अनुत्तरित

Submitted by अनन्त्_यात्री on 24 November, 2026 - 22:09

आदिस्फोटाचा कल्लोळ उठलाय..
..स्थळ-काळाचा पाळणा हलतोय,
ऊर्जा झोतांचा झंझावत सुटलाय,
मूलद्रव्यांच्या मुळाक्षरांना अस्तित्वाचं अंगडं चढतंय,
कधी?कुठे?कसं? यांना कवेत घेणाऱ्या उत्तरांनी भवताल गजबजतोय,

अज्ञेयाच्या अभेद्य धुक्यात
दोनच प्रश्न
का?
कोणी केलंय हे?
कदाचित कल्पान्तापर्यंत
अनुत्तरित...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults