
गणपती आले आणि मायबोली गणेशोत्सवाची दवंडी पिटली गेली. यंदा संयोजक मंडळाने बरेच डोके लढवून पाककृती स्पर्धेचे विषय दिलेले दिसले. बरेच दिवस चर्वितचर्वण केल्यानंतर असे ठरले की आपण दिसतं तसं नसतं हीच पाककृती करावी. मध्येच रवा वापरून थाळी करावी का अशी एक टूम निघाली. पण सरते शेवटी पनीर आणले गेले. दोन गोष्टी डोक्यात होत्या. एक म्हणजे तिखट मोदक आणि दुसरी ही कृती. पण "सोप्या गोष्टी आपण करतच नाही ना" या अशोक सराफ बाण्याने शेवटी रसमलाई सरप्राईज करण्याचा निर्णय झाला.
साहित्य:
(५ ते ६ रसमलाई करता )
पनीर / छेना ५ औंस ( साधारण १४० ग्रॅम )
दूध अंदाजे २५० मिली
मिरच्या २ (कमी तिखट असल्यास थोड्या जास्त घ्याव्यात)
आल्याचा कीस चवीनुसार (साधारण अर्धा टीस्पून)
काजू ४ - ५
चक्रीफूल / बादान १
मिरे ४
वेलदोडा ३
लवंगा २
केशर आवडीनुसार
कॉर्नस्टार्च एक टीस्पून
मैदा १ - २ टीस्पून
.
.
कृती:
सुरुवातीला तुम्ही काय घेत आहात ते बघा. पनीर घेतले तर सुरुवात सोपी आहे पण मग थोडे जास्ती मळण्याची तयारी ठेवा. आम्ही पनीर घेतले होते. ते मोडून घेतले आणि हाताच्या तळव्याने चांगले मळून घेतले. छेना घेतला तर कमी मळून तो चांगला मऊ होऊ शकतो त्यामुळे छेना घेणे अधिक श्रेयस्कर. दूध फाडून त्याचा छेना केला तर मग अगदीच फ्रेश होऊ शकतो. आम्ही पनीर आणले होते त्यामुळे तेच वापरले.
हा पनीरचा उद्योग करण्याच्या आधी रसमलाईच्या रसाकरता दुधाची तयारी करून घ्या. जितके पातळ / घट्ट हवे असेल त्यानुसार दूध घेऊ शकता. मी साधारण २५० मिली दूध घेतले. एका वाटीत थोडे दूध आणि कॉर्न स्टार्च यांचा घोळ बनवून घेतला. तो त्या दुधात टाकला आणि दूध अगदी बारीक गॅसवर उकळत ठेवले. थोडे गरम झाले की त्यात चक्रीफूल, मिरे, वेलदोडा, आणि लवंगा हा खडा मसाला आणि एक मिरची मधून स्लीट मारून टाकली. त्याचबरोबर केशरकाड्या पण टाकल्या. हे आता पनीरचे काम होईपर्यंत उकळू दिले. मधून मधून ढवळत राहिलो. घाई करून आताच यात मीठ टाकायला जाऊ नका सगळे दूध फाटेल. कॉर्न स्टार्च घातल्याने मसाले घातले तरी दूध फाटत नाही आणि लवकर घट्ट होते. पाहिजे तसे घट्ट झाले की दूध गॅसवरून खाली घेतले आणि थोडे गार करून घेतले. त्यातले खडे मसाले आणि मिरची काढून टाकले. गार दुधात मग मीठ घालून बरोबर चवीचा रस करून घेतला.
.
.
तर आता दूध उकळून झाले आहे आणि पनीर मळून घेतले आहे. पनीर अगदी मऊ करून घेतले म्हणजे गुठळ्या मोडल्या जातील आणि रसमलाई फुटणार नाही. मळून झाल्यावर त्यात दोन चमचे मैदा घातला. जरा जास्ती घट्ट रसमलाई पाहिजे असेल तर अजून थोडा मैदा घाला. मिश्रण फार कोरडे वाटल्यास छोटा चमचाभर पाणी घालून नीट मिक्स करून घ्या. मग या मिश्रणाचा गोळा करून तो ओल्या रूमालाखाली ठेवला. त्यानंतर सरप्राईजची तयारी करून घेतली. मिक्सरमध्ये मिरची, मीठ आणि काजू वाटून घेतले. त्या पेस्ट मध्ये आल्याचा कीस घातला आणि सारण तयार करून घेतले. आता रसमलाई तयार करायला घेतली. एकीकडे गॅसवर कढईत पाणी उकळत ठेवले. त्यात मीठ टाकून घेतले. रसमलाई करता पनीरचा छोटा गोळा घेतला तो थोडा खोलगट करून त्यात सरप्राईज सारण भरले. मग वरतून थोडे अजून पनीर लावून नीट गोल करून घेतला आणि थोडा दाबून चपटा आकार दिला. असे सगळे चपटे गोळे करून घेतले. पाणी उकळले की त्यात एक सोडून पाहिला. विरघळला नाही असे वाटले की हळू हळू बाकीचे पण सोडले. मग परत उकळी आल्यावर गॅस थोडा बारीक केला आणि झाकण ठेवून ८ - १० मिनिटे शिजवले. गोळे सगळे वरती येऊन तरंगायला लागतात. थोडा आकार बिघडला, पनीर निसटले तरी घाबरायचे नाही. मग उकळून झाले की लगेच गाळणीने / झाऱ्याने काढून घेऊन थंडगार बर्फाच्या पाण्यात सोडले.
.
.
थंड झालेल्या पनीरच्या गोळ्यांचे आकार जरा परत नीट करून घेतले आणि थोडे दाबून पाणी काढून टाकले. प्रत्येक बोल मध्ये २-२ गोळे ठेवून वरतून तयार केलेला रस घातला. आणि त्यात थोडा वेळ मुरू दिला. तोपर्यंत सजावटीकरता थोडे बदामकाप करून घेतले. अगदी वाढताना एक एक बोल १५ सेकंद मावे करून घेतला. वरतून बदाम काप पखरले आणि थोडे अजून केशर टाकले.
अशी तयार झाली बघायला गोड दिसणारी पण फोडल्यावर एकदम मस्त झणका देणारी रसमलाई सरप्राईज !!
.
.
संकल्पना - rmd
निर्मिती आणि दिग्दर्शन - धनि
अधिक टिपा:
१) या सोबत मलाबार पराठा किंवा लच्छा परठा उत्तम लागतो. आम्ही मलाबार पराठा खाल्ला 
२) ही कृती प सोडून ब घालून केली आणि चांगली झाली नाही तर मंडळ जवाबदार नाही. 
३) मिरची तुमच्याकडे किती तिखट मिळते आणि तुम्हाला किती तिखट चालते त्या प्रमाणात घाला.
Outstanding पाककृती. आवडत्या
Outstanding पाककृती. आवडत्या रसमलाई ला ट्विस्ट !
इस कू बोलते सरप्राइज़, नज़र का धोखा.
आल्याचा वापर is the game changer. Wow !
फारच मस्त दिसतेय! वाटतच नाही
फारच मस्त दिसतेय! वाटतच नाही तिखट असेल.
जबरदस्त
जबरदस्त
तुझ्या एंट्रीची वाटच बघत होते
मस्तच !!! एकदम हटके !!
मस्तच !!! एकदम हटके !! रसमलाई चे दुधाची रेसिपी वाचल्यावर कोल्हापूर ला पांढरा रस्साचे veg version मिळते ते आठवले. उत्तम सादरीकरण!! वेगळ्या संकल्पना साठी रूपा चेही अभिनंदन!!
काय जबरदस्त दिसतेय!! लगेच
काय जबरदस्त दिसतेय!! लगेच बकेट लिस्टमध्ये टाकून ठेवले आहे
आली रे आली धनीची पाककृती आली.
आली रे आली धनीची पाककृती आली.
जबरदस्त twist. आवडली एकदम.
पाहून समजतच नाही की हे तिखट असेल.
बाकी फोटो प्रेझेंटेशन भारीच..नेहमीप्रमाणे.
अवांतर:
संकल्पना - rmd सतत पिसेकाडू सिनेमे पाहिल्यामुळे असे ट्विस्ट सुचले असावेत.
भारी ट्विस्ट!!
भारी ट्विस्ट!!
अमेझिंग आहे हे ! मुजरा !
अमेझिंग आहे हे !
मुजरा !
Wow खूप छान आहे पाककृती
Wow खूप छान आहे पाककृती
आयडिया तर एकच नंबर
सादरीकरण भारी
ती लाल किनारीची डिश ओळखीची झाली आता
अधिक टिपा विशेष आवडल्या
भारी एन्ट्री धनी!
भारी एन्ट्री धनी!
हाय हाय ( हे खाण्याआधीच
हाय हाय ( हे खाण्याआधीच म्हणतेय) जबरदस्त. बघून, (वाचून ही) असं वाटतं नाहीये कि गोड नाही. रसमलाई या शब्दाची जादू आहे बहुतेक. दुधाचा रंग कातील आलाय. आता करून बघणे आले.
एकदम अशक्य सरप्राईज आहे हे!
एकदम अशक्य सरप्राईज आहे हे!
मस्त दिसतेय रसमलाई. तिखट
मस्त दिसतेय रसमलाई. तिखट ट्विस्ट भारी.
अनिंद्य >> बरोबर !! आल्यामुळे
अनिंद्य >> बरोबर !! आल्यामुळे एक extra थोडा तिखटपणा येतो.
अश्विनी, कविन, अस्मिता, anu, मॅगी, रिया, मापृ, सिमरन , प्रज्ञा >> धन्यवाद
ऋतुराज >> एकदम हिला डाला ना
किल्लीने अगदी टिपांपर्यंत वाचल्याने तिचे विशेष कौतुक
धनुडी>> नक्की करून बघ आणि सांग आवडले का
Wow!!! मस्त ट्विस्ट आहे हा.
Wow!!! मस्त ट्विस्ट आहे हा.
हायला !!!! हे वेगळच आहे
हायला !!!! हे वेगळच आहे काहीतरी
रसमलाई मला आवडत नाही , पण ही रेसिपी आणि अश्विनी११ ची कमेंट वाचून , मलई कोफ्ता करी करायचं डोक्यात आलं
एकदम वेगळी पाककृती!
एकदम वेगळी पाककृती!
जबरदस्त आहे सहे. पण दुधाऐवजी
जबरदस्त आहे सहे. पण दुधाऐवजी नारळदुध जास्त चांगले वाटेल असं वाटलं.
भारी द्विस्ट आहे. सुनिती ला
भारी द्विस्ट आहे. सुनिती ला मम.
व्वा मस्तच धनी आणि rmd. भारी
व्वा मस्तच धनी आणि rmd. भारी डोके लावले आहे.
आयडिया भारी आणि दिसतेय ही एक
आयडिया भारी आणि दिसतेय ही एक नंबर..
छानच आहे हे प्रकरण!
छानच आहे हे प्रकरण!
वाह, धनी जबरदस्त!
वाह, धनी जबरदस्त!
लास्ट बॉल वर सिक्सर..
मेहंदीची आवड असणारे पाककौशल्यात असेच लिजेंड असतात
भारी डोके लावले आहे.
भारी डोके लावले आहे.
याला पनीर मलई पांढरा रस्सा म्हणता येईल का?
फारच कल्पक! चवीविषयी संदेह
फारच कल्पक! चवीविषयी संदेह आहे........कारण दुधात तिखट मीठ..... पण मस्त आयडिया!
भारी !
भारी !
एकदम कल्पक , भरपूर मेहनत घेतली आहे, बनवणं, प्रेझेन्टेशन फोटोग्राफी सगळ्यांसाठीच
याला म्हणतात ट्विस्ट..
याला म्हणतात ट्विस्ट..
ज्यांना माहीत नसेल त्यांनी खाल्ली की लगेच फोटो काढून ठेवा त्या मोमेंट चे ... अफलातून रिऍक्शन्स मिळतील.
भारी ! लवकरच करून पाहणार !!!
भारी ! लवकरच करून पाहणार !!!
१० पैकी दहा गुण
१० पैकी दहा गुण
1) संकल्पना - rmd
निर्मिती आणि दिग्दर्शन - धनि
२) कल्पकता
३) मेहनत
४) सादरीकरण
५) चित्रीकरण
चवीचे गुण ?
इन्टरेस्टिंग, एंड प्रॉडक्ट
इन्टरेस्टिंग, एंड प्रॉडक्ट छान दिसतंय.
Pages