
कधी कधी गाणं रेकॉर्ड करायची हुक्की येते.
मन शांत असतं तेव्हां आपणच गायलेलं ऐकताना त्यातल्या चुका ठळक दिसतात. पण जेव्हां आत खूप गोंगाट असतो तेव्हां आपल्याला आपलाच फिरून येणारा आवाज ऐकू येईनासा होतो. काही समजेनासं होतं.
हा गोंगाट का असतो याच्याशी बाह्य जगाला काहीही घेणं देणं नसतं, पण त्या गोंगाटाची कारणं खरी असतात. आतला आवाज मोठा मोठा होत जातो, तो दाबता येईनासा होतो..
एखाद्या सुप्त ज्वालामुखी सारखं आतलं रसायन उफाळत राहतं.
व्हॅन गो किंवा गॉगची स्टारी नाईटसची चित्रं पाहताना हे नेहमी मनात यायचं. त्याने काय भोगलं हे कधी समजलं नव्हतं, साजिर्याचा लेख वाचेपर्यंत. पण तोपर्यंत त्याच्याबद्दलच्या कहाण्या पोहोचत होत्या. कुणी सांगितलं त्याने स्टारी नाईटस मालिकेतलं त्याचं ते जगप्रसिद्ध चित्रं मनोरुग्णालयात जाण्याच्या काही दिवस आधी चितारलं होतं. त्याच्या मृत्यूनंतरच ते जगाला समजलं. त्याच्या चित्रातलं उंच जाणारं झाड हे त्याचं अवतीभवतीच्या सर्वांत उंच उठून दिसण्याच्या इच्छेचं अभिव्यक्तीकरण वाटलं होतं.
हे सर्वच्या सर्व ज्याला लागू पडतं, त्या अतिशय किचकट आणि गूढ व्यक्तिमत्वाबद्द्ल लिहावं तेव्हढं थोडं आहे. खूप वाट बघितली कुणी तरी लिहील याची.
पण त्याच्या नावाशी संलग्न असलेली वादग्रस्तता, त्याचे राजकीय संबंध, त्याच्याबद्दलच्या वदंता हे मृत्यूनंतरही त्याचा पाठलाग सोडणार नाही. कुणी म्हणतं त्याचं हे असं व्यक्तिमत्व हे मार्केटिंग आहे. कुणी म्हणतं त्याचं समाजसेवेचं काम दिखाऊपणा आहे. त्याची ब्रॅण्ड म्हणून किंमत वाढवून तीनंतर वसूल करण्याचा काही नेत्यांचा कुटील कावा आहे.
ते सर्व खरं असेल असं मानलं तरी त्यानंतरही उरणारा तो कितीतरी मोठा नाही का?
आपण बोलतोय ते विश्वनाथ उर्फ नाना पाटेकरबद्दल. नाना बद्दल आदरार्थी उल्लेख जमत नाही. तो नानाच.
पडद्यावरचा त्याचा अँग्री यंग मॅन हा अमिताभ सारखा सभ्य समाजाचे नियम पाळत बंड करणारा नाही. तो function at() { [native code] }इशय उग्रट आहे. रासवट आहे. रानटी आहे. तो त्याचा अभिनय आहे असं वाटतच नाही. कुणीच त्याच्या पद्धतीने ही पात्र साकारू शकत नाही.
हा परफॉमन्स येतो कसा?
मग व्हिन्सेन्टच्या उत्कट आणि मनस्वी अभिव्यक्तीची आठवण येते......
आणि नानाने जे भोगलं त्याचं अभिव्यक्तीत रूपांतर होण्यासाठी त्याला अभिनयाचा उ:शाप मिळालाय असं वाटतं.
आतला आवाज जेव्हां मोठा होतो तेव्हां उफाळून येणार्या लाव्हाने जग जाळण्यापेक्षा त्याला वाट करून देण्यासाठी या कलंदर कलावंताला ज्याने कुणी स्टेजची वाट दाखवली त्याला नमन!
त्याच्या बद्दल अनेक प्रवाद होते तेव्हांची गोष्ट. नाना सुपरस्टार असताना एकदा कोल्हापुरात आला होता. माझा भाऊ त्याचे फोटो घेत होता. त्याच्या दोन लहान मुली नानाकडे बघत होत्या. नानाने त्यांना जवळ घेतलं आणि भावाला म्हणाला " हं घे आता फोटो. गोड आहेत रे पोरी". त्याचं हे कुणालाही एकेरी संबोधनं खूप नैसर्गिक होतं. असाच होता नाना, मोकळा ढाकळा, स्टारडम न मिरवणारा!
अशा या कुठलीच भीडभाड न ठेवणार्या मनस्वी कलावंताबद्दल मनमोकळं बोलता यावं म्हणून हा प्रपंच.
एक मराठी अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीत एव्हढी मोठी धडक मारतो, त्याला निव्वळ श्रद्धांजली वाहून मोकळं कसं व्हायचं?
राज अज्ञानीजी,
राज अज्ञानीजी,
लेख मनापासून वाचला. नानांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेताना तुम्ही केलेली अंतर्मनातील गोंगाटाची मांडणी विशेष भावली.
व्हॅन गॉगच्या चित्रांमधील अस्वस्थता आणि नानांच्या अभिनयातील तीव्रता यांची तुलना विचार करायला लावणारी आहे. कलाकाराच्या आत चाललेल्या संघर्षाला त्याची कला अभिव्यक्तीची वाट करून देते, हा लेखातील विचार खूप प्रभावी वाटला.
कोल्हापुरातील तुमच्या भावाच्या मुलींसोबतचा नानांचा प्रसंग विशेष आवडला. मोठ्या कलाकाराबद्दल लिहिताना अशा छोट्या, वैयक्तिक आठवणी त्याचं माणूसपण अधिक जवळून दाखवतात.
नानांच्या व्यक्तिमत्त्वातील वादग्रस्तता नाकारून नव्हे, तर ती मान्य करूनही त्यांच्या अभिनयातील वेगळेपण समजून घेण्याचा तुम्ही केलेला प्रयत्न आवडला.
लेखाच्या शेवटी व्यक्त केलेला विचारही महत्त्वाचा वाटला. काही कलाकारांचं योगदान केवळ श्रद्धांजलीच्या चार ओळींत सामावणं कठीण असतं.
सुंदर, संवेदनशील आणि विचारप्रवर्तक लेखन. मनापासून धन्यवाद!
लेख आवडला.
लेख आवडला.
फोटोचा किस्सा हि खूप छान.. तुमच्या पुतण्यांसाठीही अविस्मरणीय प्रसंग..!
नाना पाटेकर म्हटलं की, माझ्या डोळ्यासमोर क्रांतीवीर चित्रपटातील नानाच डोळ्यांसमोर येतो..लहानपणी भालू चित्रपट दूरदर्शनवर पाहिलेला.. त्यातला फक्त नाना लक्षात आहे.
मैंने देखा जब तेरी नज़रों के through
कभी hundred one कभी hundred two
उस दिन से हुआ fever ये शुरू.. ह्या गाण्यातल्या नाना मला तरी विसरता येणार नाही... कारण Phillips Top Ten मध्ये हे गाणं Top वर असायचं त्याकाळी..!
त्यांचे बरेच सिनेमे पाहायचे आहेत..
मला त्यांचं ' पुरुष' हे नाटक पाहायचं आहे... youtube वर असेल तर बघेन नक्की..!
रविवारची लोकसत्ताची अख्खी पुरवणी नानाला समर्पित होती..
हिंदी चित्रपटसृष्टी सारख्या चंदेरी दुनियेत अस्सल गावरान मातीतला रांगडा मराठी माणूस निव्वळ अभिनय कौशल्याच्या जोरावर एवढं यश मिळवू शकतो .. हे खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे.
नानाला भावपूर्ण श्रद्धांजली..!