या उपक्रमाच्या निमित्ताने स्वतःच्याच आयुष्याकडे मागे वळून बघितले गेले आणि आपले काय करायचे राहून गेले? याचा विचार करत असतांना जाणवलं की अरे, आपल्यासाठी तर ही यादी खूपच मोठी आहे. लागलीच मनाने या यादीचंच विश्लेषण करायला घेतलं. थोड्याच वेळात लक्षात आलं की 'गेले करायचे राहून' हे नैराश्याचा सूर असलेलं विधान नसून ही एक नवी सुरुवातही असूच शकते की....'बकेटलिस्ट' बनवण्याची...!! आणि मी सर्वप्रथम माझी बकेट लिस्ट अपडेट करायला घेतली. अपडेट करायला घेतल्यावर सर्वप्रथम लक्षात आलं की आपल्या बकेट लिस्टीतल्या कैक गोष्टींवर आपण अजुन टीक मारलीच नाहीये, अर्थात कित्येक गोष्टी ज्या 'बकेट लिस्टीत' होत्या त्या ऑलरेडी पूर्ण केल्या आहेत मी... वॉव....एकदम भारी वाटायला लागलं की राव ......
टीक मारतांना आठवलं की जेव्हा कधी हे आपण आपल्या बकेट लिस्टमध्ये नमूद केलं होतं की 'अमुक एक शिकायचंय, करुन पहायचंय' ते कौशल्य म्हणा, कला म्हणा, त्यावेळेस 'गेले करायचे राहून' असं हळहळतंच तर लिस्टमध्ये टाकून ठेवलं होतं, पण आज मी त्यांतली कैक कौशल्यं/ कला आत्मसात केल्याही..... खरोखर स्वतःचीच पाठ थोपटून घेतली मी. सगळी व्यवधानं सांभाळतही स्वतःच्या "मनाचा आवाज" ऐकत त्याला प्रतिसाद देत मी माझी बकेट लिस्ट पूर्ण करतेय याचाच आनंद इतका झाला ....असं वाटू लागलं की आता आपण या 'विशलिस्टमध्ये' नव्याने घातलेल्या गोष्टीही अशाच पूर्ण करुच आणि कसं आहे नं आपण काय, काय आणि किती गोष्टी पूर्ण करु शकु, किती गोष्टी सुरु करु शकु यापेक्षा तो प्रवास महत्वाचा आणि आनंददायी असणार आहे जो मला एन्जॉय करायचाय.... बस्स ! दुसरं असं की इथे कोण माझी 'बकेट लिस्ट' चेक करुन काय पुरं केलं ? काय नाही ? याची गोळाबेरीज करुन मला मार्क्स द्यायला बसलंय? जे आहे ते माझं स्वत:चंच इच्छा/स्वप्नांच्या प्रांतात बागडणं, त्या पुर्या करण्यासाठी प्रयास करणं आणि तो अनुभव गाठीशी ठेवून स्वतःचंच आयुष्य समृद्ध करणं..... इतका साधा सोपा मामला तर आहे हा !
या सुखद चिंतनात मग्न असतांनाच एक प्रकर्षानं जाणवलं की काही गोष्टी मात्र खरोखर करायच्या राहून गेल्या, पुढे मागे करु, वेळ मिळाला की करु अशी कोणतीही शक्यता या काही गोष्टींबाबत संभवत नाही कारण या गोष्टी स्वतःसोबत 'एक्स्पायरी डेट' घेऊन आल्या होत्या..... उदाहरणादाखल सांगायचं तर आपल्याच जवळच्या माणसांना गृहीत धरणे.... हे तर काय आपलेच आहेत, यांना काय सॉंरी, थॅक्यू म्हणायचं असतं कधी?.. आपले आजी , आजोबा, इतकंच कशाला अगदी आई-वडीलही , त्यांनी केलेले लाड, प्रेम, कौतुक झेलत झेलत आपण त्या सर्वांना इतकं गृहीत धरुन बसलो की जसे काही ते आयुष्यभर आपल्या सोबतच असणार आहेत. पण तसं काही नव्हतं नं.... जसजशी त्यांची वेळ आली तसतशी ही आपलीच सगळी प्रेमाची माणसं एकेक करत दुरावली... कायमची.... आपल्याला त्यांच्या निस्वार्थी प्रेमाबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करायची संधीही न देता.....भले आज आपण दररोज रात्री न चुकता "ग्रॅटीट्युड जनरल" लिहित असलो तरी "ग्रॅटीट्युड" या शब्दाची ओळख ज्यांच्या कृतीतून सर्वप्रथम आपल्याला झाली त्यांच्याबद्द्ल कॄतज्ञता व्यक्त करायची राहूनच गेली....... मला असं वाटतं की प्रत्येकाच्या जीवनात किमान एक तरी अशी व्यक्ती असेलच जी केवळ निस्वार्थीपणे प्रेम करुन कसलीच अपेक्षा न ठेवता निघून गेली....... ह्म्म.... जे झालं ते झालं, मुद्दाम नसेल अनवधानाने झालं .... ते कसं काय सुधारु शकतो आपण? तर आता जी मंडळी आपल्या अवतीभवती अजुनही अशीच प्रेमाची पखरण करीत आहेत त्यांच्या बाबतीत हे रिपीट न होऊ देणे... हे तर मी करुच शकते की. माझी आई नाही पण नवर्याची आई तर आहे... त्यांना बोलेन जे बोलायचं राहुन गेलंय... सॉरी, थँक्यु जे आहे ते.... ज्यांनी लहानपणी माझी सेवा, शुश्रुषा केली ते आज असतील तर उत्तमच पण नसल्यास समाजासाठी मी काही सेवा देत राहीन..... दानाच्या, श्रमाच्या, वेळेच्या स्वरुपात .
मी माझ्यापुरतं तरी हे ठरवलं आहे की हा उपक्रम होऊन गेल्यावरही वेळोवेळी माझी बकेट लिस्ट मी अपडेट करत राहणार जेणे करुन 'गेले करायचे राहून' या मथळ्याखाली कमीत कमी गोष्टी शिल्ल्क राहतील....यापुढे ईश्वरेच्छा बलीयसि !
>>>>> मला असं वाटतं की
>>>>> मला असं वाटतं की प्रत्येकाच्या जीवनात किमान एक तरी अशी व्यक्ती असेलच जी केवळ निस्वार्थीपणे प्रेम करुन कसलीच अपेक्षा न ठेवता निघून गेली..
होय!! किमान. कि-मा-न. अनेक आहेत खरे तर.
.
जबरदस्त आहे शेवटचा उतारा.
आवडलं.
आवडलं.
अहाहा आशिका लब्यू . किती आतून
अहाहा आशिका लब्यू . किती आतून
जिओ! बदाम बदाम बदाम
जिओ! बदाम बदाम बदाम
खूप छान लिहीलं आहेस. शेवटच
खूप छान लिहीलं आहेस. शेवटच लिहिलं आहेस ते खूप आवडलं
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
छान लिहलंय. शेवट आवडला
छान लिहलंय. शेवट आवडला
छान लिहिले आहे..
छान लिहिले आहे..
गेले करायचे राहून मध्ये अडकून न राहता त्या बदल्यात आता काय करू शकतो हा विचार आवडला
या उपक्रमातील मनापासून
या उपक्रमातील मनापासून आवडलेला लेख. जियो
गेले करायचे राहून मध्ये अडकून न राहता त्या बदल्यात आता काय करू शकतो हा विचार आवडला
+++++ १०००००