शशक स्पर्धा - ऋन्मेऽऽष - गेले करायचे राहून..

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 September, 2026 - 07:31

"लेटर हाथ में था, टैक्सी गेट पर थी, जरा सी हिम्मत कर लेता, तो साली जिंदगी कुछ...."

पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मित्रांसोबत अमेरिका जायचा प्लान होता. पण तो "शाहरुख" होता. प्रेमासाठी इथेच थांबला! पुढे ते देखील बिनसले. ना प्रेम, ना करिअर..

याची त्याला खंत नव्हती. पण आज लिंकेदीनवर मित्राला करिअरची शिडी चढताना पाहिले. तेव्हा त्याला हा डायलॉग आठवला.

त्याच विचारात तो घरी गेला. बेल वाजवली. दरवाजा उघडला. आणि दोन्ही मुले धावत येऊन त्याला घट्ट बिलगली. त्या क्षणी तो जगातील सर्वात आनंदी आणि समाधानी व्यक्ती होता. मनोमन त्याने नियतीचे आभार मानले. जे तिने त्याच्यासाठी योग्य निर्णय घेतला होता. वरना., स्साली जिंदगी कुछ और हो सकती थी..!

- ऋन्मेऽऽष

रस - शांत
अलंकार - रूपक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं.
जे होतं ते चांगल्या करताच होतं.

मस्त समाधानी लेख Happy
ज्याच्या नशिबी जे असतं ते मिळतच इथेच रहा की बाहेर जा, स्वर्ग कुठेही फुलवता येतो, आपल्याच हाती असतं ते Happy

छान.
जे होतं ते चांगल्या करताच होतं. +1

धन्यवाद, आशु, सिमरन, अतुल Happy

@ अतुल, हो.. करायचे गेले राहून मध्ये पटकन काही सुचलेच नाही. आणि आठवण्यासाठी म्हणून डोक्याला जास्त ताण सुद्धा नाही दिला. म्हणजे खंत नाहीच आहे कसली तर कश्याला उगाच भूतकाळात डोकावून शोधाशोध करून आपल्याच जीवाला त्रास देणारे काहीतरी हुडकायचे Happy

छान आहे कथा..!

वरना., स्साली जिंदगी कुछ और हो सकती थी..!>>
' जर आणि तर हे निव्वळ शब्दांचे बुडबुडे आहेत.. क्षणभरात घेतलेला निर्णय हा पूर्ण आयुष्य बदलवयाला पुरेसा असतो.. ती त्या - त्या वेळच्या परिस्थितीची गरज असते.. नंतर खेद - खंत बाळगण्यात अर्थ नसतो.. ( जास्तच तत्वज्ञान पाजळलं का ?)