|| श्री गणेशाय नमः ||

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऍडमिननी रंगीबेरंगीचे पान देवुन बरेच दिवस झाले. ऍडमिनचे त्याबद्द्ल मन:पूर्वक आभार!!
पण या पानाचं करायचं काय हा यक्ष प्रश्न.. कारण लिखाण, कविता आणि मी काही समीकरणच जुळत नाही:)
मग याचं करायच काय?? मग म्हटले की आपली चित्रांची कला तरी यातुन मांडता येईल.. पण त्यालाही मुहुर्त मिळत नव्हता... काही कामं वेळच्यावेळी करायच्या बाबतीत मी तशी आळशीच Lol असो...
मग विचार केला अनायासे नवीन वर्ष येतच आहे तर तेव्हाच माझ्या रंगीबेरंगी पानाचा श्रीगणेशा करुया..
बघुया आता किती नियमित चित्र टाकायला मिळतात ते...

सर्व मायबोलीकरांचे इथे स्वागत आहे...
सुरुवात माझ्या एका जुन्याच चित्राने करते...
Ganapati.jpg

विषय: 
प्रकार: 

झाल का श्रीगणेशा नवीन वर्षात?? Happy नीलू, तू इथे चित्रं टाकणार हे बघून एकदम छान वाटल!! आता खूप छान चित्र पहायला मिळतील ना? Happy सूचना मनावर घेतलीस हे एक मस्तच झाल!! आता येऊदेत एकामागून एक एकसे एक चित्र Happy

निलुटाय.. तुझा रंगिबेरंगी पान.. !!!!!!
मस्तच गे.. नि तुझि चित्रकला म्हणजे मेजवानिच..
तुका काय म्हणतात ते... कोंग्रेट्स हं..
"पार्टि व्हयि.." खरातर या म्हनुचा व्हता.. Lol
तरि बरा वाट चुकलि नि हयसर इलो.. नि तुझा ह्या पान दिसला..
तुका मॉप शुभेच्छा..

यो !

निलु, चित्रं सुरेख आहे. अजून उत्तमोत्तम कलाकृती येवु दे!

हा माझा आवडता देव आणि त्याचं असं सुर्रेख चित्रं.
तुझी चित्रकला सार्‍या अंगांनी बहरू दे, नीलू

हे बेस केलस.
आता आम्हा ल्हान भावंडाना चित्र दाव चित्र दाव म्हणायला हक्काची जागा घावली Happy
भरपुर चित्र काढ आणि इथे टाक.

वा नीलू विघ्नहर्त्याने सर्वच विघ्न हरण केली आता अश्याच नवनवीन कला़कृतीनी बहरु दे रंगीबेरंगी नवीन वर्षात!
नव वर्षाच्या खूप सार्‍या शुभेच्छा.
अन्जलि

निलगे,
मिया दिलेल्या शुभेच्छा एकदम अमलात येतल्या म्हणान वाटला नव्हता गो.. आश्चर्याचो सुखद धक्का दिलंस एकदम Happy
अशीच छान छान चित्रा येवंदेत Happy
मॉप मॉप शुभेच्छा Happy

नीलू, एकदम झकास चित्रं........ ह्या वर्षात भरपूर छान छान चित्रं काढ आणि आम्हाला असंच नेत्रसुख दे.

शैलू, योगी, चिन्नू, दाद, झकास, अंजू, महेश, गोबू, मंजू सर्वांचे प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी खुप आभार!!! Happy

नीलु ग्रेट , नविन वर्षाची भेट आवडली.............

बाप्पा आवडले. मस्तच सुरवात.

मस्त सुरवात ग! येउ दे आता छान छान चित्र आणि अजुन बरच काहि, तुझ्या चारोळ्यापण वाचल्या आहेत मी जुन्या गुलमोहरात तेंव्हा तेहि चालेल आम्हाला Happy

नीलु,
खुपच सुंदर . आणखीय वारली चित्रा टाक गो . आशीर्वाद.

लोपा, दिव्या, श्यामली, गुरुकाकाका धन्स
लोपा तुझ्याकडुनही अश्या भेटींची अपेक्षा आहे Happy
काकानु तुमच्या मागणीची अंमलबजावणी केलीय Happy