
जिन्नस एक पदार्थ अनेक ही थीम वाचल्यावर पनीर, तांदूळ वगैरे अनेक जिन्नस मनात डोकावून गेले, पण जरा हटके जिन्नस निवडावा असं मनात असल्याने पपई निवडली.
पपईचे अष्टावतार
1. सॅलड
साहित्य – कच्च्या पपईचा जाडसर कीस, गाजराचा जाडसर कीस, टोमॅटोच्या मोठ्या फोडी, भाजलेले दाणे जरासे ठेचून, लिंबाची फोड, मीठ, सोय सॉस, लसणीची पाकळी, मिरची आणि सजावटीसाठी डाळींबाचे दाणे
कृती – एखाद्या खोलगट भांड्यात लसूण, मिरची, मीठ एकत्र ठेचून घ्यावे. मग त्यात लिंबाची एखादी फोड, tomato घालून परत जरा ठेचावे, आता पपई आणि गाजराचा कीस घालूनही ठेचावे. या रेसिपीत ठेचण्याची क्रिया बारीक करण्यासाठी नसून पदार्थांचे रस सुटण्यासाठी आहे.
2. पपईचा हलवा –
साहित्य – एक वाटी कच्च्या पपईचा कीस, पाव वाटी साखर, चमचाभर तूप, लवंग, काजू-बेदाणे, लिंबू
कृती – कढईत तूप घालून आधी काजू-बेदाणे लालसर रंगावर परतून घ्यावेत. ते काढून त्यात लवंग घालून मिनिटाभराने पपईचा कीस घालावा. कीस जरा मऊ झाल्यावर साखर घालावी. भरपूर पाणी सुटेल ते थोडे आटेपर्यंत शिजवावावे. रस पूर्ण आटू द्यायचा नाही. जराशी चव येईल इतकाच लिंबाचा रस आणि काजू-बेदाणे घालून आच बंद करावे.
3. चीज पपई पायनापल – याबद्दल काय लिहिणार!
4. पपईचे मुटके - पदार्थ क्रमांक एक - आवडीचं वाटण करा आणि उकळत्या ग्रेव्हीमध्ये चकत्या सोडून पाच मिनिटं उकळून घ्या.
5. वड्या
साहित्य - एक वाटी कच्च्या पपईचा कीस, एक वाटी मिल्क पावडर, एक वाटी साखर, वेलची पूड, पाव वाटी दूध, चमचाभर तूप आणि सजावटीसाठी पिस्त्याचे काप
कृती - सर्व घटक एकत्र करून ढवळत रहावे. मिश्रण आधी सैल होईल आणि हळूहळू आळत जाईल. मिश्रण कडा सोडायला लागल्यावर तुपाचा हात लावलेल्या ताटात पसरवून गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.
6. पपईचे मुटके – पदार्थ क्रमांक दोन - जरा व्यवस्थित तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्ता आणि तीळ तडतडू द्या. त्यावर या चकत्या घालून मस्त खमंग परतून घ्या. थोडंसं लिंबू, कोथिंबीर घालून खायला घ्या. जेवणात डावी बाजू सजवायला छान चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ होतो. डब्यात छोटी सुट्टी किंवा चार वाजताच्या भुकेला उत्तम पर्याय ठरतो.
7. धिरडी
साहित्य – एकेक वाटी बार्ली, हिरवे मूग, आणि फॉक्सटेल मिलेट रात्रभर अथवा सहा-सात तास भिजत घालावे. वाटून घेताना त्यात आल्याचा तुकडा, लसूण, कोथिंबीरीच्या काड्या घालून छान बारीक वाटून घ्यावे. त्यात एक ते दीड वाटी कच्च्या पपईचा कीस घालावा. बिना पॉलीशचे तीळ आणि मीठ घालून सगळे नीट ढवळून घ्यावे. पीठ फार सैल करू नये. या पिठाची धिरडी मस्त लागतात, सहज सुटतात. अगदी पोटभरीची होतात.
8. थालीपीठ – भाजणी, पपईचा कीस, मीठ, तिखट, कोथिंबीर घालून पीठ भिजवून घ्या आणि लोखंडी तव्यावर तेल सोडून खरपूस भाजून घ्या.
मुटके
साहित्य - एक वाटी बेसन, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी रवा, दोन वाट्या पपईचा कीस, मीठ, लाल तिखट, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धा चमचा ओवा, एक चमचा तीळ (मी काळे तीळ वापरले आहेत),
कृती – पपईचा कीस घट्ट पिळून घ्यावा (पाणी फेकून देऊ नये, भाजी-आमटीत वापरावे), वरील सर्व साहित्य एकत्र करून नीट मिसळून घ्यावे. चव बघून हवे तर तिखट-मीठ घालून व्यवस्थित करून घ्यावे. थोडे थोडे पाणी घालून घट्टसर गोळा भिजवावा. त्याचे साधारण काकडीच्या जाडीचे लांबट मुटके वळून घ्यावेत. पसरट भांड्यात पाणी उकळायला ठेवावे. एका पातेल्याला तेलाचा हात लाऊन त्यात हे मुटके ठेऊन उकळत्या पाण्यात ठेऊन, झाकण ठेऊन पंधरा मिनिटे वाफवून घ्यावे. हे मुटके गार झाल्यावर अर्धा ते पाउण इंच जाडीच्या चकत्या कापून घ्याव्यात. याचे दोन पदार्थ करता येतात.
माझं लिखाण सेव्ह होत नव्हतं
माझं लिखाण सेव्ह होत नव्हतं इथे प्रतिसाद लिहिल्याशिवाय, म्हणून पहिला प्रतिसाद माझाच!
कच्च्या पपई पासून एवढे पदार्थ
कच्च्या पपई पासून एवढे पदार्थ आणि सगळेच इंटरेस्टिंग.. कमाल आहे.
.
.
छान आहे.. फोटो मस्त
छान आहे.. फोटो मस्त
.
.
वाह भारीच ग
वाह
भारीच ग
जबरदस्त गं कच्च्या पपईपासून 8
जबरदस्त गं कच्च्या पपईपासून 8 पदार्थ.... भारीच
भारी!
भारी!
एका पपई पासून एवढ्या रेसिपी..
एका पपई पासून एवढ्या रेसिपी... सॉलिड आहेस तू
छान रेसिपीज. कल्पक
छान रेसिपीज. कल्पक
वॉव
वॉव
बडोदेकर- अमदावादी लोकं खमण-खमणीसोबत देतात ती कच्च्या पपईची “सांभारो” चटणी सोडून कच्ची पपई कधी खाल्लेली नाही. Thai salad आणि मद्रासी सांबार करतांना वापरतात ते माहित आहे पण कच्च्या पपईचे इतके प्रकार करता येतात हे भारी surprise आहे.
तुम्ही भरपूर व्हरायटी केली आहे, आठ आठ पदार्थ !
प्लेटिंग, सजावट सुद्धा 👌
फारच जबरदस्त!! श्रम, कल्पकता
फारच जबरदस्त!! श्रम, कल्पकता आणि फोटो सर्वच सुंदर.पपई सुचणं हे पण।
भारीच क्रिएटिव रेसिपीज!!
भारीच क्रिएटिव रेसिपीज!!
फारच टेंप्टिंग दिसत आहे ताट
फारच टेंप्टिंग दिसत आहे ताट
पदार्थ नक्कीच चविष्ट असणार हे बघूनच वाटतय
कल्पकतेने केलेली देखणी मांडणी
कल्पकतेने केलेले पदार्थ आणि देखणी मांडणी.
पपई अष्टअवतार करणारी अष्टभुजाच तू.
पपईचे आठ प्रकार शीर्षकात
पपईचे आठ प्रकार शीर्षकात वाचूनच थक्क झालो. त्यानंतर असली कमाल प्लेटिंग दिसली.. हॅट्स ऑफ!
पपई अजिबात आवडत नाही. पण ताट
पपई अजिबात आवडत नाही. पण ताट दिसायला मस्त दिसते आहे.
जबरदस्त.
जबरदस्त.
कच्च्या पपईपासून एवढे पदार्थ केले म्हणजे भारीच.
प्लेटिंग भारीच
खूप खूप धन्यवाद सगळ्यांना!
खूप खूप धन्यवाद सगळ्यांना!
मी आज थालिपीठ केले. फार आवडले
मी आज थालिपीठ केले. फार आवडले.
कमाल आहे! आठ प्रकार!!
कमाल आहे! आठ प्रकार!! प्रेझेन्तेशन पण मस्त, अगदी प्रोफेशनल
वाह छानच
वाह छानच
हे अगदी अविश्वसनीय आहे!
हे अगदी अविश्वसनीय आहे! कच्च्या पपईचे ८ प्रकार होऊ शकतील असा विचारही येऊ शकत नव्हता मनत. (आमची धाव कुंपणाच्याही बरीच आत आहे!
)
अजून एक प्रकार पण करते मी, पण
अजून एक प्रकार पण करते मी, पण त्या दिवशी फार उशिरा आठवला. आपण बटाट्याचा कीस करतो तसा पपईचा करायचा. चांगला लागतो.
कच्च्या पपईपासून एवढे पदार्थ
कच्च्या पपईपासून एवढे पदार्थ ! कमाल आहे. मस्तच दिसतय सगळं.
फारच कल्पक झाले आहे! मस्त.
फारच कल्पक झाले आहे! मस्त.
मस्तय! पुर्णपणे भन्नाट. आहे.
मस्तय! पुर्णपणे भन्नाट. आहे.
(No subject)
अभिनंदन सहेली.
अभिनंदन सहेली.
अभिनंदन सहेली
अभिनंदन सहेली
Pages