ईगतपुरी येथील विपश्यना केंद्राचे प्रवेशद्वार

Submitted by ultimatebipin on 27 June, 2009 - 09:49

विपश्यना बद्दल जरा सविस्तर माहिती सांगा ना.
इगतपुरीला जाऊन १५ दिवस गप्प बसुन राहणे एवढेच माहिती आहे.
त्या काळात दिनक्रम कसा असतो, यातुन काय साध्य होणे अपेक्षित आहे ?
कोणी माबोकर जर तिकडे जाऊन आले असतील तर कृपया अनुभव सांगणे.

हे + १ काय आहे ? Uhoh
वि.सू. : माझे दोनाचे चार केव्हाच झाले असून आता तर चाराचे आठ पण झाले आहेत.

महेश, +१ हे तुझ्या पोस्टसाठी आहे.
आम्हा पामरांसही इगतपुरीबद्दल, कुणीतरी Enlighten करावे अशी मनिषा आहे.

महेश.........
<<विपश्यना बद्दल जरा सविस्तर माहिती सांगा ना.>>

माझ्यामते "विपश्यना" हे प्रत्येक मानवाने करायलाच हवे. इगतपुरी हे भारतात स्थापन झालेले पहिले केन्द्र आहे. Google वर vipassana igatpuri शोधा तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

विपश्यना म्हणजे ध्यान-धारणा, बाह्य जगाचा विसर पडून मनुष्याने स्वतःच्याच मनाचा शोध घेणे. आज सर्वत्र क्रुरता, हिंसाचार, दहशतवाद उफाळला असताना विपश्यनेची गरज मानवजातीला आहे. विपश्यना हि एक ध्यान प्रक्रिया असुन हि साधना मनाची मलीनता दूर करते. क्रोध, द्वेष, घृणा, अहंकार, लोभ यासारख्या विकारांना दूर करून मैत्री, करूणा, सद्भावना आणि बंधुभावाच्या स्वभावाला जागृत करते. ही कुठच्याही धर्माशी संबंधित नसुन शास्त्रीय पद्धतीवर आधारीत असा हा ध्यानाचा प्रकार आहे. यामध्ये सांप्रदायिकता किंवा जातीपातीचा कोणताही भेदभाव नाही. सर्व संप्रदाय आणि जातीचे लोक यामध्ये सहभागी होऊ शकतात. होऊन लाभान्वित होतात. कुणालाही एखाद्या संप्रदायाची दीक्षा दिली जात नाही. दहा दिवशांचे विपश्यना शिबीर केल्यानंतर पॅगोडाच्या विशाल ध्यानकक्षात भगवान बुद्धांच्या पवित्र शरीरधातुंच्या सान्निध्यात करू शकाल. पॅगोडामध्ये असलेल्या गौतमबुद्धांच्या स्मृतीचिन्हातून परावर्तित होणार्‍या तरंग लहरी विपश्यना करणार्‍या साधकांना त्यांच्या ध्यानधारणेत सहाय्य करतील आणि मनःशांतीच्या शोधात असणर्‍या साधकांना अध्यात्मिक आनंद देतील.

ग्लोबल विपश्यना पॅगोडा (बोरीवली)चे काहि प्रचि आणि माहिती
http://www.maayboli.com/node/16457