Submitted by @अज्ञात म्हणे on 1 November, 2026 - 02:51
दाटे आठवणींचा डोळ्यांत पूर आज का?
उतरे श्वासांतही माझ्या काहूर आज का?
कुणाची असावे हे खत-पाणी आज घालती,
निजपण्या कापूस अंतरी आतुर आज का?
रात्रराणीसाठी नेहेमी चंद्र होतो सूर्य,
इतर फुलांस फुलण्याचा गुरूर आज का?
द्वारपाल असता ऐकिली "गांधारी शापवाणी",
म्हणुनी पाहता कान्हा हुरहूर आज का?
बहुदा रक्षक माझा तो होता सावळा,
रेशमी जीभ ज्यांची ते दूर आज का?
जे तेव्हा न पटले आज पटेल कसे,
परी जीव तुझ्या मागे फितूर आज का?
-दक्ष
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा