Submitted by अतुल. on 26 September, 2026 - 02:26
आयसीयू मधल्या बेडवर तो निपचितपणे पडलेला. ग्लानीत होता. आजूबाजूची लगबग आणि आवाज अस्पष्टपणे जाणवत होते. साऱ्या शरीरभर प्राणांतिक ठणका पसरलेला. अचानक एक भयानक वेदना विजेसारखी चमकली. जिवाच्या आकांताने ओरडणार. तोच त्याची शुद्ध हरपली.
जाग आली तेंव्हा सभोवती अंधार होता. निरव शांतता होती. वेदना जाणवत नव्हती. कि आवाज जाणवत नव्हते. अचानक कोणाचीतरी चाहूल लागली. त्याने पाहिले. 'ती' होती. जवळच उभी. हो तीच. चेहऱ्यावर मंद हास्य. तेच डोळे. तोच पेहराव. दिसायला अजूनही तेंव्हासारखीच. तशीच. हि यावेळी आणि इथे? तो चमकला. कारण ती त्याच्या आयुष्यातून गेली त्याला कित्येक वर्षे होऊन गेली होती!
आवाज आणि लगबग. सारे तसेच सुरु. बेडवर शरीर. सर्वांगावर पांढरेशुभ्र बेडशीट.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाप रे!!
बाप रे!!
(No subject)
जमली आहे कथा..!
जमली आहे कथा..!
ओह !
ओह !
मैं वापस आउंगा...
मैं वापस आउंगा...
जमली आहे.
जमली आहे.
जमलीये मस्त..
जमलीये मस्त..
छान
छान
ओह नो
ओह नो