडीवर पाठवुन द्यायची आहे.

टी शर्टचे पैसे भरण्याविषयी:

यातील पुणेकर मायबोलीकरांनी शनिवार दि.११.०७.०९ किंवा रविवार दि.१२.०७.०९ रोजी बालगंधर्व रंगमंदिराच्या तिकीट खिड्कीशेजारील कट्टावर तर मुंबईकर मायबोलीकरांनी रविवार दि.१२.०७.०९ शिवाजी पार्क येथे ५.३० ते ८ या वेळात टी शर्ट समिती सदस्यांकडे टी शर्टचे पैसे भरायचे आहेत.

टी शर्ट्स मिळण्याविषयी:-
यातील जे मायबोलीकर १९ जुलैला वविला येणार आहेत त्यांना टी शर्ट्स वविच्या दिवशी मिळतील आणि जे मायबोलीकर वविला येणार नाहीयेत त्यांनी १९ तारखेनंतर कधीही टी शर्ट समिती सदस्याना फोन करून त्यांचे टी शर्ट्स घेऊन जावेत..

मंडळी,अशी ही शेवटची संधी आहे यावर्षी मायबोलीचे टी शर्ट्स मिळायची तेव्हा याचा लाभ घ्या. लगेच मेल करून आपली टी शर्ट ऑर्डर पाठवा..

टी शर्ट समिती सदस्य :

धन्यवाद,
टी-शर्ट समिती

विषय: