करायच्या राहुन गेलेल्या पहिल्या दोन (की तीन? लिहितानाच कळेल )- गोष्टी करायच्या होत्या आणि राहुन गेल्या अशा नाहीत, पण सगळे सांगतात , करतात म्हणून केल्या असत्या कदाचित , अशा आहेत. त्याबद्दल जराही खंत नाही. म्हणजे थीमशी विसंगतच . पण त्याच आधी लिहितोय.
१. दहावीनंतर केवळ सायन्स आवडत नाही, म्हणून कॉमर्सला गेलो. त्याबद्दल नातलगांची बोलणी ऐकली. बाबांचं त्याबद्दल काहीच म्हणणं नव्हतं.
पण अॅडमिशनच्या आधी किंवा शालान्त परीक्षा ते निकाल या मधल्या काळात त्या नातेवाईकांशी बोलणं झालं असतं, तर कदाचित बाबांनीही मला सायन्सला जा असं सुचवलं असतं. सुचवलं म्हणतोय, कारण त्यांनी कायम आमचे निर्णय आम्हांला घेऊ दिले. सायन्सला गेलो असतो तर मेडिकलला जायचा प्रश्न नव्हता. आय टी तेव्हा नुकतंच सुरू होत होतं. आणि अॅडमिशन बारावीच्या मार्कांवरच होत. सायन्सच्या मुलांना PCB/ PCM किती असंच विचारत. तर या बसकडे पाहिलंही नाही.
२. माझं बारावी झालं . पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. त्याच वर्षी सी ए चे नियम बदलले. आता तो कोर्स पदवीनंतरच करता येणार होता. नंतर काही काळाने तो नियम पुन्हा बदलला आणि बारावीनंतर कोर्स करता येऊ लागला. जर माझ्या वेळीही हाच नियम असता तर बरोबरची मुलं करताहेत म्हणून मी सुद्धा सी ए केलं असतं. मी टी वाय ला असतानाच बाबा रिटायर झाले आणि माझ्यासाठी नोकरी करणं ही प्रायॉरिटी होती. त्यामुळे इतर मुलांसारखं बी कॉमनंतर सी ए करायचा विचार केलाच नाही. पुढे ऑफिसात कायम ऑडिटर्सशी सामना झाला आणि मी यात नाही याचं समाधान वाटलं. अर्थात सी ए केल्यावर ऑडिट हे एकच प्रोफेशन नसतं हे माहीत होतं.
३. सी ए नाही तर नोकरी मिळेपर्यंत काही तरी म्हणून ICWA केलं. एकदा इन्स्टिट्युट मध्ये एका कॉस्ट ऑडिटरची- इंटर झालेला असिस्टंट हवा - अशी जाहिरात पाहून त्याला भेटायला गेलो. तर त्या कामात फॅक्टरीज असलेल्या ठिकाणी फिरायला लागतं ही माहिती कळली. आणि हे माझं काम नाही, असं ठरवून टाकलं.
४. मराठी मध्यमवर्गीय कुटुंबांत सरकारी किंवा पब्लिक सेक्टरमधली नोकरी हीच सुरक्षित चाकोरी. इथे काही वेगळा विचार केला नाही. स्पर्धा परीक्षा देणं सुरूच होतं. बी एस आर बी मध्ये सिलेक्शन झालं. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये रिमोट रुरल पोस्टिंग मिळालं. ती जागा पाहून आल्यावर हे माझ्यासाठी नाही हे ठरवलं. पुन्हा नातलगांचा रोष. पण बाबांनी मला हवं ते करू दिलं. किंवा नको ते करायला लावलं नाही.
५. ही नोकरी सोडल्यावर मात्र दिसेल तिथे अॅप्लाय करणं सुरू केलं. लहान सहान नोकर्या केल्या. पुन्हा नातलगांची बोलणी. या नोकरीत काय होणार? इ. शेवटी म्हणजे फार तर वर्षभरात युटीआय मध्ये लागल्यावर मात्र आणखी परीक्षा देणे बंद केले. एम पी एस सीची गॅझेटेड ऑफिसर्सची प्रिलिम पास झालो होतो. पण मेनचा विचार केला नाही . खाजगी क्षेत्राचाही कधी विचार केला नाही.
६. पण युटीआय मध्ये असतानाच डायरेक्ट रिक्रूट ऑफिसर्सच्या एक्झामला बसून इंटरव्ह्युला गेलो , तिथे इतर ठिकाणाहून आलेली , विशेषतः बिहारी मुलं किती अॅम्बिशस असतात, - मी इथे किती वर्षांत टॉप मोस्ट जागेवर जाईन असा प्रश्न त्यांनी मला विचारलेला , जॉब हॉपिंग करत असतात हे पाहिलं. पण हे कधी करावंसं वाटलं नाही. यात सिलेक्शन झालं. पण वेटिंग लिस्टवर नंबर यायच्या आत प्रमोशन झालं.
आता कधीतरी कराव्याश्या वाटलेल्या पण न केलेल्या गोष्टी.
एक भाबडं दिवास्वप्न.
कुठेतरी गावात जाऊन राहायचं. तिथे स्वतःचं टुमदार घर. सोलर पॅनल. रेन वॉटर हार्वेस्टिंग. शून्य कचरा. परसात भाज्या.
आणि गावातल्या युवकांना शिक्षणात मदत करायची. शिक्षक, शेतकी अधिकारी . डॉक्टर, व्हायला, एम पी एस सी , यु पी एस सीत जायला मदत करायची.
तेव्हा स्पर्धा परीक्षां इतक्या जिवघेण्या नव्हत्या. त्यासाठी दिल्ली, पुण्यात राहणं वगैरे प्रकार बोकाळले नव्हते.
पण हे काही फार गंभीरपणे पाहिलं नव्हतं. असंच. त्यामुळे करायचं राहून गेलं असंच काही नाही.
हे तसं ताजं आहे. गेल्या दोनतीन वर्षांत कळलं की आजोळच्या गावीही आपण वारस आहोत. तेव्हा माझ्या मामेमावसभावंडांत विषय निघाला की आपण आजोळचा गणपती कधी अनुभवलाच नाहीए. ती मजा माहीत नाही. तर आपलं तिथे घर बांधलं , की जाऊ आपण सगळे एकत्र . ते फिसकटलं.
त्याचवेळी मुंबईतून कोकणात गणपतीसाठी जाणार्यांना किती स्ट्रेस येतो तेच दिसत राहिलं. ऑफिसात सुट्या मिळाल्या पाहिजेत. ट्रेनची तिकिटं . ट्रेनमध्ये चढण्यापासून किमान अर्ध्या प्रवासातलं युद्ध. ट्रेनच्या तिकिटापेक्षा महाग जवळचं स्टेशन ते गाव हा रिक्षा प्रवास. ट्रेनची तिकिटं नाही मिळाली तर ड्राइव्ह करून जायचं आणि यायचं. ट्रॅफिक जाम. नाहीतर विमानाने जा. पुढे कार करा . ही प्रवासातली दगदग. तसंच रीती परंपरांचा धाक. नात्यांतले ताणतणाव. जायच्या आधीच सगळं नीट होईल ना हे टेन्शन आणि परत अल्यावर झालं बुवा नीट. मग ती दगदग आणि ताण बाहेर पडणं. एकेवर्षी ऐन गणपतीत आलेला पूर. चिपळूण च्या एस टी स्टँड मधली दृष्ये .
यामुळे हे स्वप्न नीट पाहायच्या आधीच पुसून गेलं.
आता मात्र आता स्वतःला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी राहून जायच्या आधी करून घेण्याकडे कल वाढला आहे.
सुंदर व्यक्त केलीये आपली खंत
सुंदर व्यक्त केलीये आपली खंत आणि उद्वेग
आवडला लेख.
आवडला लेख.
छान लिहिलंयस.
छान लिहिलंयस.
).
#१बद्दल आपण बोललो होतो (म्हणजे मी तुला बोलले होते
गावात टुमदार घर झालं की सांग, मी येईन सुट्टीला.
>>> आता मात्र आता स्वतःला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी राहून जायच्या आधी करून घेण्याकडे कल वाढला आहे.
Good!!
<<<< कुठेतरी गावात जाऊन
<<<< कुठेतरी गावात जाऊन राहायचं. तिथे स्वतःचं टुमदार घर. सोलर पॅनल. रेन वॉटर हार्वेस्टिंग. शून्य कचरा. परसात भाज्या.>>>>>
शुभेच्छा आणि सेम पिंच. माझीही निवृत्तीनंतर अशीच इच्छा आहे. फक्त मला घरात उंदीर पाली नकोत आणि हायस्पीड इंटरनेट हवेय.
समाजाभिमुख, चांगले स्वप्न
समाजाभिमुख, चांगले स्वप्न
होतेआहे. ते पूर्ण होवो अशी सदिच्छा.लेख आवडला.
लेख आवडला.
आता मात्र आता स्वतःला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी राहून जायच्या आधी करून घेण्याकडे कल वाढला आहे....... वा!
छान
छान
छान भरत
छान भरत
आता मात्र आता स्वतःला
आता मात्र आता स्वतःला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी राहून जायच्या आधी करून घेण्याकडे कल वाढला आहे. >> शुभेच्छा!
मी १२ नंतर सायन्स आणि मग इंजिनिअरिंगला गेलो. गेल्यावर ते मनापासून आवडलं. बाकी काही आवडलं नसतं का? तर तसं बहुतेक नाही. जनरल ठीकठाक अक्कल होती, आणि अभ्यास करायला आवडायचा, त्यामुळे इतरही क्षेत्रात तगलोच असतो असं आता वाटतं.
कालचा ११ वी ला कुठले विषय निवडू यावर माझं मत विचारायला मुलगा आलेला. त्यात त्याला एक बिझनेस अकाऊंटिंग कोर्स घ्यावा वाटत होतं. बाकीच्या विषयांत मी मदत करू शकेन पण यात मी अजिबात मदत करू शकणार नाही असं मी त्याला तेव्हा सांगितलं, आणि मनात विचार आला. चांगली संधी आहे, आपल्याला शिकुन घ्यायची. त्याने घेतला तो विषय तर मी पण शिकुन घेईन.
भाबडं दिवास्वप्न छान आहे, काही महिने सलग त्याभागात पाहुण्यासारखे नाही तर तिथल्या माणसासारखे रहायची संधी मिळाली तर करुन बघा. शारिरीक आणि मानसिक कितपत जुळवून घेता येतंय त्याचा थोडा अंदाज येईल.
शुभेच्छा भरत.
शुभेच्छा भरत.
छान लिहिले आहे. दिवास्वप्ने
छान लिहिले आहे.
दिवास्वप्ने विशेष आवडली.
भरत,
भरत,
आवडलं लिखाण. अगदी मनापासून लिहिलंय ते जाणवतंय.
आता मात्र आता स्वतःला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी राहून जायच्या आधी करून घेण्याकडे कल वाढला आहे. >> यासाठी सदिच्छा..
लेख आवडला.आणि इतक्या अनेक
लेख आवडला.आणि इतक्या अनेक महत्वाच्या शिक्षण पर्यायांमध्ये, नोकरी पर्यायांमध्ये सिलेक्शन्स झाली/होता होता स्वतःच्या इच्छेने टाळली हे वाचून कौतुकही वाटलं.यावरून तुमची बुद्धिमत्ता, मोठा आवाका दिसून येतो.
आवडलं लेखन! शुभेच्छा.
आवडलं लेखन! शुभेच्छा.
<< किती स्ट्रेस येतो तेच दिसत
मनमोकळं लेखन आवडलं.
<< तेव्हा स्पर्धा परीक्षां इतक्या जिवघेण्या नव्हत्या. >>
काहीसाबराचसा असहमत. तुम्ही करियरसाठी कुठला मार्ग निवडता, यावर ते बरेचसे अवलंबून आहे, अगदी १९८० च्या दशकातसुध्दा. निव्वळ आरक्षण नाही, म्हणून १ मार्कने मेडिकलची ॲडमिशन मिळाली नाही, अशी त्यावेळची उदाहरणे माहीत आहेत. त्याऐवजी बी.ए, बी.कॉम, बी. एससी. ला जाणे तुलनेत खूपच सोपे होते.<< किती स्ट्रेस येतो तेच दिसत राहिलं...... ऑफिसात सुट्या मिळाल्या पाहिजेत. ट्रेनची तिकिटं . ... प्रवासातलं युद्ध. ट्रेनच्या तिकिटापेक्षा महाग जवळचं स्टेशन ते गाव हा रिक्षा प्रवास. ... ट्रॅफिक जाम. ... प्रवासातली दगदग. ... रीती परंपरांचा धाक. नात्यांतले ताणतणाव. ... सगळं नीट होईल ना हे टेन्शन आणि परत अल्यावर झालं बुवा नीट. मग ती दगदग आणि ताण बाहेर पडणं. ... आलेला पूर. ... एस टी स्टँड मधली दृष्ये. यामुळे हे स्वप्न नीट पाहायच्या आधीच पुसून गेलं. >>
भारतातले आयुष्य एकंदरीत कसे आहे, हे तुम्ही स्वतःच सांगितले, हे अतिशय उत्तम झाले.
<< आता मात्र आता स्वतःला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी राहून जायच्या आधी करून घेण्याकडे कल वाढला आहे. >>
हे सगळ्यात बेस्ट आणि महत्त्वाचं. तुम्हाला शुभेच्छा.
भरत , छान लेख..!
भरत , छान लेख..!
मी देखील सायन्स न घेता कॉमर्सला गेले.. एक तर सायन्स घे किंवा आर्टस घे असं बरेच जणांनी सांगितलं... आर्टस घेऊन बारावीला चांगले गुण मिळव आणि D.Ed कर.. शिक्षिका बन...! त्यावेळी बऱ्याच मुलींनी हेच केलं.. कोसबाडला D.Ed कॉलेज आणि ग्रामसेविका शिक्षण संस्था आहेत.. तिथे मिळाला असता प्रवेश.. हे बहुतेकांचं सांगणं.. पण मी ऐकलं नाही कुणाचं.. !
CA करायचं माझं स्वप्न अपूर्ण राहिलं हे रिलेट झालं. बारावीचा निकाल लागला आणि दुसऱ्या / तिसऱ्या दिवशीच CA फर्म जॉइन केली होती. सकाळी ७.३० ते १२ वाजेपर्यंत कॉलेज आणि मग १२.३० ते ५.३० पर्यंत CA ऑफिस.. मग ५.४५ ची ट्रेन पकडून घरी.. सकाळी ५.३० ला घर सोडले की घरी संध्याकाळी ७ ला घरी पोचायचे हे निव्वळ पुढे CA करता यावं आणि अंकाऊंट शिकता यावं म्हणून केलं.. पण स्वप्नं अपूर्ण राहिलं. त्यावेळी १२ वी नंतर प्रवेश परिक्षा देता यायची.. पण त्यासाठी खाजगी कोचिंग लागायची.. ते क्लास बोरिवली, अंधेरी, दादरला असत. सोबत असणारे विद्यार्थी करायचे रोजचे कॉलेज करून खाजगी कोचिंग... त्यावेळी त्या क्लासची फी सुद्धा भरमसाठ असायची.. मला रोज इतका प्रवास आणि फी परवडणारी नव्हती.. पैश्यांचं सोंग आणता येत नाही हे मला माहित होतं.. विचार केला पदवी नंतर करूया CA तर त्यावर्षी नेमके नियम बदलले.. पुन्हा प्रवेश परीक्षा मग पुन्हा कोचिंग .. तेच दुष्टचक्र... तरीही परीक्षेचा Form भरलेला आठवतो.
मग MBA करायचं मनात आलं.. तो ही विचार बारगळला.. पुढे काही कारणास्तव नोकरी करणं गरजेचं झालं.. तिथेच पुढचं शिक्षण घेत मग त्याच CA Firm मध्ये २०१६ पर्यंत Income Tax आणि Service Tax Consultant म्हणून काम केलं... सगळे' Half CA ' म्हणायचे. आता ज्या व्यवसायात आहे त्यासाठी NISM च्या परीक्षा अजून द्याव्या लागतात.. मात्र CA करता आलं नाही त्याचं शल्य अजून आहे मनात..!
आता मात्र आता स्वतःला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी राहून जायच्या आधी करून घेण्याकडे कल वाढला आहे. >>
हे सगळ्यात बेस्ट आणि महत्त्वाचं. तुम्हाला शुभेच्छा +1
भावलं एकदम.
भावलं एकदम.
<<पुढे ऑफिसात कायम ऑडिटर्सशी सामना झाला आणि मी यात नाही याचं समाधान वाटलं.>>
का हो असं? आम्हाला इंशिकुरिटी आली ना हे वाचून
आता मात्र आता स्वतःला
आता मात्र आता स्वतःला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी राहून जायच्या आधी करून घेण्याकडे कल वाढला आहे. > शुभेच्छा!
!मनमोकळं लेखन आवडलं.
सगळ्यांचे आभार.
सगळ्यांचे आभार.
उपाशी बोका, अमेरिका युरोपात ख्रिसमसच्या वेळी कोकणातल्या गणेशोत्सवासारखं मी वर रंगवलेलं चित्र थोड्या फार प्रमाणात दिसतं ना? बहुतेक मालिकांत ख्रिसमस निमित्त सगळी फॅमिली एकत्र येणं आणि भांडी वाजणं , जखमांवरच्य खपल्या काढणं दाखवलेलं असतं
रूपाली, तुमचं लेखन आणि प्रतिसाद अतिशय प्रांजळ असतात. मी १ ते ६ या न केलेल्या गोष्टींबद्दल खंत नाही. सी ए न झाल्याची नाही. काही काही बसेस, गाड्या आपल्याला सोडून द्याव्या लागतात, त्यातला प्रकार. ही गेली तर दुसरी मिळेल हा आत्मविश्वास होता. फक्त तो काळ तणावाचा होता एवढा खरं.
नातेवाईकांच्या वागण्यावरून धडा घेतला की पुढच्या पिढीला - भाच्यांना त्यांनी विचारल्याशिवाय काही सांगायला जायचं नाही. कधी कधी होतं विसरायला. पण फार पुढे जात नाही.
कॉमी, तुम्ही सी ए का? आर्टिकल्ड आणि ऑडिट क्लर्कशी जास्त सामना व्हायचा . पार्टनर शेवटच्या दिवशीच यायचे , ते चांगलेच असत.
अनेक किस्से लिहिता येतील. त्यातही मुंबईच्या फर्म्स आणि बाहेरच्या विशेषतः उत्तरेकडच्या यांत दोन ध्रुवांइतका फरक .
छान लिहिले आहे. शुभेच्छा.
छान लिहिले आहे. शुभेच्छा.
छान लेख.
छान लेख.
आता मात्र आता स्वतःला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी राहून जायच्या आधी करून घेण्याकडे कल वाढला आहे. >>
हे सगळ्यात बेस्ट आणि महत्त्वाचं. तुम्हाला शुभेच्छा +1
लेख आवडला.
लेख आवडला.
आता मात्र आता स्वतःला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी राहून जायच्या आधी करून घेण्याकडे कल वाढला आहे.>> हे आवडले. शुभेच्छा!
आता मात्र आता स्वतःला
आता मात्र आता स्वतःला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी राहून जायच्या आधी करून घेण्याकडे कल वाढला आहे >>> हे महत्वाचं.