Submitted by अजय on 9 July, 2009 - 00:32
थियेटर्स, पुणे सादर कलाकार मित्रांचा सुरेल कट्टा "मैतर" याबद्दलच्या प्रतिक्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थियेटर्स, पुणे सादर कलाकार मित्रांचा सुरेल कट्टा "मैतर" याबद्दलच्या प्रतिक्रिया.
मला
मला आवडलेला एक वेगळा आणि लक्षात राहण्याजोगा कार्यक्रम. सलील कुलकर्णींचं करीयर साठी धावणार्या पण मुलांकडे दुर्लक्ष झाल्याची खंत करणार्या बापाचं गाणं खूप भावलं. संदीप खरे यांनी वाचलेल्या कादंबरीतला उतारा एकदम भन्नाट आणि तो ते सादर करतातही अफाट.
सुबोध भावे यांच्या सादरीकरणातला पहिला भाग सगळ्याना तितका पटकन कळेलच असे नाही. त्यामागच्या खाचा खोचा(nuances) सांगीतल्या तर त्या मागचे कलाकाराने घेतलेले कष्ट जास्त लवकर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील.
दुसर्या दिवशी शर्वरी जमेनिस बसमधे समोरच बसल्या होत्या. मला ते माहिती नव्हते. त्यांची माझ्याकडे पाठ होती आणि मी एका मित्राच्या वडिलांना मला हा कार्यक्रम कसा आवडला ते सांगत होतो. आणि त्या गुपचुप ऐकत होत्या! बरे झाले कार्यक्रम खरोखरच आवडला होता.
नंतर बसमधून उतरल्यावर त्याना आवर्जून कार्यक्रम आवडल्याचं सांगितलं.
पुण्यामध्
पुण्यामध्ये याच कार्यक्रमात बेला शेंडेही असते.. इन्फॉर्मल आणि मस्त होतो 'मैतर'.. सुबोध भावे उच्च!

बेला असताना ती आणि संदीप नाटकाचा प्रवेश करतात, तो इथे शर्वरी आणि संदीपने केला का? संदीप अभिनयही सही करतो
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
दुसरा
दुसरा कार्यक्रम याला समांतर असल्याने हा बघता आला नाही..
विनय
समीर, शोनू
समीर, शोनू इ. मायबोलीकरांमुळे पहिल्या रांगेत बसुन हा कार्यक्रम बघता आला. एकदम सही. संदीपने वाचलेला श्याम मनोहरांच्या कळ मधला उतारा तर लाजवाब. चौकटीत आयुष्य जगणार्या तुमच्या आमच्या सारख्या प्रत्येकाला एकदम लागु होतो.
अजय तुम्ही सलीचच अग्गोबाई ढग्गोबाई सीडीतले "दूरदेशी गेला बाबा", हे सतत कामात असणार्या बाबांबद्दलचे मुलाचे मनोगत पण ऐका अजुन ऐकले नसेल तर, या गाण्याला उत्तर म्हणून त्यांनी मैतर मधले बाबांचे गाणे गायले. खूप सुंदर.
सुबोध
सुबोध भावेने तेंडुलकरांच्या 'सफर' नाटकातलं एक स्वगत आणि 'नटसम्राट'मधलं (प्रसिद्ध) 'कुणी घर देता का घर' सादर केलं. फारच सुंदर केलं.
शर्वरी जमेनीसने कथ्थकमधील काही तोडे आणि 'अरे जारे हट नटखट' गाणं त्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषेसह सादर केलं. ते ही फार सुंदर.
सलील कुलकर्णीने त्याची स्वतःची एक कविता (तो स्वतः लिहितो हे मला माहीत नव्हतं) सादर केली. 'हरवलेला षड्ज' अशी काहीतरी. चांगली होती. त्याशिवाय त्याने 'Everything I do..' गायलं. चांगलं गायलं.
संदीप खरेने मुलीला उद्देशून व्यस्त बापाने लिहिलेली कविता सादर केली. चांगली होती. (हमखास रुमाल काढायला लावणारी.) आणि त्याने शाम मनोहरांच्या पुस्तकातील काही निवडक उतार्यांचं वाचन केलं - ते उतारेही अफाट होते आणि त्याने सादरही मस्त केले. (त्यातला एक उतारा तर 'मायबोलीची प्रतिज्ञा' (pledge) म्हणून घ्यावा असं आमच्या सगळ्यांच्या मनात आलं.
)
शौनक अभिषेकीने या कार्यक्रमात काय केलं हे मला आता नेमकं आठवत नाही, कारण त्याला मी दोन कार्यक्रमांत पाहिलं. पण त्याने आणि सुबोधने 'कट्यार'मधला एक छोटासा भाग सादर केला.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
थियेटर्स,
थियेटर्स, पुणे >>
पुणे, म्हटल्यावर कार्यक्रम चांगला असणार ह्यात शंकाच नाही.
पूनम, बेला
पूनम, बेला शेंडेचे नाव होते. पण कार्यक्रमात ती नव्हती. शर्वरी आणि संदीपने कुठलाही भाग एकत्र केला नाही. संदीपने थोडासा अभिनयात भाग घेतला (उस्मान) पण त्याला हसायलाच जास्त येत होतं.
वेळेअभावी काही गोष्टी त्यांना वगळाव्या लागल्या. पण एकंदर कार्यक्रम अतिशय सुरेख झाला. सलील आणि संदीप दोघांचाही प्रश्नच नव्हता. मी तर फक्त त्यांच्यासाठीच गेले होते. पण बाकी लोकांनी पण सुंदर परफॉर्मन्स दिला.
मी सगळा
मी सगळा वेळ सुबोध भावेकडे पाहात असल्याने बाकी कार्यक्रमात काय झालं ते फार आठवत नाहीये..
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
सुबोध भावे
सुबोध भावे म्हणजे फार पुर्वी एक 'सीधा साधा सदा' नावाची मालिका लागायची त्यातला का? वरच्या फोटोतून तरी ओळखता येत नाहीये ..
सुबोध भावे
सुबोध भावे म्हणजे मधे जो कांदेपोहे नावाचा (बंडल) पिक्चर आलेला, त्यातला हीरो. (वरच्या फोटोमधे पिवळा कुर्ता घातलेला)
सुप्रिया, सुबोध भावे काय एवढा बघणेबल आहे का?
सशल, सदा
सशल, सदा मधला तो प्रबोध कुळकर्णी..
पुणेकर.. त्या दिवशी तरी आणि सगळ्या अधिवेशनात आलेल्या कलाकारांमध्ये सुबोध आणि अंकुश चौधरी हेच जरा बघणेबल होते
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
>>पुणेकर..
>>पुणेकर.. त्या दिवशी तरी आणि सगळ्या अधिवेशनात आलेल्या कलाकारांमध्ये सुबोध आणि अंकुश चौधरी हेच जरा बघणेबल होते
सुप्रिया... निषेध!
संदीप त्याच स्टेजवर असताना, हे वाक्य तुला लिहवतं कसं?
संदिप
संदिप मध्ये काय आहे विशेष??? वरण फळ दिसतो तो अगदिच ;)..
शर्वेरी जमेनिस चा performance अतिशय सुंदर होता पण.. अप्रतिम एक्स्प्रेशन्स.
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
>>संदिप
>>संदिप मध्ये काय आहे विशेष???
जे सुबोधमध्ये नाही ते...
>>वरण फळ दिसतो तो अगदिच
हो, का? असेलही.. सगळं लक्ष त्याच्या डोळ्यांकडेच असल्याने बाकी कसा दिसतो ते पाहिलच नाही.
मैतर चे
मैतर चे अधिकृत संकेतस्थळः http://www.maitar.com/
इथे त्यांच्या आगामी कार्यक्रमाबद्दल, तसेच कलाकरांबद्दल माहीती आहे. तिथे काही लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया पण दिल्या आहेत.
संदीप वरण
संदीप वरण फळे नाही काही, क्यूट आहे. सेटप करत असताना मी त्याचा फोटो काढत होते तर लाजला चक्क!
पण सुबोध भावे मात्र एकदम क्रश मटेरियल
' सांगायाची आहे कहाणी तुला ' ही संदीप खरेंची कविता अगदी क्लोझ टू होम होती. अजून आठवली की डोळ्याच्या कड्या ओल्या होतात...
त्याने "लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं' ही कविता पण खास सादर केली - अर्धी मंगेशकरांच्या आवाजात अन अर्धी नाना पाटेकरच्या
अहो, नुसता
अहो, नुसता तो दिसतो कसा याचीच काय चर्चा करता? त्याने काय केलं, गाणे म्हंटले, का अभिनय केला, का काय त्याबद्दल बोला की.
आणि याच बायका पुरुषांना नावे ठेवतात, की ते बायकांच्या बाह्य सौंदर्यालाच जास्त किंमत देतात!!

वरची सगळीच
वरची सगळीच वरणफळे
'अवघा रंग...' मधला 'सोपान' पाहिला नाही का कुणी? आणि नाना? 
शोनू,
शोनू, मंगेशकरांच्या नव्हे, मंगेश पाडगांवकरांच्या आवाजात.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
आयला, इथे
आयला, इथे एकदम संदिप प्रेमी लोक आहेत तर.. म्हणजे वरण फळे आवड्णारे:) दुसर्या दिवशी सुबोध भावे तर अजुन सही दिसत होता.khaadi kurta ani spects
..
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
ओह! तिथे
ओह! तिथे कार्यक्रमाचा फॉर्मॅट थोडासा बदललेला दिसतोय.. बेलाची गाणीही सही होतात..
सुबोध वॉवच आहे, नटसम्राटमधला प्रवेश तर बेस्ट.. मला सर्वात सही वाटतं, ते हे की इतका उत्कट अभिनय करून, एका सेकंदात ते बेअरीन्ग सोडून लगेच नॉर्मल होतो तो त्याचं! (अवांतर, इकडे एक मालिका चालू आहे, त्यातही काय काम करतो सुबोध- एक्स्प्रेशन्स बघत रहावीत!)
सुप्रिया, वरणफळ काय!!!!!!!!
गधडे, त्याच्याच कविता सलीलच्या 'मुलायम' आवाजात ऐकल्या की वेडी होतेस ना तू! (तरी बरं, सिग्नेचर लाईनमध्येही त्याचीच कविता आहे!)
अश्विनी, संदीपबद्दलच्या मतासाठी इथे येशील तेव्हा बक्षिस देईन
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
कार्यक्रम
कार्यक्रमाची सुरुवात पण सुंदर केली. शोनक च्या आवाजात 'ओंकार, अनादि,अनंत' ऐकणं म्हण़जे अप्रतिम अनुभव होता..
नटसम्राट तर सहीच पण 'सफर' मधलं सादरीकरण पण निव्वळ सुरेख.. तो बी एम एम नंतर टोरांटो मध्ये असणारे एक महिना..
पुनम,,, सुबोधच्या असण्यामुळे सलीलचा 'मुलायम' आवाज आणि संदिपचे शब्द विसरायलाच झाले बघ
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
हे
हे अश्वीनिसाठी संदीपच्या डोळ्यांचे काही फोटो.


बरं हा एक चांगला..

हे सुप्रियासाठी..


आणि हे शर्वरी जमेनीसचा

समीर... आता
समीर...
आता परिमार्जन म्हणून हा व्हिडिओ बघ.
http://www.youtube.com/watch?v=M0m_2cg9kt0
अरे वा ! हा
अरे वा ! हा कार्यक्रम बघायला पाहिजे.
सुबोध भावे एवढा फुगलाय !!! कॉलेजात असताना 'चंद्रपूरच्या जंगलात' पाहिले होते. अफलातून नाटक आणि ते सुबोध आणि त्याव्ह्या सहकार्याने केलेही उत्तमच. पण तेव्हा मात्र हॅंगर होता, आता वॉर्डरोब वाटतोय
***
ही शून्याकार आग, ही जळती मोकळीक रोजचीच आहे
ही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे
पण तेव्हा
पण तेव्हा मात्र हॅंगर होता, आता वॉर्डरोब वाटतोय>>>> स्लार्टि, हे जरा जास्तच होताय...
-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे
ओके, जरा
***
ही शून्याकार आग, ही जळती मोकळीक रोजचीच आहे
ही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे
ऊफ्फ्फ्फ्
ऊफ्फ्फ्फ्फ.... SJ !
'मैतर'
'मैतर' आवडल्याचे वाचून आनंद झाला.
मी बीएमएममधे 'मैतर' आणि 'धरोहर' ह्या दोन कार्यक्रमांचा coordinator असल्याने या कार्यक्रमांच्या प्रतिक्रिया विशेष आहेत. तुमच्या प्रतिक्रिया 'मैतर'च्या टीमला आवर्जून सांगीन.
पूनमः
कार्यक्रम ठरला तेव्हाच माहिती होतं की बेला येऊ शकणार नाही कारण ती बीएमएमच्या सुमारास दुसरीकडे बिझी असणार होती. एरवी 'मैतर' चार तास वगैरे चालतो पण इथे वेळेअभावी आम्हाला दोन तासांचाच ठरवावा लागला होता. माझी खात्री आहे चार तास चालला असता तरी रसिकांना आवडला असता.
मैतर कार्यक्रम खूपच रन्गला.
मैतर कार्यक्रम खूपच रन्गला. सुबोध भावे जितका स्मार्ट दिसतो,तीत्काच चान्गला अभिनय करतो.नट्सम्राट चा पीस त्यने जो सादर केला तो अप्रतीम होता.
शर्वरि जेमिनिसचा कत्थ्हक्चा डान्स एकदम झकास्,तिने केलेला नवरन्ग सिनेमातला डान्स तर क्या बात है,एकदम अप्रतीम्,सन्ध्या पेक्शाहि उत्तम केला,शर्वरि बिटीयाने.
आपला डाकटर विजय दमोदर पान्गरेकर.
सध्ध्या बोस्टन ला मुलानकडे,
नेहमी साथी भारतात्,औरन्गाबाद ला.