
१९९७ मधे मिस्टर खिलाडी शालूच्या प्रेमात पडले. प्रेमात पडलेला हिरो एरव्ही to the moon & back वगैरे म्हणतो पण मिस्टर खिलाडी पडला पक्का फुडी त्याने प्रेमाचा मार्ग पोटातून जातो इतकं मनावर घेतलं की त्याच्या आवडत्या समोश्याच्या साक्षीनेच शालूला तीच त्याची फॉरेव्हर म्हणत पटवलं आणि लग्न केलं. आता मिस्टर & मिसेस खिलाडींनी लग्नानंतर सगळ्या ठिकाणच्या समोश्यांना फेमस करायचा चंगच बांधला ... असेच एकदा ते फिरत फिरत चर्निरोडवरच्या गुरुकृपात आले आणि घेतलं काय तिथे तर तेच समोसा. म्हणे "जो भी लाना दो लाना"
एक समोसा खाल्ला आणि फेमस ड्यान्स केला. कोणता म्हणजे? तोच तो समोसे मे आलू वाला
दुसऱ्या समोश्याचा एक बाईट घेऊन ड्यान्स स्टेप घेणार तोच लक्षात आलं यात आलू नाहीये. समोश्यातून आलु गेला तर मिस्टर खिलाडीलाही जावं लागणार की काय?
जाऊद्या आपल्याला काय करायचय! असल्या weird conditions apply करताना त्याने मार्केटचा अभ्यास करायला हवा होता. आता वो जाने और शालू जाने
आपण असं काही आलू रहेगा समोसेमे वगैरे फिक्स नाही केलय फॉरेव्हर साठी तर आपण खाऊया की हा गोड समोसा
गुरुकृपात मावा समोसा म्हणून हा मिळतो ... मावा परतून त्यात साखर वेलची वगैरे घालून केलेले, कलाकंद किंवा मिल्क केकच्या जवळ जाणारे सारण यात भरलेले असते बाकी मैद्याची पारी वगैरे तसेच
मी शॉर्ट कट मारायचा ठरवून मिल्क केक आणि पेढे आणले आज पण त्यातला केक घरच्या मेंब्रांनी बघू ग चव म्हणत फस्त केला. घरात परवा केलेले मोदकाचे सारण शिल्लक होते (नेहमीचे नारळ गूळ वेलचीवाले) त्यातच पेढे कुस्करुन घातले, सुकामेवा पावडर घातली आणि एकत्र परतले सगळे.
पारी:
१ बोल मैदा+ अगदी थोडे मीठ + २ चहाचे चमचे तूप + लागेल तसे कोमट पाणी कणीक मळायला +१ चमचा तेल
मैद्यात मीठ घालून एकत्र करायचे. त्या मैद्याला तूप चोळून लावायचे मग लागेल तसे पाणी घालत कणीक मळायची. कणकेला वरुन तेलाचा हात लावून झाकून ठेवायची
समोश्याची पट्टी: कणकेची लिंबा एव्हढी गोळी घेऊन पीठ तेल वगैरे न लावताच लाटायची. गोल न लाटता दंडगोल. त्याचे दोन भाग करायचे म्हणजे दोन समोसे तयार होतील
त्यात सारण भरुन समोसे तयार करुन मध्यम ते मंद आचेवर तळायचे

भारी लागत असतील हे समोसे
भारी लागत असतील हे समोसे ,मोदकाचे वेगळे वर्जन.
मस्त आयडिया आहे !!
मस्त आयडिया आहे !!
खिलाडी वाली शालू तर best !!!
मी तर यातले सारण " बघू ग चव"
मी तर यातले सारण " बघू ग चव" म्हणत खाऊन टाकेन..
मस्त आयडिया!
मस्त आयडिया!
भारी आयडिया!
भारी आयडिया!
चर्नी रोडला कुठे गं गुरुकृपा?
सायन सर्कलला होतं ना एक?
मस्त आयडिया, छान दिसतायेत.
मस्त आयडिया, छान दिसतायेत.
मला हे मावा समोसा, मिठा समोसा
मला हे मावा समोसा, मिठा समोसा बिलकुल आवडत नाही. फसवणूक केल्यासारखेच वाटते. त्यामुळे स्पर्धेसाठी म्हणून योग्य आहे
मस्त आहे ट्विस्ट.
मस्त आहे ट्विस्ट.
पण गोड आवडत नसल्याने माझा पास.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
स्वाती, मलाही माहिती नाही बहुतेक ऑपेरा हाऊस जवळ आहे. ऑफीस मधे दोघा तिघांनी तिथून पार्टी द्यायला मागवले होते. सायनचेच म्हणे तिथे मिळतात इती आमचा प्युन
हल्ली तर मुलुंडच्या एका स्वीट शॉप मधे पण सायनच्या गुरुकृपाचे समोसे मिळतात, हे पण एका कलिगने आणले होते म्हणून माहिती
@ऋन्मेश, मी पहिल्यांदा ऑफीस पार्टीत खाल्ले होते तेव्हा खरच फसले होते
काय भन्नाट दिसतंय! बघून कळणार
काय भन्नाट दिसतंय! बघून कळणार पण नाही की गोड पदार्थ आहे. चव थोडी तळणीच्या मोदकाजवळ जाणारी असेल.यात लालभडक गाजर हलवा भरून पण मस्त लागेल.
अरे, मस्त आयडिया!
अरे, मस्त आयडिया!
छान आहेत समोसे.. लेखहि मस्त..
छान आहेत समोसे.. लेख हि मस्त..!
मस्त आयडिया!
मस्त आयडिया!
शालू की समोसा स्टोरी में
शालू की समोसा स्टोरी में ट्विस्ट = 👌
सहज फसवणूक होईल खाणाऱ्याची
छान दिसत आहेत समोसे
छान दिसत आहेत समोसे
एक विपु केलि होति काही दिवसापुर्वि
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
@अनु हो तळणीच्या मोदकांसारखीच चव ... आकार वेगळा
यात गाजर हलवा छान लागेल. ओल्या नारळाच्या करंजीच्या सारणाची (साखरेतलं सारण)खव्याच सारण,dryftuits खवा मिक्स गुजियांसारखे हे सगळे छान लागेल
@जाई सॉरी मिस झाली होती विपू पिंग केलय
खुसखुशीत लिहीलंय. पाकृवर खमंग
खुसखुशीत लिहीलंय. पाकृवर खमंग बोलणारा संजीव कपूर माहिती होता.
तुम्हाला लेडी सं क म्हणू का?
शीर्षक आवडले. "Forever Samosa" या ब्रॅण्डखाली समोसा विकायला सुरूवात करा. पुण्यातली फ्रँचायजी मला द्या>
(आयडिया आवडली तर आयडियेचे पेटंट म्हणून फ्रँचायजी फ्री द्या.)
इतरांनी गोड वाटतील असे
इतरांनी गोड वाटतील असे दिसणारे पदार्थ केलेत. ही रिव्हर्स गियर मधली गाडी आवडली.
लेखन आवडलं.
लेखन स्पर्धेत भाग घ्या सांगून सांगून दमलो.
लेडी सं क >> नको नको मग मला
लेडी सं क >>
नको नको मग मला विना शॉर्ट कट्स रेसिप्या कराव्या लागतील. फ्रॅंचाईजीची कल्पना मस्तय पण
आम्ही असं पुर्वी सगळे बिझीनेस करुन झालेत मनातल्या मनात
म्हणजे ब वडे स्टॉल लावूया, मस्त थालिपीठ गाडी लावुया, म भात सार पण पटापट संपेल ... हे आपलं उगाच आम्हीच म्हणत मनातल्या मनात श्रिमंत पण झालो ... आणि उगाच मनात मांडे टिपी झाला की गड्या रोज रोज निगुतीने मोठ्या प्रमाणावर करणं आपल्या रक्तात नाही म्हणत परत गाडी रिॲलिटी चेक वर येते .. इथे सकाळी साग्रसंगीत (नैवेद्याचा डावी बाजु उजवी बाजू असा) स्वयंपाक झाला तर दुसऱ्या दिवशी शिवाय किचनमधे पाय ठेवावा वाटत नाही
लेखन स्पर्धेत भाग घ्या सांगून
लेखन स्पर्धेत भाग घ्या सांगून सांगून दमलो.>> अर्र सॉरी सॉरी.
खुसखुशीत लिहीलंय. पाकृवर खमंग
खुसखुशीत लिहीलंय. पाकृवर खमंग बोलणारा संजीव कपूर माहिती होता.
तुम्हाला लेडी सं क म्हणू का?+१
गुरुकृपा चा नॉर्मल समोसा बऱ्याचदा खाल्लेला आहे .
हा कधी खाल्ला नाही
आता त्यासाठी परत मुंबईला गेले पाहिजे
इथे सकाळी साग्रसंगीत
इथे सकाळी साग्रसंगीत (नैवेद्याचा डावी बाजु उजवी बाजू असा) स्वयंपाक झाला तर दुसऱ्या दिवशी शिवाय किचनमधे पाय ठेवावा वाटत नाही +१
हा हा हा
मला तर दुसऱ्या दिवशीही ठेवावासा वाटत नाही
मस्त आयडिया!
मस्त आयडिया!
पुढच्या गटगला घेऊन या!
सायन सर्कलला होतं ना एक?>
सायन सर्कलला होतं ना एक?> सायन सर्कल च आहेच पण आता त्यांनी ऑपेरा हाऊस ला पण शाखा उघडली आहे.
छान दिसत आहेत समोसे.
पुढच्या गटगला घेऊन या!> +९९९९
मस्त समोसा
मस्त समोसा
असंही मला आलू नै आवडत
तूच गं तूच
भारी दिसतायत समोसे!
भारी दिसतायत समोसे!
आता कॅन्टीनचा सामोसा पण शंंकाग्रस्त नजरेने आधी "बघितला" जाईल, मग खावासा वाटेल!
अक्षरश: फसवणूक!
दुसऱ्या दिवशी शिवाय किचनमधे पाय ठेवावा वाटत नाही>>> ठेवायचा नसतोच. "दमले बै" "छे बै! कित्ती कित्ती उरका पाडलाय आज.." असं आपलं आपणच म्हणून श्रमपरिहार करायचा असतो. फार झालं तर डबावाल्या मेंब्रांना डबे देऊन वाटेला लावायचं आणि आपण कॅण्टीनला जाऊन चोचले पुरवायचे. हाकानाका!
मस्त गोड समोसे...
मस्त गोड समोसे...
लिखाण एक नंबर..
रोचक आयडिया. हे जसे तळणीचे
रोचक आयडिया. हे जसे तळणीचे आहेत तसे तांदळाच्या पिठीचे उकडीचे सामोसे बघायला हवेत कधीतरी.
मस्त!
मस्त!
परत एकदा प्रतिसाद्कर्त्यांचे
परत एकदा प्रतिसाद्कर्त्यांचे आभार
हर्पा - मोमो मधे जसे तिखट सारण भरतो तसे करता येतील उकडीचे मोदक. करुन बघायला हवे एकदा
Pages