
स्पर्धेचा विषय तसा सोप्पा, पण मग विचार केल्यावर मोजून दोन-तीन फुले आठवली. करू करू म्हणता आठवडा सरला आणि मनात ठरवून ठेवलेली सगळीच फुले येऊन गेली की!
गुलाबराजा झाला, जास्वंद फुलून गेला, गेला बाजार झेंडू भाव खाऊन गेला... स्वातीताईचा परदेसीया नॅस्टर्शियम्स हजेरी लावून गेला.
आता उरला गोकर्ण उर्फ अपराजिता. कोणीतरी म्हणालं तसं, यावर्षी रुसलीय अपराजिता. घरी/गावी मोठ्ठा वेल आहे, पण यावर्षी फुलं नाहीतच. मग शेजारी-पाजारी विचारून झालं...
“कुणी गोकर्ण देता काहो गोकर्ण?”
शेवटी आज अपराजिता देवी प्रसन्न झाली आणि मोजून तीन फुले मिळाली. सखी शेजारणीच्या बाल्कनीतली.
मग Blinkit ला शरण जाऊन एक शहाळे मागवले. कुंडीतला पुदिना खुडून घेतला. एक कंच हिरवी मिरची मध्ये चीर देऊन घेतली.
एक फूल गार्निशिंगसाठी ठेऊन उरलेली दोन फुले अगदीच जेमतेम बुडतील इतक्या पाण्यात घालून मंद आचेवर भांडं ठेवलं. पाच मिनिटांत रंग पाण्यात उतरला. हे पाणी थंड होऊ दिलं.
मग रात्री जेवणे आटोपल्यावर लेकीला लाडिगोडी लाऊन ओट्यावर चढवून वरच्या कप्प्यातून mocktail shaker काढून घेतला.
फ्रीजरमधून ice cubes काढून रुमालात गुंडाळून त्यावर लाटण्याने दणके दिले. हे काम लेकीने अगदी आवडीने केलं.
बर्फाचा चुरा shaker मध्ये घातला. त्यात पुदिन्याची पाने आणि चीर दिलेली मिरची घालून त्याला गदागदा हलवलं. (Shake केलं
)
वर शहाळ्याचं पाणी घातलं. आणि मग अलगद, नजाकतीने (व्हिडिओसाठी हो) गोकर्णीचं पाणी मिक्स केलं...
काय सुंदर रंग आला म्हणता! अगदी नीलमोहिनी...

ठेवून दिलेलं एकमेव फूल त्यात घालून, स्वतःच्या innovation वर खुश होऊन फोटो-बिटो काढले आणि इथे पोस्ट करणार, त्या आधी लक्षात आलं...
अरे! पण यात फळ कुठेय?
टेक्निकली आहे. नारळपाणी. पण ते तर बेस आहे... मग आता..?
मग काय... घेतले अर्धे लिंबू आणि पिळले.
नीलमोहिनीत हलकीशी जांभळी छटा पसरली. सायंकाळच्या आकाशात पसरते तशी.
सांजछटा...
यात थोडंसं, म्हणजे अगदी अर्धी चिमूट pink salt घातलं, कडेला लिंबाची चकती बसवली आणि पेय तयार.
टेक्निकली परफेक्ट. 
लेकीला राहवत नव्हतं अगदी.
मस्तच..
मस्तच..
मस्तच दिसतय
मस्तच दिसतय
मीच ती गोकर्ण रुसलाय म्हणणारी ... असं म्हंटल आणि मलाही आज ३ फुलं दिली तिने "घे बाई रडू नको म्हणत पण ऑफीसला निघायच्या गडबडीत त्यांना तसच सोडून निघावं लागलं परत मेहेरबान झाला गोकर्ण तर करुन बघेन हे
मस्त! ती नीलपरी जास्त गोड
मस्त! ती नीलपरी जास्त गोड दिसतेय
नीलमोहिनी मोरपीसासोबत आणि
नीलमोहिनी मोरपीसासोबत आणि नीलपरीसोबत वाह वा. फार आवडलं.
नीलमोहिनी मोहक.
सुरेख रंग.
सुरेख रंग.
धन्यवाद हेमा ताई, मॅगी, सामो.
धन्यवाद हेमा ताई, मॅगी, सामो.
@कविन, नक्की करून बघ.
@अंजू आवडली कॉमेंट
आयडिया, रंग, फुले, लिखाण
आयडिया, रंग, फुले, लिखाण स्टाईल आणि लेक, सगळेच खूप छान
काय सुंदर नाजूक!! नक्की करून
काय सुंदर नाजूक!! नक्की करून बघणार.
यावेळी आलेल्या या सर्व फुल ड्रिंक एन्ट्री ची एक लायब्ररी बनवून ठेवावी मुख्य पानावर मायबोलीवर.
खूप खूप आवडलं हे पेय. आधी
खूप खूप आवडलं हे पेय. आधी वाटलं शहाळ्याचं पाणी + गोकर्ण पाणी...चव यथा तथाच लागेल, मग पुढे लिंबू रस & पिंक सॉल्ट आले.
मस्तच!!!!
मस्तच!!!!
पण.... अर्र.... माझा गोकर्ण वर डोळा होता... आज उद्याकडे यायचा होता....
.... अर्र.... माझा गोकर्ण वर
.... अर्र.... माझा गोकर्ण वर डोळा होता... आज उद्याकडे यायचा होता....
येऊ दया तुमची पण रेसिपी. More the merrier
आज मला गोकर्णाने प्रसन्न होऊन
आज मला गोकर्णाने प्रसन्न होऊन ओंजळभर फुले दिली
बघू काही जमतय का ड्रिंकेबल
मस्तच.
मस्तच.
पहिल्या फोटोत मोरपिसाचं प्रतिबिंब पडल्यासारखे वाटते आहे सुंदरच.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार. _/\_
मस्तच !! छान प्रेझेंटेशन
मस्तच !!
छान प्रेझेंटेशन
सुंदर. लेक गोड आहे.
सुंदर.
लेक गोड आहे.
नीलमोहिनी मोहक आणि नीलपरीही..
नीलमोहिनी मोहक आणि नीलपरीही...