Submitted by vilasrao on 13 October, 2026 - 03:56
भेटलो, बोलणे जाहले,
शब्द ना, पाहणे जाहले.
रात्र होती तुझ्या संगती,
अंगणी चांदणे जाहले.
झोप गेली तुझ्यासोबती,
रोजचे जागणे जाहले.
देव पावे न कोणास रे,
व्यर्थ ते मागणे जाहले.
दुःख लपवायचे जीवनी,
फक्त हे हासणे जाहले.
हीरकाला जशी शोभते,
माय ते कोंदणे जाहले.
हे विलासा, गझल शेवटी
मोकळे सांगणे जाहले
विलास खाडे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा