कसा वागतो मी

Submitted by मनोजकुमार देशमुख on 28 October, 2026 - 04:42

कसा वागतो मी भांबावलेला
जरासा भरूनी ओसांडलेला

कुणी काय केले चेटूक ऐसे
असा वाटतो मी संचारलेला

असा एकटा मी बेधुंद चाले
जरी मार्ग आहे अंधारलेला

नभी चंद्र येता हे काय झाले
किनारा कसा हा फेसाळलेला

पुरे जाहला हा मुक्काम आता
बरे आज गाशा गुंडाळलेला

Group content visibility: 
Use group defaults