
नॅस्टर्शियम्स खरंतर आमच्या बागेत आले ते रखवालदार (ट्रॅप क्रॉप) म्हणून. त्यांच्या मिरमिरत्या चवीमुळे ते उपद्रवी किडामुंगी, ससे, खारोट्या इत्यादींपासून आमच्या लाडाच्या मोगर्या आणि गुलाबांचं संरक्षण करतील म्हणून. संरक्षण फारसं झालं नाही, पण बागेत रोज रंगांचा अक्षरश: उत्सव मात्र सुरू झाला.
सहसा माझा ओढा रंगीत फुलांपेक्षा गंधित फुलांकडे अधिक असतो, पण यांच्या रंगसंगतीचं माझ्यावरही गारुड झालं!
नेटवर शोधलंत तर हे दक्षिण अमेरिकेतून आलेलं वाण किती बहुगुणी आहे हे लक्षात येईल. त्याची पानं, फुलं, देठं, बिया, सगळं खाद्य आहे. त्याला सॅलडमध्ये घालतात त्या वॉटरक्रेससारखी काहीशी तिखट, मिरमिरती चव असते. कच्चं खा किंवा परतून/शिजवून खा. त्यात औषधी गुण आहेत. श्वसनाच्या विकारांवर आणि काही इन्फेक्शन्सवर घरगुती उपाय म्हणून यांचा काढा पितात. मला विचाराल तर अर्धी दुखणी नुसत्या दर्शनमात्रे पळतील असं यांचं रूप आहे!

त्यामुळे ही स्पर्धा जाहीर झाल्याबरोब्बर कधी एकदा ही पानांमागून आलेली तिखट फुलं मिरवते असं मला झालं होतं! आज योग आला!
पाककृती म्हणण्याइतकी अवघड कृती नाही.
घटक : नॅस्टर्शियमची फुलं, दालचिनीचा तुकडा, लिंबू, मध
फुलं देठांसकट तोडून आणून पाण्याखाली धुवून घेतली.
दालचिनी घालून पाणी उकळलं, ते गरम पाणी या फुलांवर ओतलं आणि दोनेक तास मुरू दिलं.

मग गाळून घेऊन त्यात लिंबाचा रस आणि मध घातला आणि फोटो सेशन केलं.

पिताना पुन्हा थोडं गरम करून घेतलं, पण रूम टेम्परेचर किंवा गारही छान लागेल.
यात आवडत असेल तर स्पाइस्ड रम गोत्र जमवेल असं वाटतंय - तो प्रयोग रात्री करणेत येईल.
वा, मस्तच की.
वा, मस्तच की.
वाह! मस्त आहे हे
वाह! मस्त आहे हे
अरे वा!मस्त दिसत आहे हे!
अरे वा!मस्त दिसत आहे हे!
👌
👌
मस्त दिसतेय टी, खायची फुलं
मस्त दिसतेय टी, खायची फुलं म्हटल्यावर हीच आठवली पण भारतात मिळणं कठीण. UK मधल्या मैत्रिणीकडे होती.
फुलं माहीत नाहीत त्यामुळे कसं
फुलं माहीत नाहीत त्यामुळे कसं लागेल हे इमॅजिन करता येत नाहीये पण मस्त इनोव्हेटिव्ह पेय.
शेवटचा फोटो सुंदर.
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.
सुंदर दिसतंय!! हे फुल माहीत
सुंदर दिसतंय!! हे फुल माहीत नव्हतं
ती मागची लेदर मरून बॅकग्राऊंड काय आहे?
धन्यवाद!
धन्यवाद!

माझ्याकडच्या प्लेसमॅट्स आहेत त्या. आधीच्याही काही धाग्यांवर त्यांनी दर्शन दिलं आहे.
सुरेख सजावट, मांडणी आणि पेय!
सुरेख सजावट, मांडणी आणि पेय! चवीचा अंदाज नाही. पहिल्यांदाच ही फुलं बघितली.
यात आवडत असेल तर स्पाइस्ड रम गोत्र जमवेल असं वाटतंय - तो प्रयोग रात्री करणेत येईल.>>>>>>> झाला का हा प्रयोग सादर करून
धन्यवाद.
धन्यवाद.
>>> झाला का हा प्रयोग

नाही गं! 'गेला करायचा राहून'!
आता येत्या वीकेन्डात जमवेन बेत.
'गेला करायचा राहून'!
'गेला करायचा राहून'!