Submitted by मुग्धमानसी on 18 October, 2026 - 16:27
मी कुठे ठेऊ तुला की तू कुणा दिसणार नाहीस...
तू न् मी न् ही गोष्ट सगळी... शब्दही कळणार नाहीस!
मी तुला अन् तू मला इतके अता आकळून आलो
की तुझ्यातून तू मला बघ वेगळू शकणार नाहीस!
उच्छ:वासासारखे सुटतात जगण्याचे तिढे
तू असा असतोस सोबत... की कधी जाणार नाहीस!
कोण कोणाला बिलगते, कोण कोणाचे दुजे?
आहे का खात्री? कधीही तूच मी होणार नाहीस?
बंधनांची बंधने बघ बाधली मजला तुला...
आणि घडले जे... कुणा समजावणे करणार नाहीस.
कोण कुठले विश्व येथे उगवते अन् अस्त होते...
एवढे कळतेच की तू सूर्य... मग पेटणार नाहीस?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप सुंदर कविता.
खूप सुंदर कविता.
शब्दही कळणार नाहीस! >> ही ओळ तीनदा वाचल्यानंतर मग घुसली.
मस्त! आवडली!
मस्त! आवडली!