Submitted by अनन्त्_यात्री on 1 November, 2026 - 05:03
सणासुदीसाठी हस्तिदंती मनोऱ्यात बसून
AI वर बनविलेल्या
तुपकट शुभेच्छा
वितळून ठिबकू लागतील आता
२४ x ७
सो मि वर
त्यांना उत्तर द्यायला
एकच इमोजी
AI वापरून बनवायचा प्रयत्न करतोय,
जी एकत्रच दाखवेल:
पाणी गायबल्या विहिरींची विषण्णता,
भेगाळल्या भूमीचा भकासपणा,
करपत्या कणसांचे कोळसे,
फुफाट्यात उडताना कोसळून पडणाऱ्या पाखरांची तहान,
आटल्या नदीपात्रांची विस्तीर्ण वाळवंटं,
जगता यावं म्हणून गावं सोडणारी परागंदा पावलं,
......कुणी प्रॉम्प्ट सांगता का प्रॉम्प्ट?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा