गेले करायचे राहून - रेव्यु

Submitted by रेव्यु on 3 October, 2026 - 00:53

माझ्या मनात हा प्रश्न फारसा येत नाही कारण माझ्या आयुष्यातील पहिल्या टप्प्यात केवळ सर्व्हायव्हल म्हणजेच उपजिविका हा प्रश्न माझ्या पंचविशीपर्यंत होता. येनेकेन अर्थार्जन करावे लागायचे म्हणून सोळाव्या वर्षी टेड अप्रेंटिस म्हणून सुरुवात केली. मग इव्हिनिंग कॉलेज मध्ये ए एम आय ई केले आणि या सर्व “आयुष्याच्या धापाधापीत” आपल्या काही आवडीनिवडी आहेत का, काही अन्य करायचे आहे का हा विचारच आला नाही. उत्तम रित्या स्थिरस्थावर झाल्याने आपल्याला हेच हवे होते अन मिळाले असे समाधान वाटले. याच काळात मी संगीत व वाचन हे छंद मात्र खूप जोपासले. अनेक मैफिली रात्र रात्र जागरण करून ऐकल्या, आठ किलोमीटर सायकल दामटत ब्रिटिश काऊन्सिलच्या वाचनालयात जाऊन पुस्तके आणायचो. मी तेव्हा बंगलोरला बॉश मध्ये नोकरी करायचो (1967-1985). त्यामुळे आपले दिवसाचे कॉलेज मुकले, इत्यादी भावना माझ्यात नाहीत कारण आर्थिक स्थैर्य हे एकमेव ध्येय होते आणि त्या पोटी कॉलेज चुकले ही खंत – गेले करायचे राहूनी- भासलीच नाही.
मात्र
आज वळून पाहताना मात्र एक करायचे राहून गेले हे प्रकर्षाने जाणवते….. ते म्हणजे, मुलींसोबत आणखी वेळ घालवायला होता
आणि
एखादे वाद्य वाजवायला शिकायला हवे होते, पाहूया

इतर गोष्टी, लेखन, वाचन, पर्यटन, प्राध्यापक म्हणून मुलांना सेवानिवृत्त झाल्यावर शिकवणे इ. हवे असलेले करून झाले.
आणि मला ऐहिक वस्तू म्हणजे उत्तम स्टायलिश कपडे, महागड्या वस्तू, इत्यादी चे आकर्षण नाही, आजमितीस शक्य असूनही....
प्रौढी म्हणून नाही बरं!
सारांश हा की करायचे राहून गेले असे फारसे नाही, कदाचित मी अल्पसंतुष्ट आहे….

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादे वाद्य वाजवायला शिकायला हवे होते, पाहूया>>>> त्यासाठी शुभेच्छा!

सर्व “आयुष्याच्या धापाधापीत” आपल्या काही आवडीनिवडी आहेत का, काही अन्य करायचे आहे का हा विचारच आला नाही.>> हम्म खरंय

आवडले! तुमचा सेकंड इनिंग बद्दलचा लेख लक्षात होता त्यामुळे तुमचे या कॅटेगरीत शशकसुद्धा होणार नाही असे वाटले आणि लेखातल्या शेवटच्या वाक्याने ते कन्फर्म झाले Happy

मात्र तेव्हा दिलेल्या तिसर्‍या इनिंगबद्दल शुभेच्छा पुन्हा देतो!