Submitted by mrsbarve on 25 September, 2026 - 21:57

आत्ता अचानक आयडियाची कल्पना सुचली . घरात क्युटी औरंजेस होती, झाडावर गुलाबाचं फुल होत आणि घरात येता जाता पाचक म्ह्णून वरचेवर बकाणा मारला जात असल्याने बडीशेप हि होती. त्यांचं कॉम्बो कसे लागते ते पाहू असा विचार आला. घरात गुलकंदही होताच. मग काय चार पाच छोट्या गोड औरंजेस चा लिंबू पिळी वापरून ज्युस काढून घातला . त्यात थोडेसे पाणी घातले , अर्धा चमचा गुलकंद आणि अर्धा चमचा कुटलेली बडीशेप घातली. एक बर्फाचा खडा टाकला आणि वरतून काही गुलाबपाकळ्या टाकल्या.छान ढवळून घेतले होते बर्फ टाकायच्या आधी.
आणि पिऊन पाहिले ! एकदम भारी लागत होते. नक्की करून पहा. साधे सोपे आणि चवदार आहे हे पेय. गुलकंद आणि बडीशेप एकत्र चव मस्त लागते ओरेंज जूस मध्ये.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोड दिसतंय, एखादा फोटो बाजूने
गोड दिसतंय, एखादा फोटो बाजूने पण आवडला असता.
छान आहे...!
छान आहे...!
आत्ता पर्यंतच्या सगळ्या
आत्ता पर्यंतच्या सगळ्या एंट्री मधे ही एकच करुन बघुन पिण्याची हिंमत आहे माझ्यात
रीया एन्ट्री आवडली.
रीया

एन्ट्री आवडली.