युद्धस्य कथा

Submitted by ललिता-प्रीति on 6 July, 2009 - 15:14

माझे सासरे श्री. सदाशिव छत्रे हे भारतीय वायूसेनेत होते. १९६२ सालचं चीन युद्ध आणि १९७१ सालचं बांग्लादेश युद्ध या दोन्हींत त्यांचा सक्रीय सहभाग होता. त्यावेळचे अनेक प्रसंग, थरारक आठवणी आम्ही त्यांच्याकडून ऐकत आलेलो आहोत. त्यांपैकी काही आठवणी त्यांनी लिहून काढल्या आहेत. त्यांनी केलेल्या लेखनात किरकोळ बदल करून त्या मी इथे देत आहे. या प्रसंगांना कुठलाही विशिष्ट कालानुक्रम नाही. त्यांना जेव्हा, जसं आठवेल तसतसे ते लिहीत गेले.