शुभेच्छापत्र - इंद्रनील - मॅगी

Submitted by मॅगी on 21 September, 2026 - 11:14

शुभेच्छापत्र करायला मम्माचे वॉटरकलर्सच हवेत म्हणून फुगा फुगून बसला होता. शेवटी पोस्टर कलर्सवर मांडवली केली.

बेबी गणपती बाप्पा हवा होता म्हणून हा पेन्सिलने काढून दिला. मग फुग्याने फिंगर पेंटिंग करून फिगर काढली. आमचा मोदक पांढराच असतो! बाप्पाला जीन्स घातली. दागिने, डोळे अश्या शेलक्या गोष्टी क्रेयॉन्सने रंगवल्या. मग लहर आली की ठसा मारायचा नाही, उलटा करायचा. म्हणून crocs वरचं bear charm ठेऊन आजूबाजूला टूथब्रशने रंग उडवले. आकार मनाप्रमाणे दिसत नव्हता म्हणून outline काढली. मग आता ठसा हवाच म्हणून वर स्टार आणि गणपतीला आवडतं म्हणून लाल फूल असे ठसे मारले. स्टार 3d आहेत हां!

आणि लगेच गोष्ट पण सांगितली. ही दोन bears मस्ती करून बाप्पावर रंग उडवतात आणि बाप्पा मोदक सुलक्षित ठेवतो!

लिहायचं नाही, सुट्टीत होमवर्क नसतं असा आमचा दृढ विश्वास असल्यामुळे फक्त I म्हणून सही केलेली आहे. (एवढं सगळं थोड्या थोड्या वेळाने करून ते वाळेपर्यंत त्याच्या I ची फें फें उडालेली आहे!)

2026-09-21-20-21-11-443.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आय! इतकी मोठी सही करायचीच नसते. आपल्या लोकांना आय इतकंच पुरते Happy
मोदक पांढराच असतो सांगितलंस तेव्हा मोदक शोधला. तोवर ती तुंदिलतनू तरी चपल साजिरीच वाटत होती.
मोलक सुलक्षित ठेवलाच पाहिजी की नाही! मग!!! Happy
मला गेल्यावर्षीची इंद्रनीलची कॅपचिनो असॅनिनो चित्रे आठवली Happy

अरे कसलं गोड आहे हे

इंद्रनील मला तुझी गोष्ट आणि चित्र दोन्ही फार आवडले

वा ! फारच गोड आहे शुभेच्छापत्र. आवडलं. शाब्बास इंद्रनील. Happy

गोडम गोड गणूबाप्पा.

सुलक्षित मोदक ठेवणारा बाप्पा, कसलं भारी डोकं चालतेय. मॅगी तुझ्यासारखा कथालेखक होणार. सही हवीच की.

शाबास इंद्रनील.

अन्जू ला मम. किती खट्याळ पण लाघवी भाव आहेत गणपतीच्या डोळ्यांत. डोळे चित्रण हा सर्वात महत्त्वाचा भाग नीलने जमवलाय.

इंद्रनीलकडून सगळ्यांना धन्यवाद आणि एक फ्लाइंग किस Happy
हेहे अमितव, गेल्यावर्षी तो गुणी श्रावण बाळ होता. आता ब्रो झालाय!

अरे किती गोड आहे बाप्पा
मोदक छान ठेवलाय सुलक्षित
आवडलं ग्रीटिंग Happy
शाब्बास इंद्रनील

फार आवडलं ग्रिटिंग मला.
रिदितला पण आवडलं Happy

कलाकार आईचा कलाकार मुलगा ( इथे हार्ट स्मायली आहे जी मला देता येत नाही आहे)

आयचा बाप्पा आय सार्खाच देखणा आहे की. त्याचे डोळे, जीन्स आणि मोदक सगळ्याच्या लाईन्स फारच क्यूट. फार आवडलं हे प्रकरण!

Pages